गोवा मुक्ति आंदोलनात साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेची भूमिका
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रस्तुत ग्रंथात प्रस्तावना, संपादकीय, साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेचा इतिहास, भूमिका व गोवा मुक्ती संग्रामात जागृत ठेवण्याचे कार्य ज्या अग्रलेखाच्या माध्यमातून केले ते निवडक अग्रलेख परिशिष्ठासह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण 15 अग्रलेख, वृत्त, बातमी, घटनेचे फोटो, संपादकीय व अग्रलेखाच्या माध्यमातून प्रबोधचंद्रिकेने गोव्यातील सूक्ष्म सूक्ष्म घटनेची नोंद घेतली आहे. एवढेच नव्हे तर खान्देशातील गोवा मुक्तीसाठी जाणारे सत्याग्रही, नेते, नवतरुण यांच्या कार्याची दखल, सभा, भाषणे, जागतिक घडामोडी, परदेशी वार्ताहर यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेत विशेष स्वरूपात दिसून येते. स्थानिक इतिहासाच्या (Local History) अभ्यासातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय इतिहासाची सुरुवात असते. साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेने हीच भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने टिकवून ठेवल्याची दिसते.
Goa Mukti Aandolanat Saptahik Prabodhchandrikechi Bhumika
1. गोव्याचा वाढता धोका
2. पोर्तुगालला धडा शिकवावयास हवा
3. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर…
4. तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परि…
5. स्वातंत्र्यवीर हेमंत सोमण
6. नगरहवेली भाग तरी ताब्यात घ्या.
7. हेमंतकुमारला जळगांवकरांची श्रद्धांजली
8. मिळतील त्या साधनांनी गोव्यात घुसा.
9. अखंड भारताच्या जागृत प्रेरणेने…
10. जनसंघाचे गोवा सत्याग्रही
11. काश्मीरनंतर गोमंतक मुक्तिसाठी झगडणारे
12. पत्रादेवीच्या परिसरात…
13. सौ. सुधाताईंचे स्वागत
14. पोर्तुगीजांबद्दल पाकिस्तानची आस्था
15. आता माघार नको…!