छत्रपती शिवाजी महाराज : एक राष्ट्रनिर्माते
Chhatrapati Shivaji Maharaj : A Nation Builder
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
शिवपूर्वकाळ व शिवकाळातसुद्धा इस्लामी शासकांच्या अन्यायांनी, अत्याचारांनी कहर केला होता. ते पदोपदी हिंदू बहुजन समाजाला पायदळी तुडवीत. हिंदू बहुजन, कष्टकर्यांना, शेतकर्यांना कोणीही वाली नव्हता. हिंदू स्त्रियांची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाई. हिंदू समाज परक्यांची चाकरी पत्करण्यात स्वत:ला धन्य समजत होता. महाराष्ट्रातील मराठ्यांजवळ पराक्रम होता, शौर्य होते, कष्ट करण्याची, प्रसंगी जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्याची धमक होती. परंतु त्यांच्यात एकी नव्हती. शहाजी राजे, जिजाबाई व छत्रपती शिवाजी महाराजांनी आपापसात झगडणार्या, वतनासाठी व क्षुद्र स्वार्थासाठी एकमेकांचा खून व मारामार्या करणार्या, मुसलमानी सत्तांची सेवा-चाकरी करण्यात स्वतःला धन्यता मानणार्या मराठा सरदारांसोबतच सर्वसामान्य मराठी माणसांनाही एकत्र आणले. प्रसंगी साम, दाम, भेद, दंड या नीतीचा अवलंबही केला. शिवाजी महाराजांनी अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करून त्यांना स्वराज्यकार्यासाठी प्रेरित केले. अन्यायी, अत्याचारी इस्लामी आक्रमणाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. परिणामी बहुजन समाजातील सामान्य माणसांनी असामान्य कामगिरी केली. छत्रपती शिवरायांनी केलेले उदात्त कार्य भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा महामंत्र ठरले.
Chhatrapati Shivaji Maharaj : Eka Rashtranirmate
भाग 1 : छत्रपती शिवाजी महाराज – एक राष्ट्रनिर्माते
- मराठी सत्तेचा उदय : 1.1 शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीची महाराष्ट्र राज्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिस्थिती, 1.2 शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाबाई व दादोजी कोंडदेवांची भूमिका
- स्वराज्य बांधणी : 2.1 स्वराज्याची किंवा हिंदवी स्वराज्याची संकल्पना, 2.2 मावळा व मावळ प्रांत, 2.3 रायरेश्वराची शपथ
- शिवाजी महाराज आणि आदिलशाही संबंध : 3.1 जावळी प्रकरण, 3.2 प्रतापगडची लढाई
- शिवाजी महाराज आणि मुघल संबंध : 4.1 शाहिस्तेखानावरील छापा, 4.2 सुरतेची लूट, 4.3 मिर्झाराजे जयसिंहाची मोहिम, पुरंदरचा तह
भाग 2 : शिवाजी महाराजांची लष्करी पद्धती
- शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याचे संघटन : 1.1 पार्श्वभूमी, 1.2 मराठा सैन्याची रचना, 1.3 शिवाजी महाराज एक लष्करी नेता
- शिवाजी महाराज : गनिमी नेता : 2.1 गनिमी कावा किंवा गनिमी युद्धपद्धतीची संकल्पना, 2.2 शिवाजी महाराज एक गनिमी नेता, 2.3 गनिमी काव्याची तत्त्वे आणि गनिमी काव्याची वैशिष्टे
- शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील किल्ल्यांचे संघटन : 3.1 किल्ल्यांचे महत्त्व, 3.2 किल्ल्यांची रचना, 3.3 शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले, 3.4 शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले
- शिवाजी महाराज : भारतीय नौदलाचे जनक : 4.1 शिवाजी महाराज भारतीय नौदलाचे जनक, 4.2 नौदलाच्या विकासातील शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, 4.3 शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील जहाज बांधणी, 4.4 शिवाजी महाराजांच्या काळातील सागरी किल्ल्यांना असलेले महत्त्व
भाग 3 : स्वराज्याचा विस्तार, महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध
- शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार – कर्नाटक मोहिम : 1.1 कर्नाटक मोहिमेची कारणे किंवा हेतू, 1.2 कर्नाटक मोहिमेचे सामरिक महत्त्व, 1.3 कर्नाटक मोहिमेतील महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन किंवा महाराज : एक मुत्सद्दी म्हणून मूल्यमापन, 1.4 कर्नाटक मोहिमेतील महाराजांच्या सेनापती म्हणून कामगिरीचे मूल्यमापन
- शिवाजी महाराजांच्या कामगिरीचे मूल्यमापन : 2.1 छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील अनेक सेनानींशी तुलना, 2.2 शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे मूल्यमापन, 2.3 शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचे मूल्यमापन
- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध : 3.1 संभाजी महाराजांचे कार्य, 3.2 राजाराम महाराजांचे कार्य, 3.3 महाराणी ताराबाईंचे कार्य, 3.4 संताजी व धनाजीचे स्वराज्याच्या कार्यातील योगदान