जलावरण
Hydrosphere
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
जगामध्ये मानवी वस्तीस्थाने जलाभोवतीच आहेत. सागर आणि महासागर नैसर्गिक संपत्तीचे मोठे, अक्षय भांडार आहे. संपूर्ण सागर जलाचे चक्र, पृथ्वीची उत्पत्ती, खंडपरिवहन इत्यादी सर्व बाबी विचारात घेतल्या तर पृथ्वीवरील महासागराचे अस्तित्व न संपणारे आहे. सागर विज्ञानातूनच सागरासंबंधी यथायोग्य माहिती प्राप्त होते. सागर विज्ञानामुळेच पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये सागर विज्ञानाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 17 व्या शतकामध्ये सागर विज्ञानाची वैज्ञानिक स्तरावर अभ्यासाला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सागरा संदर्भातील सर्वच बाबीवर लक्ष देवून संशोधन झाले. सागराचे आर्थिक महत्व स्पष्ट झाले. जलभागातील तापमान, प्रदूषण, वादळ-वारे, पाऊस इत्यादी सर्वांचा सजीवांच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे.
प्रस्तुत पुस्तकात सागरीय भूमी स्वरूपे, सागरजल गुणधर्म, सागरजलाच्या हालचाली, सामुद्रिक निक्षेप आणि प्रवाळ बेटांचा अभ्यासाचा यथायोग्य समावेश केलेला आहे.
Jalavaran
- जलावरण आणि सागरीय भू-स्वरूपे ओळख : जलावरण : अर्थ व संकल्पना, आधुनिक युगातील जलावरणाच्या अभ्यासाचे महत्व, सागरतळरचना, भूस्वरूपे : अटलांटिक महासागर, हिंदी महासागर.
- सागरीजल गुणधर्म : क्षारता : व्याख्या, समुद्रीजलक्षारतेची रचना, समुद्री जलाच्या क्षारता वितरणावर परिणाम करणारे घटक, क्षारतेचे वितरण-खुला महासागर, अंशतः बंदिस्त समुद्र, अंतर्गत समुद्र आणि सरोवरे, तापमान : महासागरीय जलतापमानाचे वितरण-उभे, आडवे, घनता : महासागरीय जलघटनतेची व्याख्या, वैशिष्ट्ये, महासागरी जलघटनेवर परिणाम करणारे घटक
- सागरजलाच्या हालचाली : लाटा : व्याख्या, स्वभाव गुणधर्म, लाटा तुटणे, त्सुनामी लाटा व्याख्या, वैशिष्ट्ये, सागरी प्रवाह : व्याख्या, प्रकार, गुणवैशिष्ट्ये, निर्मितीची कारणे, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर यामधील समुद्र प्रवाह, समुद्री प्रवाहाचे परिणाम
- सामुद्रिक निक्षेप आणि प्रवाळ बेटे : सागरीय निक्षेप : अर्थ, वर्गीकरण, निर्मिती-वर्गीकरण, टेरेजिनीअस, बायोजिनीअस, हायड्रोजीनीअस, कास्मोजिनीअस-अर्थ आणि उदाहरणे, प्रवाळ भूरूपे : व्याख्या व निर्मिती, प्रकार, सागरसिंधू, टेरेपॉड सागरसिंधू, ग्लोबीजेरिना सागरसिंधू, रेडियोलेरियन सागरसिंधू, डॉयटॉम सागरसिंधू, तांबडी माती, प्रवाळ खडक, परातटीय प्रवाळ खडक, बाधक प्रवाळ खडक, अॅटॉल प्रवाळ खडक, ग्रेटबॅरियर रिफ