तान्हूले तू आलीस खरी
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
कवी शशिकांत बारी हे एक बहुआयामी कवी आहेत. भारतातील पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्रीच्या मार्गात असंख्य काटे पेरलेले आहेत. भारतीय संविधानाने स्रीला स्वातंत्र्य दिले. परंतु येथील सद्यस्थितीत समाज व्यवस्था ते स्वीकारायला तयार नाही. स्रीयांच्या याच प्रश्नांनी कवी व्यथित झालेले दिसतात. बेभरोसा पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्नं उद्ध्वस्त होवून ते सावकारीचा फास गळ्यात टाकतात. एक संवेदनशील बापही त्यांच्या शब्दांमधून डोकावतांना दिसतो. कवीची नजर चौफेर फिरत आहे. समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवर ते चिंतन करीत आहेत. कवी शशिकांत यांच्या कवितेत बहुजन मुक्तीची आस आहे. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीप्रति प्रचंड निष्ठा आहे. त्यांच्या मनात येथील उपेक्षितांना न्याय देण्याची तळमळ आहे. त्याच तळमळीतून त्यांचा हा कवितासंग्रह एल्गार करतो. जवळपास अडतीस कविता असलेल्या काव्यसंग्रहात मुक्त छंदातील रचना अधिक आहेत. चळवळीच्या विषयांव्यतिरिक्त प्रेमाच्या काही कविताही या संग्रहात पाहायला मिळतात.
– प्रा. भरत आ. शिरसाठ
Tanhule Tu Aalis Khari
1. माँ जिजाऊ, 2. तान्हुले तू आलीस खरी, 3. बाबा सांगा ना?, 4.माझी छोटीशी परी, 5. अहो कुठं गेलात तुम्ही…?, 6. भाऊराया, 7. आठवांचा गाव, 8. सण, 9. फक्त, 10. होय! मी गुन्हेगार, 11. कोंदणात, 12. मी ओळखून आहे, 13. डोह, 14. जन्मो जन्मी… (गझल), 15. दैव, 16. बरे झाले कृष्णा, 17. देवा तुझ्या करणीला…!, 18. होय! मी शाळा बोलतेय, 19. (कोरोना काळातील शाळा), 20. अरे आभायातल्या बापा, 21. मी ठरवलंय, 22. बरस रे पावसा…!, 23. मागे सोडून जा नाव, 24. कचऱ्यावाला, 25. चीड, 26. थांबव तु सरींना, 27. शाळा मास्तर मी, 28. जगावं कसं..?, 29. माय आपण कोण गं?, 30. छान दिसतं..!, 31. आनंद आनंद, 32. पिचकारी, 33. मह्या गावची माटी, 34. क्रांतीसुर्य, 35. लाज वाटते मला, 36. झुंज, 37. संकटेश्वर, 38. रुतलेला काटा, 39. पुन्हा एकदा..?