तृषार्त - तृप्त
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
कविता म्हणजे स्वानुभूतीचे भोगलेले शब्द! हे शब्दच भावना, विचारांनी आणि आत्मगत कल्पनांनी भारले की त्यांच्या ओळी होतात. काही तरी सुख-दु:खाच्या गोष्टी सांगायची उर्मी प्रकट झाली की ती शब्दातून अर्थपूर्ण उतरते. उत्तर आयुष्यात सेवानिवृत्तीनंतर या भावना अधिक गडद होत जातात. मागच्या आठवणींचा बांध फुटून भळभळ वाहू लागतो. त्या स्मृतींची पाने चाळता चाळता सभोवतालचा समाज, निसर्ग, माणसे आणि काळ यांचा ऋणानुबंध कसा विणला गेला याचे प्रत्यंतर अभिव्यक्त करण्याची जागा म्हणजे कवी दत्तात्रय कडू लोहार (द्वारकासुत) यांच्या दृष्टीने ‘कविता’ असते. अंतरीचे बोल शब्दात प्रकट होताना पूर्व संस्कार आणि शिक्षक म्हणून जोपासलेल्या सर्व प्रक्रियांची अनुभूती सहजपणे मांडून व्यक्त होणार्या या कविता आहेत. पूर्वायुष्यातील कष्ट, वेदना, दु:ख तसेच जीवनाकडे पाहण्याची आशादायी दृष्टी आता उत्तरार्धात कशी तृप्त, संपन्न होत गेली त्या आठवणींच्या ह्या कविता आहेत. आत्मगत अशा स्वनिष्ठेच्या आणि संस्कारित अशा समाजनिष्ठेच्या जाणिवांच्या कविता म्हणजे अनुभूतीचे बोल म्हटले पाहिजे.
Tushart Trupta