त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर
Authors:
ISBN:
₹70.00
- DESCRIPTION
- INDEX
‘त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर’ हे सुंदर पुस्तक वाचकांसमोर आणल्याबद्दल लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खरे तर रमाईच्या त्यागावर आज तुमचे आणि आमचे सुंदर जीवन सजलेले आहे. तुम्ही आणि आम्ही खात असलेली भाकर ही रमाईने तयार केलेली आहे. आमचे वैभव हे रमाईच्या प्रचंड अश्रुंनी मिळालेली किंमत आहे. तुमचे-आमचे ऐश्वर्य हे रमाईच्या चार मातीत गेलेल्या लेकरांमुळे आहे. म्हणून रमाईचा त्याग आपण कधीही विसरायला नको. लेखिका वर्षा भरत शिरसाठ यांनी हे सारे आपल्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये सुंदर पद्धतीने गुंफलेले आहे. रमाईच्या लेकरांच्या जाण्याचा प्रसंग हा हृदय पिळवटून टाकतो. डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागतात. पुस्तक पुढे जाऊन आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. रमाईच्या त्यागमय जीवन प्रवासात पुस्तिका कशी संपते, हे आपल्याला सुद्धा कळत नाही. या सुंदर पुस्तिकेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, हे आवाहन करतो व वर्षा शिरसाठ यांना पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो !
– प्रा. शुक्राचार्य गायकवाड
Tyagamurti Mata Ramabai Ambedkar
1. रमाईचं बालपण
2. रमाई भिमरावांची जोडीदारीण झाली
3. संकटांची मालिका
4. रमाईची धैर्य परीक्षा
5. भिमरावाचा श्वास-रामू
6. दिन-दुबळ्यांची माता
7. भीमाची सावली
8. दिव्याची वात ‘रमाई’