दक्षिण आशिया आणि भारत-अमेरिका संबंध
South Asia and India-US Relations
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
राष्ट्रीय अखंडता, सार्वभौमत्व, नितीमूल्यांचे संरक्षण तसेच बाह्य आक्रमणांचा प्रभावी प्रतिकार, सर्व राष्ट्रांच्या सुरक्षा धोरणाचे मुख्य ध्येय असते. 20 व्या शतकाच्या शेवटच्या दशकात सोव्हिएत संघाचे विघटनामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरण तसेच जगातल्या शक्तीच्या राजकारणावर व्यापक असा प्रभाव पडला. अमेरिकी नेतृत्वात स्थापन झालेली एक ध्रुवीय जागतिक प्रणालीमुळे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक परिवर्तन, अव्यवस्था तसेच असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले. शीतयुद्धाच्या समाप्तीचे फलस्वरूप आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेच्या समोर नविन आव्हाने निर्माण झाली. त्याचबरोबर प्रादेशिक संघर्षांनाही प्रोत्साहन मिळाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामिक कट्टरपंथियांचा उदय तसेच दहशतवादाचे ध्रुवीकरण एका शक्तीकेंद्राच्या रुपाने अमेरिकी प्रभुत्वास आव्हान देताना दिसत आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिकरणात बदल झाल्याचे दिसते. भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चारवेळा पराभूत केले. 2017 मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामवरून संबंध ताणले गेले तर दुसरीकडे बांग्लादेश, नेपाळ व श्रीलंकेबरोबर भारताचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. सद्य:स्थितीत भारताने आपल्या अलिप्ततावादी भूमिकेला तिलांजली दिलेली असून आज भारत महाशक्ती बनण्याकडे वाटचाल करीत असून महाशक्ती अमेरिकेने देखील भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. भविष्यात भारत-अमेरिका युती आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, यात आता शंका राहिलेली नाही.
Dakshin Aashiyache Aani Bharat-Amerika Sambandha
1. दक्षिण आशियाचे भौगोलिक, आर्थिक, भू-सामरिक तसेच आर्थिक स्वरुप :
दक्षिण आशियाचे भू-सामरिक व भू-राजनीतिक स्वरुप
भारत – भारताचे स्थान व विस्तार, हवामान, आर्थिक स्वरुप, विदेशी व्यापार, सांस्कृतिक घटक, लोकसंख्या, धर्म, भाषा, हिंदी महासागर आणि भारतीय सुरक्षा
पाकिस्तान – पाकिस्तानचे भौगोलिक स्वरुप, वनस्पती आणि जीवजंतू, पाकिस्तानची अर्थव्यवस्था, लोकसंख्या, पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण, पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय संबंध
बांग्लादेश – स्थान व विस्तार, जमिन व हवामान, आर्थिक स्थिती, कृषी उत्पादन, उद्योग, सांस्कृतिक स्थिती, भाषा, धर्म, बांग्लादेशाचे परराष्ट्र धोरण
नेपाळ – स्थान, विस्तार, जमिन व हवामान, आर्थिक स्थिती, कृषी उत्पादन, उद्योग, सांस्कृतिक स्थिती, भाषा, धर्म, परराष्ट्र धोरण
भूतान – स्थान, विस्तार, जमिन व हवामान, आर्थिक स्थिती, कृषी उत्पादन, उद्योग, सांस्कृतिक स्थिती, भाषा, धर्म, परराष्ट्र धोरण
श्रीलंका – स्थान, विस्तार, जमिन व हवामान, आर्थिक स्थिती, कृषी उत्पादन, उद्योग, सांस्कृतिक स्थिती, भाषा, धर्म, परराष्ट्र धोरण
मालदीव – स्थान, विस्तार, जमिन व हवामान, आर्थिक स्थिती, कृषी उत्पादन, उद्योग, सांस्कृतिक स्थिती, भाषा, धर्म, परराष्ट्र धोरण
2. दक्षिण आशियातील ज्वलंत सुरक्षा आव्हाने आणि बाह्य शक्तीची भूमिका :
काश्मीर समस्या – काश्मीर समस्येची ऐतिहासिक पार्श्वभूमी, काश्मीरची भौगोलिक स्थिती, काश्मीर समस्येची कारणे, काश्मीर समस्येसंदर्भात भारत-पाक युद्ध (1947), कलम 370 चे औचित्य, कलम 370 च्या समाप्तीतच काश्मीर प्रश्नाची मुक्तता, सुरक्षा परिषदेद्वारे समस्या सोडविण्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषा
दहशतवाद – दहशतवादाचा वाढता प्रभाव, काश्मीरमधील आय.एस.आय.ची भूमिका, जम्मू-काश्मीर मध्ये सक्रिय दहशतवादी संघटना, जम्मू-काश्मीरमधील मुख्य दहशतवादी घटना, काश्मीरमधील घुसखोरीचे नविन मार्ग, दहशतवादासाठी वित्त व्यवस्था, दहशतवादी अभियानांमध्ये खर्च केले जाणारे धन
आण्विक दहशतवाद तसेच आण्विक युद्धाचा वाढता धोका – शांती व सुरक्षेला प्रभावित करणारे घटक तसेच विकल्प
तामिळ-सिंहली संघर्ष – संघर्षाचे कारण, तामिळ ईलम मुक्ती वाघ (एलटीटीई), लिट्टेची स्थापना, भारताचा हस्तक्षेप, संघर्ष, गृहयुद्धाचा घटनाक्रम, हल्ल्याचा प्रतिरोध, शेवटचा संग्राम
शस्त्रास्त्रांचा अवैध व्यापार तसेच मादक पदार्थांची तष्करी
हिंदी महासागर क्षेत्रातील शक्ती स्पर्धा – सुवेझ कालवा, फारसची खाडी, बाब-अल-मंडेव, मलाक्काची समुद्रधुनी, हिंदी महासागरात जगातील महाशक्तींचे अड्डे : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रांस, चीन; हिंदी महासागरातील चीनी आकर्षण
3. शीत युद्ध काळात भारत-अमेरिका संबंधांचे स्वरुप तसेच त्यांचे सामरिक आणि आर्थिक विश्लेषण :
शीतयुद्धाचे स्वरुप-विस्तार, भारत-अमेरिका संबंध, शीतयुद्ध काळात भारत-अमेरिका संबंध, अमेरिका-पाकिस्तान संबंध आणि भारत, अमेरिकेकडून साम्यवादाचा विरोध, गोवा समस्या, भारत-चीन सीमा युद्ध (1962), भारत-पाकिस्तान युद्ध (1965), इंदिरा गांधी आणि भारत-अमेरिका संबंध, बांग्लादेश संकटानंतर भारत-अमेरिका संबंध, अफगाणिस्तानातील सोव्हिएत हस्तक्षेप आणि भारतीय सुरक्षा स्थिती
4. अमेरिका-पाकिस्तान सामरिक आणि आर्थिक संबंध यांचा भारतीय सुरक्षेवरील प्रभाव :
पाकिस्तानचा ‘सीटो’ आणि ‘सेंटो’मध्ये प्रवेश, बांगला मुक्ती संघर्ष तसेच पाकिस्तान-अमेरिका संबंध (1971), अफगाणिस्तानातील संकट तसेच पाक-अमेरिका सामरिक सहकार्य, पाकिस्तान-अमेरिका आण्विक सहकार्य : राजनीतीक व कुटनीतीक, प्रेसलर व ब्राऊन संशोधन आणि अमेरिकेची महत्त्वकांक्षा
5. नविन आंतरराष्ट्रीय शक्ती-संतुलनात दक्षिण आशियाची भूमिका आणि भारत-अमेरिका संबंधांचे बदलते स्वरुप :
शीतयुद्धोतरकालीन सामरिक संदर्भात भारत-अमेरिका संबंधांचे पैलू, युद्धनितीक संबंध, आण्विक धोरण आणि भारत-अमेरिकेच्या आण्विक संबंधाच्या बाबी, भारताची आण्विक यात्रा, भारताचे पहिले अणु परिक्षण, पोखरण-2, भारताचा आण्विक सिद्धांत, आण्विक कराराचे आकलन