दलित साहित्याचे बहुविध आयाम
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मजागृतीचा जो वसा दिला, त्यातून दलित समाजातील नवशिक्षित तरुण आपले प्रश्न, समस्यांना लेखनाच्या माध्यमातून उजागर करू लागला. आपल्यावर व समाजावर होणार्या अनन्वित छळाचा व अन्यायाचा प्रतिकार करू लागला. आपल्या जगण्याला, प्रश्नांना तो साहित्यातून कलात्मक रूप देऊ लागला. त्यातूनच दलित जीवनजाणिवा अभिव्यक्त करणारे साहित्य निर्माण झाले. 1960च्या दशकानंतर या साहित्याने एका चळवळीचे, प्रवाहाचे रूप धारण केले, तोच पुढे दलित साहित्याचा प्रवाह म्हणून विकास पावला. या साहित्यातून दलित समाजाच्या सर्व अंगोपांगांचे, त्यांच्या प्रश्नांचे, हक्क, न्याय, समानतेच्या मागणीचे संदर्भ त्यांच्या खास अशा भाषिक व्यवस्थेतून जीवनजाणिवांसह चित्रित झाले आहेत. दलित साहित्य हे व्यक्तीच्या जगण्याला प्रतिरोध करणार्या व्यवस्थेच्या विरोधात निर्माण झालेले साहित्य आहे. जगण्याच्या धडपडीला अर्थ मिळवून देणारे, माणसाचे माणूसपण सिद्ध करण्यासाठी, परंपराधिष्ठित व्यवस्थेला आपल्या जगण्याविषयीचे प्रश्न विचारणारे, मानवी मूल्यांचा पाठपुरावा करणारे, साहित्य म्हणून दलित साहित्याने मराठी साहित्यविश्वातच नव्हे, तर जागतिक साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वंचितांचे, पीडितांचे, अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे साहित्य म्हणून दलित साहित्याचा झालेला गौरव विश्वविख्यात आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही ‘भारतीय भाषांतील दलित साहित्य’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. मराठी भाषेतून आलेल्या संशोधक विद्यार्थी, महाविद्यालयांतील प्राध्यापक व अभ्यासकांचे लेख या पुस्तकात समाविष्ठ करत आहोत. मराठी दलित साहित्याच्या बहुविध आयामांचा वेध घेणारे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत.
स्वतःचे अस्तित्व स्वतःच्या बळावर टिकवणारा एक सकस साहित्यप्रवाह म्हणून दलित साहित्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. या साहित्यप्रवाहातील लेखनप्रकारांची चर्चा व्हावी ही मराठी भाषाविभागाची भूमिका होती. यानिमित्ताने जाणते अभ्यासक, नवोदित अभ्यासक व संशोधक यांचे विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. दलित साहित्यातील साहित्यप्रकारांची चर्चा, त्यांतील निवडक नोंदी, या साहित्याच्या आकलनाच्या दिशा यांसंदर्भात विविध अभ्यासकांच्या निबंधांना येथे स्थान दिले गेलेले आहे. या अर्थानेच ‘दलित साहित्याचे बहुविध आयाम’ नवोदितांसमोर येतील.
(संपादकीय मधून)
Dalit Sahityachea Bahuvid Ayam
- दलित स्त्रियांचे लेखन : दलितत्व आणि स्त्रीत्व यांचा दुपेडी संघर्ष – डॉ. आशुतोष पाटील
- मराठी दलित कविता – डॉ. वासुदेव एस. वले
- दलित साहित्यातील वैचारिक लेखन : एक िंचंतन – डॉ. युवराज श्री. मानकर
- मॉरिशसमध्ये दलित साहित्य शिक्षणाचे महत्त्व – डॉ. बिदन आबा
- दलित स्त्रियांच्या निवडक आत्मकथनांचा चिकित्सक अभ्यास – प्रा. डॉ. माधव बसवंते
- ‘आयदान’मधील भाषीक सौंदर्य : एक शोध – डॉ. गायत्री सोपान गाडेकर
- मराठी दलित आत्मकथनांची वाटचाल – डॉ. दत्तात्रय फलके
- गुजराती आणि पंजाबी दलित साहित्याचे स्वरूप – डॉ. ताहेर एच. पठाण
- युगानुयुगे तूच : डॉ.आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावरील दीर्घकाव्य – डॉ. राहुल भगवान चव्हाण
- ‘जागल्या’ कादंबरीमधील दलित वास्तव जीवन – डॉ. संजय पाटोळे
- दलित साहित्य आणि संत साहित्य : एक अनुबंध – डॉ. किरण प्रभाकर वाघमारे
- दलित कवितेची सद्यस्थिती – डॉ. समिता जाधव
- समकालीन दलित कविता – डॉ.अक्षय किशोर घोरपडे
- निळ्या डोळ्यांची मुलगी: स्त्री जाणिवांचा समकालीन भेदक आविष्कार – डॉ. योगिता आशुतोष पाटील
- तृतीय पंथीय शमिभाच्या काव्यातील दलित विद्रोह व नकार – प्रा. जयश्री रामदास बागुल (खरे)
- आंबेडकरी विचारातील साहित्य प्रवाह – प्रा. मोहन सौंदर्य
- दलित साहित्य स्वरूप आणि संकल्पना – डॉ. मोरेश्वर संतोष नेरकर
- दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र – डॉ. राजीव वैजनाथराव यशवंते
- मुस्लीम मराठी कवितेतील दलित जाणिवा – डॉ. युवराज देवबा भामरे
- मराठवाड्यातील दलित कथेची वैशिष्ट्ये – डॉ. रामचंद्र झाडे
- दलित साहित्याचा विशेष : मानवता – डॉ. नवनाथ अंगद शिंदे
- दलित कविंची जागतिकीकरणाविषयीची काही निरीक्षणे – डॉ. विजयेंद्र विश्वनाथ पाटील
- दलित साहित्य चळवळ : प्रेरणा व स्वरूप – डॉ. सोमनाथ दडस
- समकालीन दलित कविता – श्री. ज्ञानेश्वर अशोक तिखे
- दलित साहित्य मूल्यमापनाचे निकष – डॉ. उमा उत्तम काळे
- दलित साहित्याची प्रेरणा आणि तत्वज्ञान – प्रा. बालू मोहन तिखे
- मराठी भाषेतील निवडक दलित आत्मकथने – डॉ. रवींद्र रामचंद्र शिंदे
- ‘बलुतं’ या आत्मकथनातील स्त्री-प्रतिमा – श्री. योगेश जनार्दन शेलके
- हिंदी दलित साहित्याच्या प्रेरणा – प्रा. अरविंद भराडे
- दलित साहित्य उद्गम विकास आणि वाटचाल – कु. भावना मनोज तायडे
- दलित कविता : आंबेडकरवादी दृष्टीकोन – डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी
- दलित कविता : संवेदशीलता आणि आत्मप्रत्यय – डॉ. प्रज्ञा रा. निनावे
- दलित साहित्य आणि आदिवासी साहित्य : एक तुलना – श्री. निवृत्ती मारोतराव टार्फे
- आंबेडकरी चळवळ आणि दलित साहित्य – सोनाली लक्ष्मणराव इंगळे
- दलित साहित्याचे वैशिष्ट्ये – गणेश मदनराव शिंदे
- उन्हाच्या कटाविरूद्ध : नागराज मंजुळे यांचे शब्दशस्त्र – पल्लवी दिनकर जमधाडे
- 1990 नंतरची दलित कथा – ज्योत्स्ना इंगळे-नेरकर
- ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ : स्त्री मनाचा आक्रोश – प्रा. भाग्यश्री आर. पाटील
- दलित साहित्यातील काव्य वाङ्मय प्रकाराचे योगदान – डॉ. आकाश ब. पवार
- दलित साहित्याचे वेगळेपण – डॉ. महालक्ष्मी मोराळे
- दलित साहित्य : संकल्पना, स्वरूप आणि नव्या दिशा – प्रा. संभाजी गौतम पटाईत
- दलित साहित्याचे विशेष – श्रीमती मोनाली विलास रिपोटे
- दलित स्त्रियांची आत्मकथने : एक आकलन – प्रा. कैलास कळकटे
- दलित साहित्य आणि संत साहित्य – डॉ. अशोक उ. घोळवे, कृष्णा उत्तम नागरे
- दलित नाटकांचे समाज जागृतीतील योगदान – डॉ. राखी सिद्राम सलगर
- दलित साहित्याची पार्श्वभूमी – प्रा. संध्या जंजाळ
- प्रेमानंद गज्वी यांच्या नाट्यकृतीतील मानवी क्रौर्याचा शोध – अभिषेक राजेंद्र परब
- दलित आत्मकथने : समाज वास्तव आणि जीवनदृष्टिकोन – सुरवसे प्रकाश गणपती
- दलित साहित्य : एक दृष्टिक्षेप – स्वप्नील युवराज भोसले
- आंबेडकरी चळवळ आणि दलित साहित्य – सुरेश देवचंद शिरसाट
- दलित साहित्याचे विशेष – नेहा रतन बनसोडे
- दलित साहित्याची प्रेरणा आणि तत्त्वज्ञान – आण्णासाहेब हंबीराव सोनवणे
- दलित साहित्याचे स्वरूप-विशेष – सखाराम बाबूराव शिंदे
- जागतिकीकरण आणि दलित नाटक – अरुणा मानिक गायकवाड
- दलित आंदोलनामध्ये विविध समाजसुधारकांचे योगदान – सौ. अर्चना वैजनाथ घोडके (शिंदे)
- दलित साहित्यातील एक वाङ्मय प्रकार : आत्मकथन – दिपक रायभान कारके