दूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली
Remote Sensing & Geographical Information Systems
Authors:
ISBN:
₹130.00
- DESCRIPTION
- INDEX
दूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली ही आधुनिक माहिती तंत्राज्ञानाचा एक भाग असून भौगोलिक व पर्यावरणीय अभ्यासात या तंत्रज्ञानाची एक महत्वाची भूमिका व वाटा आहे. व त्यामूळे मानवी प्रगतीस मोठा हातभार लागत आहे. अत्याधुनिक अदयावत तंत्रज्ञानाने समृद्ध अशी विमाने व उपग्रह यांच्या साहायाने दूरसंवेदन तंत्राच्या माध्यमातून बहुमोल अशी माहिती प्राप्त होवू लागली. तसेच भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून पृथ्वीवरील पर्यावरणीय व परिस्थितीकीय प्रक्रियांचे मापन करणे, भूपृष्ठीय वातावरणीय आणि जैविक घटकांसंबंधी सांख्यिकी माहिती मिळवणे सुकर झाले. या तंत्रज्ञानात मानवाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहाद्वारे पृथ्वीचे सतत चित्रण सुरू असते. या चित्रणाची नोंद पृथ्वीवरील केंद्रामध्ये होत असते. पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील दूरवरची माहिती विद्युत चुंंबीय लहरींमार्फत उपग्रहांवर बसविलेल्या कॅमेरांद्वारे व स्कॅनरद्वारे चित्रीत केली जाते. दूर संवेदन हे एक तंत्रज्ञान असून त्याद्वारा भूपृष्ठावरील घटक किंवा वस्तूंच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यासंबंधींची माहिती मिळवणे, संकलीत करणे व त्यावरून त्या घटकाचे किंवा वस्तूंचे यथायोग्य वर्णन करणे या तंत्रास सर्वसाधारणपणे दूर संवेदन असे म्हणतात.
Dur Sanvedan Aani Bhaugolik Mahiti Pranali
- दूर संवेदन-परिचय : 1.1 दूर संवेदन-प्रस्तावना, व्याख्या व अर्थ, 1.2 दूर संवेदनाचे स्वरूप व व्याप्ती, 1.3 दूर संवेदनाचे प्रकार, 1.4 दूर संवेदनाची मूलतत्वे, 1.5 दूर संवेदनातील प्रक्रिया, 1.6 उपग्रह प्रतिमा, 1.7 हवाई छायाचित्रे
- क्रियाशिल व निष्क्रीय दूर संवेदन : 2.1 क्रियाशिल दूर संवेदन, 2.2 हवाई छायाचित्रांची मुलभूत भौमितीय वैशिष्ट्ये, 2.3 द्विरूक्ती, 2.4 हवाई छायाचित्रांचे प्रकार, 2.5 छायाचित्रांचे प्रमाण, 2.6 हवाई छायाचित्रांचे सरासरी प्रमाण, 2.7 विद्युत चुंबकीय वर्णपटाचे तरंग लांबीप्रमाणे विभाग, 2.8 उपग्रहांचे प्रकार, 2.9 उपग्रहांचे कार्य, 2.10 भारतीय संशोधन संस्थेची अलिकडील प्रगती
- हवाई छायाचित्रांचे वाचन व विश्लेषण आणि दूर संवेदनाचे उपयोजन : 3.1 हवाई छायाचित्राचे वाचन व विश्लेषणासाठी आवश्यक उपकरणे, 3.2 हवाई छायाचित्रे वाचनाची प्रमुख अंगे, 3.3 दूर संवेदनाचे विविध क्षेत्रातील उपयोजन
- भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय : 4.1 व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, 4.2 भौगोलिक माहिती प्रणालीची घटक, 4.3 भौगोलिक माहिती प्रणालीचा विकास, 4.4 जीआयएस सॉफ्टवेअरचे प्रकार
- भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन : 5.1 भौगोलिक माहिती प्रणाली उपयोजनाचे प्रकार, 5.2 भौगोलिक माहिती प्रणालीचे विविध क्षेत्रातील उपयोजन, 1. कृषी क्षेत्रातील उपयोजन, 2. जंगल क्षेत्रातील उपयोजन, 3. आपत्ती क्षेत्रातील उपयोजन, 4. साधनसंपदा क्षेत्रातील उपयोजन, 5. वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील उपयोजन, 6. संरक्षण क्षेत्रातील उपयोजन, 7. व्यवस्थापन क्षेत्रातील उपयोजन, 8. पाणलोट क्षेत्रातील उपयोजन