देवाचिये द्वारी
श्री. उद्धव पुंडलिक कुलकर्णी यांच्या कवितांचा संग्रह
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले देवाचे द्वार आणि त्यांच्या हरिपाठाचे निरुपण वरनिर्देशित अर्थात सामावलेले आहेत. कवि प्रतीभारूप काव्यसाधना करत असतांना, आर्त अलौकिक प्रेमाने त्याची आळवणी करत असतांना देवाच्या दाराशी उभा असतो. त्याच इप्सित पूर्ण होण म्हणजे कविच वेिशरूप परमेेशराशी एकरूप होण; त्याच्या अनादिअनंत वेिशात मिसळून जाण होय. मायेच्या पसाऱ्यातून मुक्त होऊन परब्रह्म्याशी तादात्म्य पावण होय.
Devachiye Dwari
1. रूप गणेशाचे
2. गणपती बाप्पा आले द्वारा
3. नृत्य
4. प्रार्थना शारदेची
5. गायन सरस्वतीचे
6. लक्ष्मी स्तवन
7. अंतर रामायण
8. अंगाई
9. रामाचा कौसल्येला निरोप
10. कौशल्येची प्रतिक्रिया
11. कौसल्येची भेट
12. उर्मिलेचे स्वगत
13. कैकेयीचा हट्ट
14. लक्ष्मणाची चिंता
15. भरत भेट
16. आश्रमी येता राघव
17. जांबवंताचे कथन
18. अंगद शिष्टाई
19. मंदोदरीचे रावणास मागणे
20. रावणाचे त्यास उत्तर
21. मागणे
22. हनुमंताचे स्तवन
23. अहल्या
24. स्पर्शता पद श्रीरामाचे
25. वास्तविकता
26. आरती तापी आईची
27. तापी माई
28. संगमावरचे गाणे