नागरी भूगोल
Urban Geography
Authors:
ISBN:
₹495.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रा. डॉ. सावन माणिकराव देशमुख, (एम.ए., एम.फील, पीएच.डी.), भारतीय महाविद्यालय, मोर्शी, जि. अमरावती येथे भूगोल विभाग प्रमुख म्हणून 11 वर्षापासून कार्यरत आहे व येथे पदवी स्तरावर अध्यापनाचे कार्य करीत आहे. यांची पीएच.डी. ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर या विद्यापीठाची असून ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती. येथे भूगोल पीएच.डी.चे मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनेक संशोधन निबंध हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहे.
डॉ. सावन देशमुख यांना 2013 साली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे “मानद वन्यजीव रक्षक” म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याचसोबत उअठड अमरावती व झऋअ अमरावती संस्थे अंतर्गत ते बऱ्याच पर्यावरण अध्ययन आणि वन्यजीव संवर्धनाचे कार्य निरंतर सुरु आहे.
- नागरी भूगोल : नागरी भूगोलाच्या व्याख्या, नागरी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, नागरी भूगोलाचे उद्देश, नागरी भूगोलाचा इतर विषयाशी असणारा संबंध, नागरी भूगोलाचे जागतिक स्तरावरील अध्ययन, नागरी भूगोलाचे भारतीय स्तरावरील अध्ययन, विविध देशातील नागरी भूगोलाचे परंपरागत पद्धतीचे अध्ययन.
- नगर म्हणजे काय? नगरांचे महत्त्व, नगरांची विविध प्रारूपे, नगरांचे स्थान व नगरांची स्थिती : नगर म्हणजे काय?, नगरांचे महत्त्व, नगरांची विविध प्रारूपे, नगरांचे स्थान, नगरांची स्थिती.
- नगर निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्पत्तीचे कालखंड (बॅराक नगर योजना) व नगर विकासाच्या अवस्था : नगर निर्मिती, नगरांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नगर उत्पत्तीचे कालखंड, बरॉक नगर योजना, नगर विकासाच्या अवस्था.
- नागरीकरण – कल आणि स्वरुप : नागरीकरण म्हणजे काय?, नागरीकरणाचा कल, नागरीकरणाचे आधुनिक मत, भारतातील नागरीकरणाचा कल, नागरीकरणाचे घटक, नागरीकरण अभ्यासाचा विकास, नागरीकरण चक्र, जागतिक नागरीकरणाचे कालीक स्वरूप, जागतिक नागरीकरण वर्ष, जगातील प्रक्षेपित नागरी लोकसंख्या आणि त्यांचे भविष्यकालीन स्वरूप, नागरीकरणाचा प्रभाव, नागरीकरणाचे महत्त्व, भारतातील नागरीकरणाचे महत्त्व, नागरीकरणाचा सकारात्मक व नकारात्मक प्रभाव, नागरीकरणाचे उपाय, विश्व नागरी दिवस.
- महानगरीय क्षेत्र, बृहन्महानरीय क्षेत्र व विशाल महानगरे : महानगरीय क्षेत्र, बृहन्महानगरीय क्षेत्र / सन्ननगर, बृहन्महानगरीय क्षेत्राची उत्पत्ती व विकास, बृहन्महानगरीय क्षेत्राच्या निर्मितीची कारणे, बृहन्महानगरीय क्षेत्राची सामान्य वैशिष्टे, जगातील प्रमुख बृहन्महानगरीय क्षेत्रे, विशाल महानगर, विशाल महानगराची वैशिष्टे, जगातील प्रमुख विशाल महानगरे, विशाल महानगरीय समस्या, वैश्विक गांव/ग्राम संकल्पना, महानगरे व बृहन्महानगरीय क्षेत्रातील फरक.
- नगर आकारमिती व नगर संरचना : प्रस्तावना, नगर आकारमिती म्हणजे काय?, नगर आकारमितीवर परिणाम करणारे घटक, नगर आकारमितीचे प्रकार, नगर आकारमितीची तत्त्वे, नागरी कार्यात्मक आकारमिती, नगर आकारमितीची विकास प्रक्रिया, नगर आकारमितीचे सिद्धांत/प्रतिमाने, भारतीय नगर आकारमिती, भारतीय नगराच्या आकारमितीचे कारक, काही भारतीय नगरांची आकारमिती, नगर योजना किंवा प्रारूप, नगरांचे बाह्य स्वरूप किंवा नगरांचे आकार, नगरांचा उर्ध्ववत विस्तार, नागरी छेद.
- नागरी भूमी उपयोग : नागरी भूमी उपयोग, नागरी भूमी उपयोग – अर्थ, नागरी भूमी उपयोग – श्रेणी व वर्गीकरण, नागरी भूमी उपयोगाचे प्रारूप, भूमी मूल्यें, भूमी उपयोग परिमंडळ, नागरी भूमी उपयोग सिद्धांंत/प्रतिमान
नागरी भूमी उपयोगाचे सामान्य वर्गीकरण -निवासी क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र,
इतर भूमी उपयोग क्षेत्र - केंद्रीय स्थल सिद्धांत, नगर पदानुक्रम व नगर श्रेणी-आकार – नियम : केंद्रीय स्थल सिद्धांत संकल्पना, केंद्रीय कार्य, केंद्रियता, केंद्रीय स्थलाची निश्चितता व त्यांचे वितरण, केंद्रीय स्थल सिद्धांत – वॉल्टर क्रिस्टलार सिद्धांत, सिद्धांताचे स्पष्टीकरण व सिद्धांतावरील टिका, लॉशचा केंद्रीय स्थल सिद्धांत, क्रिस्टलार व लॉश यांच्या सिद्धांताची तुलना, फिलब्रिकचा सिद्धांत, पेरॉक्सचा सिद्धांत, केंद्रीय स्थल सिद्धांताचे महत्त्व, नगर पदानुक्रम, पदानुक्रम निर्धारित करणारे घटक, आधारभूत व अनाधारभूत कार्य, नगर पदानुक्रम करण्याच्या पद्धती, नगर श्रेणी-आकार-नियम, श्रेणी-आकार-नियम अध्ययनाचा विकास.
- नगरांची उपनगरे, उपांत किंवा झालर क्षेत्र, उपग्रह शहरे व स्मार्ट सिटी : उपनगरे संकल्पना, उपनगर क्षेत्राच्या सीमा व त्यांचे सीमांकन, गुणात्मक विश्लेषण पद्धती, संख्यात्मक विश्लेषण पद्धती, उपनगर क्षेत्राच्या सिमांकनाचे आधार, नागरी उपांत्य क्षेत्र किंवा झालर क्षेत्र, उपांत्य क्षेत्राचा विस्तार व विकास, उपांत्य क्षेत्राची वैशिष्टे, त्यांचे प्रकार, प्रमुख समस्या, भारतातील उपांत्य क्षेत्र, नगर केंद्रांची उपनगरे व उपनागरीकरण, उपनगरांचे सीमांकन, स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटीची निर्मिती, स्मार्ट सिटीचे उद्देश, स्मार्ट सिटीच्या सुविधा, स्मार्ट सिटी योजनेचे पायाभूत घटक, पॅनसिटी, उपग्रह शहरे किंवा अनुषंगी शहरे.
- नगरांच्या समस्या व नगर नियोजन : नगरांच्या समस्या, नगर नियोजन, नगर नियोजनाचे उद्देश, नगर नियोजनाचे आधारभूत घटक, नगर नियोजनाचे प्रकार, नगर नियोजनाची प्रमुख तत्त्वे, मुख्य आराखडा, मुख्य आराखड्यांचे उद्देश, राष्ट्रीय नागरीकरण नीती/धोरण, विश्व नागरी दिवस.