निवडक संविधाने आणि आंतरराष्ट्रीय संघटना
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
ग्रेट ब्रिटन, अमेरिका, चीन या देशांचे संविधान व दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क), यूनो यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. ग्रेट ब्रिटनच्या शासनव्यवस्थेत संविधानात्मक सुधारणा कायदा-2005 मंजूर केल्यानंतर या शासनव्यवस्थेतील संरचनामध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत. विशेषत: ‘हाऊस ऑफ लार्डस’ सभागृहाचे न्यायविषयक अधिकार नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयास देण्यात आले आहे तसेच या सभागृहाचा पदाधिकारी ‘लॉर्ड स्पीकर’ हे पदही निर्माण करण्यात आले आहे. संविधानात नवीन झालेल्या बदलांची नोंद या पुस्तकात घेण्यात आली आहे.
जगात आर्थिक व सामाजिक विकासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना (सार्क) दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. या संघटनेची उद्दिष्ट्ये, रचना आणि कार्याचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. तसेच यूनो संदर्भातही माहिती दिली आहे.
सदरील पुस्तकात ग्रेट ब्रिटनचे संविधान, ग्रेट ब्रिटनची संसदीय पद्धत, अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे कायदेमंडळ – काँग्रेस, दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना, चीनचे संविधान, चीनचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्र संघ, सुरक्षा परिषद : रचना आणि कार्य, भारत-चीन संबंध महत्त्वाचे वाद प्रश्न या घटकांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेला आहे.
Nivadak Savidhane Aani Antarrashtriya Sanghatna
- ग्रेट ब्रिटनचे संविधान : i) संविधानाची वैशिष्ट्ये, ii) राजपदाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, iii) राजपदाचे अधिकार, iv) पंतप्रधान – नेमणूक, कार्य आणि भूमिका
- ग्रेट ब्रिटनची संसदीय पद्धत : i) हाऊस ऑफ लॉर्डस : रचना, अधिकार आणि कार्य, ii) हाऊस ऑफ कॉमन्स : रचना, अधिकार आणि कार्य, iii) विरोधी पक्षाची भूमिका आणि छाया मंत्रिमंडळ
- अमेरिकेचे संविधान : i) संविधानाची वैशिष्ट्ये, ii) अमेरिकेचा अध्यक्ष – निवडणूक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य, iii) मंत्रिमंडळ – रचना आणि कार्य, iv) उपाध्यक्ष – निवडणूक प्रक्रिया, अधिकार आणि कार्य
- अमेरिकेचे कायदेमंडळ – काँग्रेस : i) सिनेट – रचना, अधिकार आणि कार्य, ii) प्रतिनिधी सभागृह – रचना, अधिकार आणि कार्य, iii) सर्वोच्च न्यायालय – रचना, अधिकार आणि कार्य
- दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य संघटना : i) उद्दिष्टे, ii) रचना, iii) कार्य
- चीनचे संविधान : i) चीनच्या संविधानाची वैशिष्ट्ये, ii) नॅशनल पीपल्स काँग्रेस, iii) स्थायी समितीः रचना, अधिकार आणि कार्ये
- चीनचे अध्यक्ष : i) चीनचे अध्यक्षः नेमणूक, भूमिका आणि कार्ये, ii) चीनची राज्य परिषदः रचना, अधिकार आणि कार्ये, iii) चीनमधील साम्यवादी पक्षाची भूमिका
- संयुक्त राष्ट्र संघ : i) संयुक्त राष्ट्र संघाची पार्श्वभूमी, ii) संयुक्त राष्ट्र संघाची सनद, ध्येये आणि मुलतत्वे, iii) संयुक्त राष्ट्र संघाचे घटक, अधिकार व कार्ये
- सुरक्षा परिषद : रचना आणि कार्य : i) सुरक्षा परिषद रचना, समित्या, कार्ये, ii) महासचिव : नेमणूक, अधिकार आणि कार्य
- भारत-चीन संबंध महत्त्वाचे वादप्रश्न : i) तिबेट वाद, ii) भारताविषयी संयुक्त राष्ट्र संघात चीनची भूमिका, iii) भारतीय अर्थव्यवस्थेवर चिनी वस्तु आणि बाजाराचा परिणाम