निवडक साहित्य आशय आणि आकलन
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
डॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील मराठी समीक्षेच्या प्रांतातील एक प्रतिथयश नाव आहे. त्यांचा हा पाचवा समीक्षाग्रंथ असून या पूर्वीचे ‘दया पवारांची कविताः आकलन आणि आस्वाद’, ‘दोन अर्वाचीन कवी’, ‘दशकाची निवडक काव्यसमीक्षा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक दिशा आणि दिशा’ हे चारही ग्रंथ वाचकप्रिय ठरले.
मराठी समीक्षेसाठी देण्यात येणार्या महाराष्ट्रातील नानाविध साहित्यसंस्थांच्या बावीस पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आजवर त्यांची चौदा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रस्तुत ‘निवडक साहित्य आशय आणि आकलन’ या समीक्षाग्रंथात नावाजलेल्या बावीस साहित्यकृतींची समीक्षा डॉ. अनंता सूर यांनी केली आहे. त्यामध्ये आठ काव्यसंग्रह, सहा कादंबर्या, दोन नाटके, चार आत्मकथने, एक चरित्रग्रंथ आणि एका कथासंग्रहाचा समावेश आहे.
1960 मधील उद्धव शेळकेंच्या ‘धग’ कादंबरीपासून तर अगदी अलिकडच्या 2021 मधील कवी कैलास दौंड यांच्या ‘आगंतुकाची स्वगते’ पर्यंतची समीक्षा यामध्ये आलेली आहे. या अर्थाने दलित आणि ग्रामीण साहित्यातील साहित्यकृतींच्या समीक्षेचा अनुबंध या नव्या ग्रंथातून वाचकांना अनुभवता येईल यात शंका नाही.
Nivdak Sahitya Aashay Aani Akalan
- वैचारिक परिपक्वतेचा आशय मांडणारा / काव्यसंग्रह : वाहत्या जखमांचा प्रदेश
- युगप्रवाही जाणिवेचा प्रेरणादायी / गझलसंग्रह : युद्धयात्रा
- जगण्याचे वास्तव संकेत उलगडणारा / काव्यसंग्रह : उजेड अंधार पिऊन घेतांना
- वास्तवदर्शी भूमिका सतेजपणे मांडणारी / कविता : दंगल आणि इतर कविता
- परिवर्तनाचे ध्यासपर्व उरात चेतविणारा / काव्यसंग्रह : युद्धशाळा
- युगप्रवाही जाणिवेचा संवाद टिपणारा / काव्यसंग्रह : माझ्या हयातीचा दाखला
- अवकाळी दिवसांची स्पंदने टिपणारा / काव्यसंग्रह : माती शाबूत राहावी म्हणून…
- अस्वस्थ मनाच्या नोंदी टिपणारा / काव्यसंग्रह : आगंतुकाची स्वगते
- ध्येयनिष्ठ स्त्रिच्या संघर्षाची परवड / उलगडणारी कादंबरी : धग
- बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब / मांडणारी कादंबरी : पांगिरा
- पाणीप्रश्नांच्या आकांताने जगण्यावर / भाष्य करणारी कादंबरी : तहान
- पारध्यांच्या भटकंतीचे आक्रंदन मांडणारी / कादंबरी : दर कोस दर मुक्काम
- वडारांच्या वेदनेंचे आक्रंदन / मांडणारी कादंबरी : पडझड
- बुद्ध आणि बाबासाहेबांच्या वैचारिक दिशेचे भान / देणारी कादंबरी : धर्म ते धम्म
- तत्त्वांसाठी सर्वस्व त्यागणार्या देशभक्ताची / गाथा : थँक यू मिस्टर ग्लाड
- मूल्यनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ स्त्रिची / सुखांतिका : आई रिटायर होतेय
- भूकेच्या जिवंत आणि दाहक चित्रणांची / गाथा : आठवणींचे पक्षी
- जननिष्ठ भूमिका आणि जीवनसंघर्ष / मांडणारे आत्मकथन : बिराड
- जगण्याचा संघर्षमय आशय चितारणारे / आत्मकथन : उसवलेले टाके
- संघर्ष आणि बेरोजगारीची व्यथा मांडणारे / आत्मकथन : परिस्थितीला दिवस जातात तेव्हा…
- कार्व्हरच्या जगण्यातील पैलू उलगडणारे / चरित्र : एक होता कार्व्हर
- सामाजिक जाणिवांचे क्षितिज रूंदावणारा / कथासंग्रह : अक्षरांची पहाट