पर्यटन भूगोल संकल्पना व व्यवस्थापन
Geography of Tourism
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
पर्यटक म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या मुख्य वातावरणाबाहेर एखाद्या सुट्टी, विश्रांती, करमणूक, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण किंवा इतर उद्देशांसाठी एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भेट देत आहे. पर्यटन हा व्यापारी उद्योग असल्यामुळे त्याचा समावेश आर्थिक भूगोलाच्या अध्ययनात केला जातो. निवास, भोजन, वाहतुक, मनोरंजन, मार्गदर्शन इ. उद्योग यांचा भूगोलशास्त्रीय द़ृष्ट्या पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाचा वाटा आहे. पर्यटनामुळे सामाजिक व सांस्कृतिक परिणाम होतात. नागरी विकास, भूमी उपयोजन, बांधकाम, वाहतुक, विस्तार इ. क्षेत्रातही पर्यटन भूगोलाचा उपयोग केला जातो.
लोकांचे अंर्तगत आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाहतुकीची साधने त्यातील बदल भूमी उपयोजनातील बदल नागरी विकास सांस्कृतिक प्रसार स्थळांची सुगमता इ. घटक पर्यटनाशी संबधीत असून त्यांचा भूगोलशास्त्रीय अभ्यास पर्यटनातील समस्या सोडविण्यासाठी केला जातो. पर्यटन व्यवसायाचे स्वरुप गतीमान आहे. पर्यटनाचे आर्थिक महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अर्थकारण, समाजकारण, राजकारण, पर्यावरण व सांस्कृतिक घटकांचे जतन, संवर्धन, संरक्षण या द़ृष्टीनेही पर्यटनाला विशेष महत्त्व आहे.
Paryatan Bhugol Sankalpna v Vyavsthapan
- पर्यटन भूगोलाची ओळख : पर्यटन भूगोलाची संकल्पना, पर्यटक व्याख्या, पर्यटन भूगोलाचे स्वरुप, पर्यटन भूगोलाची व्याप्ती, पर्यटन एक आर्थिक क्रिया, पर्यटन भूगोलाची भूमिका, पर्यटन आणि भूगोल यामधील अंतर क्रिया, पर्यटनाची वैशिष्टे, पर्यटनातील मूलभूत घटक-स्थान, वाहतूक, वेळ आणि पैसा.
- पर्यटकांचे वर्गीकरण किंवा पर्यटनाचे प्रकार : पर्यटकांचे वर्गीकरण किंवा पर्यटनाचे प्रकार, परदेशी पर्यटक, स्वदेशी पर्यटक, अ) पर्यटकांच्या संख्येनुसार पर्यटनाचे दोन प्रकार- 1. वैयक्तिक पर्यटन 2. समूह/गट पर्यटन
- पर्यटनाचे परिणाम : अ) पर्यटनाचे आर्थिक परिणाम- आर्थिक विकासाला मदत, रोजगारांची उपलब्धता, परकीय चलन, बाजारपेठांचा विकास, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, सरकारला मिळणर्या महसुलात वाढ, जमिनीच्या किंमती वाढतात, गुणन परिणाम. ब) पर्यटनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम
- पर्यटन विकास : भारतीय पर्यटन विकास महामंडळ, राष्ट्रीय पर्यटन धोरण, जागतिक पर्यटन संघटना, जागतिक पर्यटन संघटनेचे सभासद राष्ट्र, महाराष्ट्रातील पर्यटन विकास, महाराष्ट्राचे पर्यटन धोरण, निसर्ग पर्यटन धोरण, निसर्ग पर्यटनाची तत्वे, पर्यटन विकासात इंटरनेटची भूमिका, विशेष अभ्यास -तोरणमाळ
- प्रवास व्यवस्थापन : प्रवासी संघटना, खाजगी प्रवासी एजन्सीचे कार्य, प्रवासी माहिती साठी तरतुद करणे, प्रवासी मार्गाची माहिती, पर्यटन सेवा पुरविणार्यां बरोबर संपर्क, प्रवास सहलीचे नियोजन व खर्च, प्रवासी तिकिट, परकिय चलनाची तरतुद. विक्री विभाग, समुह पर्यटन.
- निवास : पर्यटन व्यवसायातील निवासव्यवस्थेची भूमिका, निवासस्थानांचे प्रकार: हॉटेल्स- अ) हॉटेल्स्चे प्रकार-आंतरराष्ट्रीय हॉटेल,रिसॉर्ट हॉटेल, व्यापारी हॉटेल, निवासी हॉटेल, तरंगते हॉटेल, कॅप्सूल्स् हॉटेल ब) मोटेल्स् हॉटेल- क) युवा वसतिगृह ड) धर्मशाळा ई) सरकारी निवासस्थाने विश्रामालय
- पर्यटन बाजारपेठ : बाजार व्यवस्थेचे कार्य- योग्य सेवा, पर्यटन उत्पादने, आकर्षण, सुविधा, सुगमता, भौगोलीक विभाग, लोकसंख्या विषयक विभाग, सामाजिक विभाग. पर्यटन बाजारपेठेचे प्रकार-अ) सुट्टीतील पर्यटन ब) व्यावसायिक पर्यटन क) समान उद्देशी पर्यटन पर्यटन बाजार व्यवस्थेची उद्दिष्टे, पर्यटन बाजार व्यवस्थेचे कार्य -अ) बाजार पेठ संशोधन ब) जाहिरात क) विक्री सहाय्य ड) जनसंपर्क
- पर्यटन बाजारपेठ : पर्यटन नियोजन, विकसीत देशातील पर्यटन नियोजन, विकसनशील देशातील पर्यटन नियोजन, पर्यटन नियोजनातील घटक, राष्ट्रीय पर्यटन आकर्षणांचे मूल्यमापन, पर्यटनाचे व्यवस्थापन, पर्यटन नियोजनाचे प्रतिमान.