पर्यावरण भूगोल
Environmental Geography
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
पर्यावरण ही निसर्गाची एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पर्यावरणातील सजीव, निर्जीव, पाणी, हवा, माती या सर्व घटकांमध्ये एक क्रमबद्ध व व्यवस्थित संघटन असते. मानव हा स्वत: पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. किंबहुना अनुकूल पर्यावरणातच मानवाचा विकास होऊ शकतो. पर्यावरणातील विविध घटकांमध्ये परस्पर क्रिया-प्रतिक्रिया सतत सुरू असतात व या क्रिया-प्रतिक्रियांचे नियमन निसर्गत:च होत असते. पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये परस्पर आंतरक्रिया सतत सुरू असतात. पर्यावरणातील हे सर्व घटक निसर्गनियमानुसार कार्य करत असतात. मानव हा पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये एक सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान घटक आहे. मानवाच्या गरजा अनंत असून त्या पूर्ण करण्यासाठी मानव पर्यावरणातील घटकांचा वापर करतो. मानवाच्या वाढत्या व अतिरेकी हस्तक्षेपामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होऊन पर्यावरणाचा र्हास होत आहे. पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत आहे. विविध पर्यावरणीय घटकांचे प्रदूषण होत आहे. संपूर्ण निसर्गचक्र प्रभावित होत आहे. या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार असून त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागत आहेत. व्यक्तीला बालपणापासून यासंबंधीचे ज्ञान मिळल्यास तो पर्यावरणासंबंधी अधिक काळजी घेईल. मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने पर्यावरण अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.
Paryavaran Bhugol
- पर्यावरण भूगोल- परिचय : 1.1 पर्यावरणाचे- अर्थ व संकल्पना, 1.2 पर्यावरणाचे प्रकार, 1.3 मानव व पर्यावरण सहसंबंध, 1.4 पर्यावरण भूगोलाच्या व्याख्या, स्वरुप व व्याप्ती, 1.5 पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासपद्धती (दृष्टीकोन)
- परिसंस्था : 2.1 परिसंस्थेच्या व्याख्या व संकल्पना, 2.2 परिसंस्था रचना, 2.3 परिसंस्थेतील पोषकद्रव्यांचे चक्रिकरण, 2.4 परिसंस्थेचे कार्य, 2.5 विविध परिसंस्थांचा अभ्यास
- पर्यावरणीय प्रदूषण : 3.1 प्रदूषण व प्रदुषके, 3.2 प्रदूषणांचे प्रकार, अ) हवा प्रदूषण, ब) जलप्रदूषण, क) सागरी प्रदूषण, ड) ध्वनीप्रदूषण, इ) घन कचरा प्रदूषण, 3.3 प्रदूषण नियंत्रणातील वैयक्तिक सहभाग, 3.4 भोपाळ गॅस दूर्घटना, 3.5 मुंबई एक अतिप्रदूषित शहर
- पर्यावरणीय समस्या : 4.1 पृथ्वीच्या तापमानातील वाढ, 4.2 ओझोन क्षय, 4.3 आम्लपर्जन्य, 4.4 हरितगृह परिणाम
- साधनसंपदा संवर्धन व पर्यावरणीय कायदे : 5.1 साधनसंपदा संवर्धन- अर्थ व संकल्पना, 5.2 साधनसंपदा संवर्धनाची गरज, 5.3 साधनसंपदा संवर्धन, 5.4 पर्यावरण संरक्षण अधिनियम, अ) वनसंसाधन, ब) जलसंसाधन, क) प्राणीसंवर्धन, ड) मृदासंवर्धन, 5.5 पर्यावरण कायदे लागू करण्यात येणार्या अडचणी, 5.6 जनजागृती