पर्यावरण भूगोलशास्त्र
Environmental Geography
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
पर्यावरण ही निसर्गाची एक महत्त्वपूर्ण देणगी आहे. पर्यावरणातील सजीव, निर्जीव, पाणी, हवा, माती या सर्व घटकांमध्ये एक क्रमबद्ध व व्यवस्थित संघटन असते. मानव हा स्वत: पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये परस्पर आंतरक्रिया सतत सुरू असतात. पर्यावरणातील हे सर्व घटक निसर्गनियमानुसार कार्य करत असतात. मानव हा पर्यावरणातील सर्व घटकांमध्ये एक सर्वश्रेष्ठ व बुद्धिमान घटक आहे. मानवाच्या गरजा अनंत असून त्या पूर्ण करण्यासाठी मानव पर्यावरणातील घटकांचा वापर करतो. मानवाच्या वाढत्या व अतिरेकी हस्तक्षेपामुळे पर्यावरणात असंतुलन निर्माण होऊन पर्यावरणाचा र्हास होत आहे. पर्यावरणाची गुणवत्ता ढासळत आहे. विविध पर्यावरणीय घटकांचे प्रदूषण होत आहे. संपूर्ण निसर्गचक्र प्रभावित होत आहे. या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार असून त्याचे दुष्परिणाम त्यालाच भोगावे लागत आहेत. व्यक्तीला बालपणापासून यासंबंधीचे ज्ञान मिळल्यास तो पर्यावरणासंबंधी अधिक काळजी घेईल. मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाच्या दृष्टीने पर्यावरण अभ्यास महत्त्वपूर्ण आहे.
मानव व पर्यावरण यांच्यात अतूट असे परस्पर संबंध पृथ्वीच्या व मानवाच्या निर्मितीपासूनच निर्माण झालेले आहेत. किंबहुना अनुकूल पर्यावरणातच मानवाचा विकास होऊ शकतो. पर्यावरणातील विविध घटकांमध्ये परस्पर क्रिया-प्रतिक्रिया सतत सुरू असतात व या क्रिया-प्रतिक्रियांचे नियमन निसर्गत:च होत असते. पर्यावरण संतुलन राखण्याची स्वयंचलित व स्वनियंत्रित यंत्रणा निसर्गाजवळ आहे. परंतु अलीकडच्या काळात निसर्गात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे असंतुलन निर्माण झाले. त्यातून अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यात.
Paryavaran Bhugolshastra
- पर्यावरण भूगोलशास्त्राचा परिचय : पर्यावरण अर्थ व संकल्पना, प्रकार नैसर्गिक व सांस्कृतिक, मानव आणि पर्यावरण सहसंबंध, पर्यावरण भूगोलशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप एकत्रित, वैज्ञानिक बदलक्षम, आंतरविद्याशाीय, व्याप्ती पर्यावरण भूगोलशास्त्राच्या अभ्यास पद्धती, पर्यावरणीयवाद, शक्यतावाद, आर्थिक व परिस्थितीकी.
- परिसंस्था : परिसंस्थेचा अर्थ व संकल्पना, परिसंस्थेची मुलतत्वे, रचना-घटक जैविक व अजैविक, परिसंस्थेतील चक्र : कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, परिसंस्थेचे प्रकार : जंगल, गवताळ, वाळवंटी, समुद्र.
- पर्यावरणीय प्रदूषण : प्रदूषके व प्रदूषण यांच्या व्याख्या, प्रदूषणाचे प्रकार हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, टाकाऊ पदार्थ प्रदूषण.
- पर्यावरणीय समस्या : पर्यावरणीय समस्या निर्मितीची कारणे, परिणाम, उपाय- हरितगृह परिणाम, ओझोनचा क्षय, वैश्विक तापमान, आम्लपर्जन्य.
- संपदा संवर्धन व पर्यावरणीय कायदे : संसाधनाचे संवर्धन : अर्थ व संकल्पना, संसाधनाच्या संवर्धनाची गरज, संवर्धनाच्या पद्धती, मृदा, जल, जंगल, वन्यपशू, पर्यावरणीय कायदे हवा प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, जंगल संवर्धन कायदा, वन्यपशू संवर्धन कायदा.