पर्यावरण शिक्षण
Environmental Education
Authors:
ISBN:
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
20 व्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यात खर्या अर्थाने पर्यावरण शिक्षणाच्या संकल्पनेला गती मिळाली. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती आहे. मानव, प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव यांच्या सभोवतालच्या परिस्थितीला पर्यावरण असे म्हणतात. पर्यावरणात केवळ एकाच घटकाचा समावेश होत नाही तर त्यात अनेक प्रकारचे घटक असतात. यामध्ये भौतिक, जैविक व रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो. पर्यावरण स्थळ-काळानुसार बदलते. एका सजीव जातीला अनुकूल असलेले पर्यावरण दुसर्या सजीव जातीला प्रतिकूल असू शकते. सद्य:स्थितीत नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अनिर्बंध वापरामुळे अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज या नैसर्गिक साधनसंपत्तीचे योग्य पद्धतीने जतन केले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपल्याला भावी पिढीसाठी हा निसर्गाचा ठेवा सुरक्षित ठेवायचा असेल तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे व एकूणच पर्यावरणाचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
पर्यावरण आणि पर्यावरण प्रदूषण हा आज कळीचा मुद्दा झालेला आहे. या प्रदूषणापासून आपणच आपल्या सुंदर पृथ्वीला वाचवायचे असेल तर सामूहिक बदलांऐवजी वैयक्तिक बदल महत्त्वाचे आहेत. आपण वेळीच याबाबत दक्ष राहिलो नाही तर येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी धोकादायक असणार आहे. आपला आजचा प्रत्येक दिवस पर्यावरण रक्षणासाठी मोलाचा आहे. प्रत्येक मानवाने आपली जीवनशैली बदलली तर स्वतःपासून केलेला हा बदल एक चळवळ बनायला वेळ लागणार नाही.
सदरील पुस्तकात पर्यावरण व पर्यावरण शिक्षणाशी संबंधित सर्वच मुद्यांचा सविस्तर व सखोल परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सखोल विचारमंथनातून अभ्यास व संशोधनातून प्रस्तुत पुस्तक तयार झालेले आहे. विविध उदाहरणे तसेच सध्याच्या वेब युगाचा विचार करुन भरपूर प्रमाणात आकृत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच अभ्यासक, संशोधकांनासुद्धा पुस्तकाचा उपयोग होणार आहे.
Paryavaran Shikshan
- पर्यावरणाच्या मूलभूत संकल्पना : अ) पर्यावरण – संकल्पना, अर्थ, महत्त्व, ब) पर्यावरणाच्या नैसर्गिक घटकाचा आर्थिक, तांत्रिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, सौंदर्यात्मक, लोकसंख्या घटकाशी असणारा सहसंबंध. क) परिसंस्था – अर्थ, संकल्पना, परिसंस्थेचे घटक, अन्नसाखळी, अन्नजाळी, परिसंस्थेचे प्रकार. ड) चिरंतन विकास – अर्थ, संकल्पना (व आयोगाशी निगडीत)
- पर्यावरणीय समस्या : अ) पर्यावरण प्रदूषण – प्रकार, अर्थ व व्याख्या, उगम, परिणाम, ब) जागतिक तापमान वाढ व ओझोनचा र्हास – जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारे हरीतगृह वायू, जागतिक तापमानवाढीसंदर्भात शास्त्रज्ञांची अनुमाने व निष्कर्ष, जागतिक तापमानवाढीसंदर्भात जागतिक पातळीवरील प्रयत्न, जागतिक तापमानवाढीवरील उपाययोजना. क) ओझोन र्हास, ओझोन मोजण्याचे एकक, ओझोनचा र्हास घडवून आणणारे घटक (कारणे), ओझोन र्हासाचे सजीव सृष्टीवरील परिणाम, ओझोन स्तर वाचविण्यासाठी उपाययोजना. ड) पर्यावरणीय समस्या कमी करण्यामधील वैयक्तिक भूमिका
- पर्यावरण शिक्षण : अ) पर्यावरण शिक्षण – अर्थ, संकल्पना, गरज, व्याप्ती आणि महत्त्व. ब) पर्यावरण शिक्षणाच्या परिषदा – स्टॉकहोम, तिबिलिसी, थिसालओनिकी, मॉस्को, भारत. क) तिबिलिसी परिषदेमध्ये सांगितलेली पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे. ड) पर्यावरण शिक्षणाचे दृष्टिकोन व पद्धती – दृष्टिकोन – शास्त्रीय, आंतरशास्त्रीय, बहुशास्त्रीय, एकात्मिक पद्धती – प्रकल्प, प्रयोगशाळा, निरीक्षण, खेळ.
- व्यवस्थापन, चळवळी, प्रकल्प, जैवविविधता : अ) व्यवस्थापन – पाणी, जमीन, वनस्पती व प्राणी. ब) चळवळी/आंदोलन – चिप्को, शांतदरी. क) प्रकल्प – व्याघ्र, कृती, गवारेडा, हत्ती. ड) जैवविविधता – संकल्पना, महत्व, प्रकार.