पश्चिम खानदेशातील आदिवासी लोकसाहित्य
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य’ हा ग्रंथ म्हणजे आदिवासींचे लोकजीवन, लोकसाहित्य, संस्कृती, रुढी, परंपरा इत्यादींची ओळख करुन देणारा आहे.
महाराष्ट्रात आदिवासी जमातीच्या 47 जमाती आहेत. या जमातींपैकी वरली, कोकणा, ठाकर, गोंड, पारधी, प्रधान अशा बर्याचशा जमाती पुढे आलेल्या आहेत. म्हणजे शहरी जीवनाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. जगाशी त्यांची ओळख झालेली दिसते. त्यांनी साहित्यामध्ये सुद्धा आपले स्थान निश्चित केलेले आहे. त्यापैकी भिल्ल ही आदिवासी जमात, पावरा, कोकणा या जमाती पश्चिम खानदेशातील आहेत. त्यासुद्धा आता तसा प्रयत्न करीत आहेत. आपआपल्या समाजाजवळ परंपरागत मौखिक भरपूर लोकसाहित्य आहे, व तो आपल्या संस्कृतीचा ठैवा आहे. तो जतन करण्याच्या उद्देशाने काही अभ्यासक अभ्यासुवृत्तीने त्या साहित्याकडे जाणिवपूर्वक पाहून ते जतन करीत आहेत. त्यापैकीच प्रा. डॉ. पुष्पा गावीत यांनी पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य या विषयाचे संशोधन करुन या साहित्याला समाजाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे.