Prashant Publications

My Account

पाश्चिमात्य राजकीय विचारवंत

Authors: 

ISBN:

SKU: 9789394403468
Marathi Title: Pashchimatya Rajkiya Vicharwant
Book Language: Marathi
Published Years: 2022
Pages: 408
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

तर्कशास्त्र व वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीचा आधार घेवून विचारवंत समाजात निर्माण होणाऱ्या विविध पेचांचे समाधान शोधतो व त्याद्वारे नवा विचार, नवीन जीवनपद्धतीचा जन्म होतो. त्याद्वारे सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय संरचनेत वेगवेगळे प्रयोग सिद्ध होतात व त्याद्वारे समाजपरिवर्तन घडून येते. याच वैचारिक अधिक्याचा आधार घेवून समाजात वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहतात. विचारवंतांच्या नवीन मांडणीतून अपूर्णतेची जाणीव होऊन नवा विचार, नवे भान आणि नवीन ज्ञानाची प्रक्रिया जन्मास असते. म्हणून तत्वचिंतक हे आधुनिकतेचे वाहक ठरतात. त्याच्या आधारावर समाजातील विविध संस्था, राज्य, धर्म इत्यादीचे स्वरूप बदलत असते. सर्व संस्थेतील प्राचीन परंपरा, विचार, श्रद्धा, मिथके आणि अमुलाग्र परिवर्तने घडवू आणण्यात विचारवंताचे योगदान खूप मोलाचे ठरते.
प्रस्तुत ग्रंथात प्लेटो, ॲरीस्टॉटल, निकोलो मॅकेव्हली, थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, जीन जेक्स रूसो, जेरेमी बेंथम, जॉन स्टुअर्ट मिल, जॉर्ज विल्हेम हेगेल, थॉमस हील ग्रीन, कार्ल मार्क्स, हेरॉल्ड लास्की या विचारवंतांच्या तत्वज्ञान, राज्य, युद्ध, स्वातंत्र्य, नागरी समाज, शासन, आदर्श, स्त्रीस्वातंत्र्य, हक्क व अधिकार, शिक्षण, क्रांती, सामाजिक परिवर्तन, समानता, विश्वबंधुत्व इत्यादी विविधांगी मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केले आहे.

Pashchimatya Rajkiya Vicharwant

  1. प्लेटो : 1.1 प्लेटोचा न्यायसंबंधी सिद्धांत, 1.2 प्लेटोचा साम्यवादी सिद्धांत, 1.3 प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत, 1.4 प्लेटोचा आदर्श राज्याचा सिद्धांत, 1.5 प्लेटोचा तत्वज्ञानी राज्याचा सिद्धांत, 1.6 प्लेटोचा उपआदर्श राज्याचा सिद्धांत.
  2. 2.1 ॲरीस्टॉटल : राज्‍याशास्‍त्राचा, 2.2 ॲरीस्टॉटलचा राज्यासंबंधी सिद्धांत, 2.3 ॲरीस्टॉटलचे संविधानाचे किंवा राज्याचे वर्गीकरण, 2.4 ॲरीस्टॉटलचा आदर्श राज्याचा सिद्धांत, 2.5 ॲरीस्टॉटलचे क्रांतीसंबंधी विचार, 2.6 ॲरीस्टॉटलचे नागरीकत्वासंबंधी विचार, 2.7 ॲरीस्टॉटलचे गुलामगीरीसंबंधी विचार,
    2.8 ॲरीस्टॉटलचे संपत्तीसंबंधी विचार, 2.9 ॲरीस्टॉटलचे कुटुंबासंबंधी विचार, 2.10 ॲरीस्टॉटलचे कायद्यासंबंधी विचार
  3. निकोलो मॅकेव्हली : 3.1 मॅकेव्हॅलीचे मनुष्य स्वभावासंबंधी विचार, 3.2 मॅकेव्हॅलीचे धर्म व नैतिकता विषयीचे विचार, 3.3 मॅकेव्हॅलीचे राज्यासंबंधी विचार, 3.4 मॅकेव्हॅली : आधुनिक राजकीय विचारांचा जनक.
  4.  थॉमस हॉब्ज : 4.1 हॉब्जचे मानवी स्वभावासंबंधी विचार, 4.2 हॉब्जचे निसर्गावस्थेसंबंधी विचार, 4.3 हॉब्जचा सामाजिक कराराचा सिद्धांत, 4.4 हॉब्जचे नैसर्गिक अधिकार व नैसर्गिक कायद्यासंबंधी विचार, 4.5 हॉब्जचा सार्वभौमसत्तेचा सिद्धांत, 4.6 हॉब्जचे शासनव्यवस्थेचे वर्गिकरण, 4.7 हॉब्जचे राज्य व धर्मसंस्थेसंबंधी विचार, 4.8 हॉब्जचा व्यक्तीवादी विचार, 4.9 व्हॉब्जचा निरंकुशतावादी विचार.
  5. जॉन लॉक : 5.1 लॉकचा मानवी स्वभावासंबंधी विचार, 5.2 लॉकचे निसर्गावस्थेसंबंधी विचार, 5.3 लॉकचा सामाजिक कराराचा सिद्धांत, 5.4 लॉकचा राज्यासंबंधी विचार, 5.5 लॉकचे शासन किंवा सरकारसंबंधी विचार, 5.6 लॉकचे नैसर्गिक करारासंबंधी विचार, 5.7 लॉकचे क्रांतीसंबंधी विचार, 5.8 लॉकचे व्यक्तीवादी विचार, 5.9 लॉकचे उदारमतवादी विचार.
  6. जीन जेक्स रूसो : 6.1 रूसोचा मानवी स्वभावासंबंधी विचार, 6.2 रूसोचे निसर्गावस्थेसंबंधी विचार, 6.3 रूसोचा सामाजिक कराराचा सिद्धांत, 6.4 रूसोचा सामान्य इच्छेचा सिद्धांत, 6.5 रूसोचा सार्वभौम सत्तेसंबंधी विचार, 6.6 रूसोचे शासनासंबंधी विचार, 6.7 रूसोचे कायद्यासंबंधी विचार, 6.8 रूसोचे स्वातंत्र्यासंबंधी विचार.
  7. जेरेमी बेंथम : 7.1 बेंथमचा उपयोगीतावादी सिद्धांत, 7.2 बेंथमचे सुधारणावादी विचार, 7.3 बेंथमचे अधिकारासंबंधी विचार, 7.4 बेंथमचे शासनासबंधी विचार, 7.5 बेंथमचे कायदा व स्वातंत्र्यासंबंधी विचार.
  8. जॉन स्टुअर्ट मिल : 8.1 मिलचे उपयोगीतावादी संबंधी विचार, 8.2 मिलचे स्वातंत्र्यासंबंधी विचार, 8.3 मिलचे प्रातिनिधीक शासनासंबंधी विचार, 8.4 मिलचे महिलांच्या स्वातंत्र्यासंबंधी विचार.
  9. जॉर्ज विल्हेम हेगेल : 9.1 हेगलचे विश्वात्मासंबंधी विचार, 9.2 हेगेलची द्वंदात्मक पद्धतीसंबंधी विचार, 9.3 हेगेलची इतिहासाची तत्वज्ञानीक व्याख्या, 9.4 हेगेलचा राज्यविषयक सिद्धांत, 9.5 हेगेलचे युद्धासंबंधी विचार, 9.6 हेगेलचे स्वातंत्र्यासबंधी विचार, 9.7 हेगेलचे राज्य व नागरी समाजासंबंधी विचार, 9.8 हेगेलचा शासनविषयक सिद्धांत, 9.9 हेगेलचा आदर्शवादी सिद्धांत.
  10. थॉमस हील ग्रीन : 10.1 ग्रीनचा आध्यात्मिक सिद्धांत, 10.2 ग्रीनचे स्वांतत्र्यासंबंधी विचार, 10.3 ग्रीनचे अधिकारासंबंधी विचार, 10.4 ग्रीनचे सार्वभौमसत्तेसंबंधी विचार, 10.5 ग्रीनचे राज्यविषयक विचार, 10.6 ग्रीनचे शिक्षासंबंधी विचार, 10.7 ग्रीनचे संपत्तीसंबंधी विचार, 10.8 ग्रीनचे शासनासबंधी विचार, 10.9 ग्रीनचे विश्वबंधुत्व किंवा युद्धविषयक विचार.
  11. कार्ल मार्क्स : 11.1 मार्क्सचा द्वंदात्मक भौतीकवाद सिद्धांत, 11.2 मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत, 11.3 मार्क्सचा वर्गसंघर्षाचा सिद्धांत, 11.4 मार्क्सचा अतिरीक्त मूल्याचा सिद्धांत, 11.5 मार्क्सचा राज्याचा सिद्धांत, 11.6 मार्क्सचा क्रांतीचा किंवा सामाजिक परिवर्तनाचा सिद्धांत.
  12. हेरॉल्ड लास्की : 12.1 लास्कीचे सार्वभौम सत्तसंबंधी व बहुलवादी विचार, 12.2 लास्कीचे राज्यासंबंधी विचार, 12.3 लास्कीचे फॅसीवादासंबंधी विचार, 12.4 लास्कीचे कायदे पालन करण्यासंबंधी विचार, 12.5 लास्कीचे अधिकारासंबंधी विचार, 12.6 लास्कीचे स्वातंत्र्यासंबंधी विचार, 12.7 लास्कीचे समानतेविषयक विचार, 12.8 लास्कीचे लोकतांत्रीक समाजवादासंबंधी विचार, 12.9 लास्कीचे आंतरराष्ट्रीयवादासंबंधी विचार, 12.10 लास्कीचे संपत्तीसंबंधी विचार.
RELATED PRODUCTS
You're viewing: पाश्चिमात्य राजकीय विचारवंत 495.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close