Prashant Publications

My Account

प्राकृतिक व मानवी भूगोल

Physical and Human Geography

Authors: 

ISBN:

SKU: 9789388769792
Marathi Title: Prakritik V Manavi Bhugol
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 184
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Prakriteek-Yewam-Manvi-Bhugol-by-Dr-U-P-Suryawanshee

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा असून या शाखेत मानवी निवास, स्थान व भौगोलिक पर्यावरण लक्षात घेऊन पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचे अध्ययन केले जाते. मानवाची प्रत्येक कृती प्राकृतिक घटकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निगडीत असल्याने मानवी क्रियांचेही अध्ययन महत्त्वाचे आहे. परंतू मानवाला अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. म्हणून प्राकृतिक पर्यावरणाचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्याचा विकास केला व त्यातून प्राकृतिक भूगोलाचा पाया घातला गेला. प्राकृतिक भूगोलात भूपृष्ठ रचना, भूरुपे, हवामान, हवेचे आविष्कार, जलाशय, वनस्पती आणि प्राणी जीवनांचा अभ्यास समाविष्ट होतो. विशेषत: शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण या चार प्रमुख घटकांचा व त्यांचा मानवी जीवनावर होणार्‍या परिणामाचा अभ्यास प्राकृतिक भूगोलामध्ये होतो. मानवाने कितीही प्रगती केली असली तरी अद्यापही निसर्गावर पूर्ण ताबा मिळवता आला नाही. मानवाने निसर्गातील घटकांचे निरीक्षण केले त्यांचा वापर व विकास करून प्राकृतिक भूगोलाचा विकास केला गेला आहे. पृथ्वीवरील सर्व घटकांचे ज्ञान मिळविण्यासाठी प्राकृतिक भूगोलात विविध विभाग केलेले आहेत. त्यात पृथ्वीची घनरूप अवस्था म्हणजे शिलावरण, पृथ्वीची द्रवरूप अवस्था म्हणजे जलावरण, वायु अवस्था म्हणजे वातावरण आणि पृथ्वीवरील सजिवांचे अस्तित्व असलेले म्हणजे जीवावरण होय. वरील सर्व अवस्थांचा शास्त्रशुद्ध अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. या शाखेत निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचा अभ्यास केला जाऊ लागला. यात विविध भूरूपे (पर्वत, पठार, मैदान आणि त्यांची निर्मिती), हवामान, मृदा, जलाशय, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इ.नैसर्गिक घटकांचा समावेश प्राकृतिक भूगोलात केला गेला.

Prakritik V Manavi Bhugol

  1. प्राकृतिक भूगोलाची ओळख : 1.1 प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना 1.2 प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या 1.3 प्राकृतिक भूगोलाचे स्वरुप 1.4 प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती 1.5 प्राकृतिक भूगोलाच्या शाखा 1.6 प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व 1.7 पृथ्वी प्रणालीची ओळख
  2. शिलावरण : 2.1 पृथ्वीच्या अंतरंगाची रचना 2.2 वेगनरचा भूभंडवहन सिंद्धात 2.3 डेव्हीसची क्षरण चक्राची संकल्पना
  3. वातावरण : 3.1 वातावरणातील घटक व रचना 3.2 हवामानशास्त्र व वातावरणशास्त्र 3.3 वातावरणाची रचना 3.4 उष्णतेचे संतुलन 3.5 जागतिक तापमान वाढ 3.6 तापमानाचे वितरण 3.7 वायुभार व वारे 3.8 वातावरणातील आर्द्रता, वृष्टी व प्रकार
  4. जलसंसाधन : 4.1 जलावरणाची निर्मिती 4.2 सागरतळ रचना 4.3 भरती आणि ओहोटी
  5. मानवी भूगोल : 5.1 मानवी भूगोलाची प्रस्तावना 5.2 मानवी भूगोलाची व्याख्या 5.3 मानवी भूगोलाचे स्वरूप 5.4 मानवी भूगोलाचे व्याप्ती 5.5 मानवी भूगोलाच्या शाखा 5.6 मानवी भूगोलाचे महत्व
  6. लोकसंख्या भूगोल : 6.1 लोकसंख्या भूगोलाची प्रस्तावना 6.2 लोकसंख्या भूगोलाची व्याख्या 6.3 लोकसंख्या भूगोलाचे स्वरूप 6.4 लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती 6.5 लोकसंख्याच्या वितरणावर परिणाम करणारे घटक 6.6 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत 6.7 भारतातील लोकसंख्येची सहरचना
  7. वस्ती भूगोल : 7.1 वस्ती भूगोलची प्रस्तावना 7.2 वस्ती भूगोलची व्याख्या 7.3 ग्रामीण वस्त्यांचे प्रकार 7.4 वस्त्यांचे आकार किंवा आकृतिबंध 7.5 भारतातील नागरीकरण 7.6 महाराष्ट्रातील नागरीकरण
  8. कृषी भूगोल : 8.1 कृषी भूगोलाची प्रस्तावना 8.2 कृषी भूगोलाची व्याख्या 8.3 कृषी भूगोलाचे स्वरूप 8.4 कृषी भूगोलाची व्याप्ती 8.5 कृषीचे किंवा शेतीचे प्रकार 8.6 कृषी व्यवसायावर प्रभाव करणारे घटक 8.7 भारतीय शेतीच्या समस्या
RELATED PRODUCTS
You're viewing: प्राकृतिक व मानवी भूगोल 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close