प्राचीन भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 1206)
Ancient History of India (from Early to A.D. 1206)
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाच्या आधारे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तसेच MPSC, UPSC व NET, SET सारख्या महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रारंभीपासून सर्व परीक्षांच्या दृष्टीने असणारे महत्वपूर्ण घटक अगदी मुद्देसूद पद्धतीने स्पष्टीकरण केले असून सोप्या शब्दात वर्णन केले आहे.
या ग्रंथात प्राचीन इतिहासाच्या उपलब्ध साधनांनुसार सिंधु संस्कृती, वैदिक संस्कृती, जैनधर्म, बौद्ध धर्म यासोबतच पूर्वीची राजकीय जीवनपद्धती, महाजनपदे आणि प्राचीन काळातील सर्वच महत्वपूर्ण राजघराण्यांविषयीची माहिती दिली आहे. प्राचीन भारतावर बौद्ध धर्माचा पडलेला प्रभाव स्वतंत्र प्रकरणाच्या अनुषंगाने दिला आहे. याशिवाय प्राचीन भारताचे सुवर्णयुग (गुप्तकाळ) सविस्तरपणे वर्णन केले आहे. तसेच भारतीय संस्कृतीची प्रारंभीची शैक्षणिक वाटचाल विविध विद्यापीठांची माहिती देऊन स्पष्ट केली आहे. प्राचीन स्त्रीजीवन, समाज, राज्य, अर्थ, संस्कृती व न्यायव्यवस्था याविषयीही योग्य ती माहिती सदर ग्रंथात दिली आहे.
Prachin Bharatacha Itihas (Praranbhapasun Te CE 1206)
1. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने :
भौतिक साधने, वाङ्मयीन साधने, अवैदिक धर्मग्रंथ, बौद्धग्रंथ, जैन वाङ्मय, इतर वाङ्मय, परकीयांची प्रवास वर्णने, ग्रीक-चिनी प्रवासी.
2. सिंधू संस्कृती :
संस्कृतीचा उदय व वैशिष्ट्ये, संस्कृतीची समाज रचना, आर्थिक जीवन, धार्मिक जीवन, सांस्कृतिक जीवन, सिंधू संस्कृतीचा विनाश.
3. वैदिक संस्कृती (आर्य संस्कृती) :
आर्यांचा राज्यविस्तार, दशराज्ञ युद्ध, पूर्व वैदिक काळ, राजकीय जीवन, आर्थिक जीवन, धार्मिक जीवन, सामाजिक जीवन, उत्तर वैदिक काळ, राजकीय जीवन, धार्मिक जीवन, सामाजिक जीवन, आश्रम व्यवस्था, विविध संस्कार, विवाह पद्धती, आर्थिक जीवन.
4. नवीन धार्मिक चळवळींचा उदय :
नवीन धार्मिक चळवळींच्या उदयाची कारणे, वर्धमान महावीर व जैन धर्म, महावीरांची शिकवण, जैन धर्मातील पंथ, जैन धर्माचे पतन.
5. गौतम बुद्ध व बौद्ध धर्म :
गौतमाची शिकवण, आर्य अष्टांगमार्ग, बुद्धसंघ, बौद्ध धर्माच्या धर्मसभा, बौद्ध धर्मग्रंथ, बौद्ध धर्माचा प्रसार, बौद्ध धर्मातील पंथभेद, बौद्ध धर्माचा ऱ्हास, बौद्ध धर्माचा सांस्कृतिक प्रभाव.
6. प्रादेशिक राज्यांचा उदय (महाजनपदे) :
अवंती, वत्स, कोसल, वृज्जी, मगध, अजात शत्रू, धनानंद.
7. इराणी व ग्रीक आक्रमणे :
भारतावरील इराणी आक्रमणे, अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण, झेलमची लढाई, स्वारीचे परिणाम, शिल्पकलेवर प्रभाव.
8. मौर्यकाळ व मौर्योत्तर भारत :
चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्ताची राज्यव्यवस्था, चंद्रगुप्त मौर्याची योग्यता, सम्राट अशोक व कलिंगचे युद्ध, सम्राट अशोकाचा धर्मप्रसार, सम्राट अशोकाची योग्यता, मौर्यसत्तेचा विनाश, मौर्यकालीन परीस्थिती – सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, सांस्कृतिक जीवन, शुंग वंशाची कामगिरी, कण्व घराणे – खारवेल राजा, शक घराणे, कुशाण घराणे – सम्राट कनिष्क, धार्मिक धोरण, कनिष्काची योग्यता, सातवाहन घराणे, सातवाहनांचे कार्य, मौर्योत्तर कालीन परिस्थिती, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती.
9. गुप्तकाळ (सुवर्णयुग) :
समुद्रगुप्त, समुद्रगुप्ताची योग्यता, चंद्रगुप्त विक्रमादित्य, कुमारगुप्त, स्कंदगुप्त, बुधगुप्त, गुप्त साम्राजाचे पतन, गुप्तकालीन परिस्थिती – राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, शैक्षणिक स्थिती – कला व स्थापत्यकला, साहित्य, विज्ञान व
तंत्रज्ञान, फाहियानचे प्रवासवर्णन.
10. वाकाटक व वर्धन घराणे :
राजकीय कारकिर्द- विंध्यसेन, रुद्रसेन दुसरा, प्रवरसेन दुसरा, वत्सगुल्म शाखा – सर्वसेन, हरीसेन, वाकाटक कालीन साहित्य, कला व स्थापत्य, वर्धन घराणे, सम्राट हर्षवर्धन – साम्राज्यविस्तार, हर्षाची राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, लष्करी शासन, कनोज धर्मपरिषद, हर्षवर्धनाची योग्यता, ह्युएनत्संगचा प्रवासवृत्तांत (सियुकी), नालंदा
विद्यापीठ.
11. अरब व तुर्क आक्रमणे :
अरबांचा इतिहास, अरबांच्या विजयाची कारणे व परिणाम, महंमद गझनी, सोमनाथवरील स्वारी, महंमद गझनीच्या विजयाची कारणे, महंमदाच्या आक्रमणाचा परिणाम, महंमद घोरी, स्वाऱ्यांचे उद्देश, तुर्कांच्या स्वाऱ्यांचे भारतावरील परिणाम.
12. दक्षिण भारतातील राज्यकर्ते घराणे :
बदामीचे चालुक्य, पुलकेशीन द्वितीय, चालुक्यकालीन स्थिती; पल्लव घराणे, पल्लवांचे सांस्कृतिक योगदान; राष्ट्रकुट घराणे, राष्ट्रकुटकालीन प्रशासन, धार्मिक परिस्थिती, राष्ट्रकुटकालीन शिल्पकला; चोल घराणे, चोलप्रशासन व्यवस्था, चोलकालीन कला, चोलकालीन साहित्य.
13. प्राचीन भारतातील शिक्षण :
वैदिक कालखंडातील शिक्षण, महाकाव्यकालीन शिक्षण, गुप्तकालीन शिक्षण हर्षवर्धनकालीन शिक्षण; प्राचीन विद्यापीठे – तक्षशीला विद्यापीठ, विक्रमशीला विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ, दक्षिणेतील विद्यापीठे.
14. प्राचीन भारतातील स्त्रीजीवन व न्यायव्यवस्था :
प्राचीन भारतीय स्त्रीजीवन – वैदिक कालखंड, महाकाव्य काळ, मौर्यकाळ, गुप्तकाळ व नंतरचा काळ, प्राचीन भारताची न्यायव्यवस्था, वैदिककालीन न्यायव्यवस्था, मौर्यकालीन न्यायदान, गुप्तकालीन न्यायपद्धती.