प्राचीन व मध्ययुगीन पाश्चात्त्य तत्त्वज्ञान
(संक्षिप्त इतिहास)
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
विश्वाचे कोडे उलगडणाच्या तत्त्वचिंतकांच्या अथक प्रयत्नांचे, त्यांच्या न संपणार्या शोधयात्रेचे आकलन करणे हा प्रस्तुत पुस्तकाचा प्राथमिक उद्देश आहे. तत्त्वज्ञान या विषयाबद्दल सर्वसामान्यांमध्ये बरेचसे गैरसमज आढळून येतात. प्रस्तुत पुस्तकात तत्त्वज्ञान विषयाचे सामान्य रुप मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो यामुळेच. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या प्राचीन (मुख्यत्वे ग्रीक) व मध्ययुगीन स्वरूपाचे विवरण करणारी पुस्तके मराठीत फारशी आढळत नाहीत. इंग्रजी पुस्तके तुलनेने पुष्कळ आहेत, परंतु विद्यार्थ्यांना ती तितकीशी रुचत नाहीत, आपली वाटत नाहीत.
सदरील विवरण जरी पाश्चात्त्यांच्या प्राचीन व मध्ययुगीन तत्त्वज्ञानाच्या संदर्भात असले तरी तत्त्वज्ञान विषयात अंतर्भूत असलेल्या प्रमुख शाखांचे त्यातील वर्णन सर्वसमावेशक असेच आहे. पाश्चात्त्य जगात प्राचीन तत्त्वविचारांचे नव्याने संशोधन व परिशीलन निरंतर सुरू असते हे लक्षात घेवूनच प्रस्तुत पुस्तकलेखन करण्यात आले आहे.
Prachin V Madhyayugin Pashchattya Tattvadnyan (Sankshitpa Itihas)
1. ग्रीक तत्त्वज्ञानाचा इतिहास : परिचय, 2. ग्रीक तत्त्वचिंतकांची पहिली फळी, 3. पायथॅगोरसची परंपरा, 4. एम्पीडोक्लीसचा विचार, 5. हिरॅक्लीटस (इ.स.पूर्व 504 च्या सुमारास), 6. एलियाचे तत्त्वचिंतक, 7. झीनोचे कूटप्रश्न, 8. अणुवादी तत्त्वचिंतक, 9. सोफिस्ट विचारवंत, 10. सॉक्रेटीस – चरित्र व व्यक्तिमत्त्व, 11. सॉक्रेटीसचे तत्त्वज्ञान, 12. मायनर सॉक्रेटिक विचारधारा, 13. प्लेटो : चरित्र व व्यक्तिमत्त्व, 14. प्लेटोची ग्रंथसंपदा, 15. प्लेटोचा ज्ञानशास्त्रीय विचार, 16. प्लेटोचा फॉर्म्स/आयडियाजचा सिद्धान्त, 17. प्लेटोचे कलाविषयक व नीतीविषयक विचार, 18. अॅरिस्टॉटल : चरित्र व व्यक्तिमत्त्व, 19. शास्त्रांचे वर्गीकरण व तर्कशास्त्र, 20. अॅरिस्टॉटलची कारण संकल्पना, 21. अॅरिस्टॉटलची प्लेटोवरील टीका, 22. अॅरिस्टॉटल : कोटी संकल्पना, 23. अॅरिस्टॉटलचे नीतीशास्त्र व पोएटीक्स, 24. हेलेनिस्टिक कालखंड, 25. प्लॉटिनस, 26. ख्रिश्चन ईश्वरशास्त्राचा उदय, 27. संत ऑगस्टीनचे तत्त्वज्ञान, 28. संत अॅन्स्लेम, 29. इस्लामची शिकवण, 30. ज्यू तत्त्वचिंतक (20 ख्रि.पू – इ.स. 50), 31. संत थॉमस अक्वायनस