प्रादेशिक नियोजन आणि विकास
Regional Planning and Development
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रादेशिक संकल्पनाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणजे 20व्या शतकाचा प्रारंभ होय. या शतकात प्रादेशिक भूगोलांच्या अध्ययनावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला होता. 20 शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स मधील प्रसिद्ध तज्ज्ञ विदाल-द-ला-ब्लाश, यांनी प्रादेशिक भूगोलाच्या अध्ययनावर लक्ष केंद्रीत करून या शाखेचा विकास घडवून आणला.
प्रादेशिक नियोजनाच्या संदर्भात नियोजन प्रक्रियांचा विचार करताना त्यामध्ये सर्व समावेशक घटकांची एकत्रित मांडणी आवश्यक असते. नियोजनाचा उपयोग वेगवेगळ्या विषयामध्ये अनेक वर्षापासून होत असला तरी प्रादेशिक नियोजन ही संकल्पना मात्र 20व्या शतकात प्रामुख्यान विकसित झालेली संकल्पना होय. सर्व साधारणपणे गेल्या 50 वर्षात जगातील विविध देशांनी सामाजिक व आर्थिक पातळ्यांवर एकत्र येऊन नियोजनाच्या माध्यमातून विकासाच्या संदर्भात विविध योजना तयार करण्यास सुरुवात केलेली दिसते. यातूनच प्रादेशिक नियोजनाची आवश्यकता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. जागतिक स्तरावर वेगवेगळ्या प्रादेशिक योजनाचा उपयोग विकसित व विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, वैशिष्ट्ये, महत्व, प्रादेशिक नियोजनाचे प्रकार, प्रादेशिक विकास, प्रादेशिक विकासाची आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय निर्देशके, प्रादेशिक विकासाचे सिद्धांत व प्रतिमाने, या सोबतच भारतातील प्रादेशिक नियोजन व विकासाशी संबंधित घटकांचा उहापोह या पुस्तकात करण्यात आलेला आहे. निती आयोगाची सखोल माहिती देखील विविध संदर्भांच्या सहाय्याने नमूद करण्यात आली आहे.
Pradeshik Niyojan aani Vikas
- प्रादेशिक नियोजन : अ) प्रस्तावना -प्रादेशिक नियोजनाची संकल्पना, प्रादेशिक नियोजनाचे महत्व. ब)प्रादेशिक नियोजनाची वैशिष्ट्ये. क) प्रादेशिक नियोजनाचे प्रकार-अल्पकालीन नियोजन, दीर्घकालीन नियोजन, भौतिक नियोजन/वस्तुनिष्ठ नियोजन, आर्थिक नियोजन, अत्यावश्यक विकास, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियोजन. ड) प्रादेशिक नियोजनाचे दृष्टिकोन-आदान-प्रदान दृष्टिकोन, वृद्धीचे निर्देशक, निर्यात.
- प्रादेशिक विकास : अ) विकास व वाढीच्या संकल्पना, ब) प्रादेशिक विकासाचे परीमाणे/निर्देशके-सूचक-आर्थिक, सामाजिक पर्यावरण.
- प्रादेशिक नियोजन व विकासाचे प्रतिमान : अ) प्रादेशिक विकासाचे प्रतिमान – रोस्टोचा आर्थिक विकासाचे प्रतिमान, रोस्टोच्या सिद्धांतातील अवस्था, रोस्टोच्या विवेचनातील प्रतिमानाचे मूल्यमापन. ब) प्रादेशिक नियोजनाचे प्रतिमान – ध्रुवीय सिद्धांत.
- भारतातील प्रादेशिक नियोजन आणि विकास : अ) प्रादेशिक नियोजन-प्रादेशिक नियोजनास अनुकूल परिस्थिती, पश्चिम घाट, भारतातील मागासलेल्या भागातील कारणे, प्रादेशिक असमतोलाची समस्या, लक्षणे, प्रादेशिक असमतोल विकासाची कारणे, पंचवार्षिक योजना आणि प्रादेशिक असमतोल, भारतातील विभागीय असमतोल. ब) भारतातील प्रादेशिक नियोजन- नियोजन मंडळाचे सदस्य, स्वरूप, कार्ये, धोरण, ग्रामीण विकासाचे नियोजन, आदिवासींच्या क्षेत्रीय विकासाचे नियोजन, आदिवासी विकास व सरकारी धोरण व विकास योजना, महाराष्ट्रातील प्रादेशिकरण व नियोजन, महाराष्ट्रातील कृषी परिस्थितीकी प्रदेश. नीति आयोग- नियोजनाची नवी ‘नीति’, रचना, सदस्य, महत्व, व्हिजन 2020, माहिती, उद्दिष्टे.