प्रारंभिक भारत (प्रागैतिहासिक काळ ते राष्ट्रकुट काळ)
Early India (Form Prehistory to the Age of the Rashtrakutas)
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. असे असतानाही आपणास मोठ्या दु:खाने सांगावे लागते, की आज या देशाचा प्राचीन गौरवशाली इतिहास उपलब्ध नाही. जो उपलब्ध आहे तो फारच अल्प आहे, म्हणून प्राचीन भारताचा अभ्यास करताना इतिहासकाराला मोठा त्रास पडतो. आज भारताचा जो इतिहास उपलब्ध आहे त्याच्या कैकपटीने प्राचीन भारताचा इतिहास स्मृतीच्या गर्तेत नष्ट झाला. त्यामुळे बरेच इतिहासकार भारताचा इतिहास किंवा भारतीय संस्कृती ही आधुनिक संस्कृती आहे, असा समज करून घेतात. भारतीयांनी तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी अनेक विभागांत कार्य केले. परंतु इतिहासाबाबत संपूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे फारच अशी थोडी प्राचीन इतिहासविषयक साधने उपलब्ध आहेत, की त्यांच्यावर विसंबूनच आपणास प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, हडप्पा किंवा सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ, धर्मक्रांतीचे युग, मौर्य साम्राज्य व मौर्योत्तर काळ, गुप्त साम्राज्य, वर्धन घराणे, दक्षिण भारत या घटकांची अचूक माहिती देण्यात आली आहे.
Praranbhik Bharat Progaitihasik Kal te Rashtrakut Kal
- प्रारंभिक भारत : साधने आणि प्रागैतिहासिक काळ : प्रारंभिक इतिहासाचे महत्त्व, प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, भौतिक साधने, वाङ्मयीन साधने, वैदिक धर्मग्रंथ, अवैदिक धर्मग्रंथ, इतर वाङ्मय, प्रागैतिहासिक ते सभ्यतेच्या उदयापर्यंतचा काळ, पुरापाषाण युग, मध्यपाषाण युग
- हडप्पा संस्कृती : कांस्ययुगीन सभ्यता : भौगोलिक विस्तार, संस्कृतीचा शोध, या संस्कृतीचा काळ, कांस्ययुगीन संस्कृती, नागर संस्कृती, धार्मिक रीतीरिवाज, कला, हस्तकला आणि तांत्रिक ज्ञान, शिल्पकला व मूर्तिकला, मातीच्या शोभेच्या मूर्ती, धातुकाम, लिपी, सिंधु संस्कृतीच्या विनाशाची कारणे
- वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह : जैन आणि बौद्ध धर्म : नव्या युगास प्रारंभ, आर्यांचे मूल निवासस्थान, मूळस्थान सोडण्याचे कारण, आर्यांचा राज्यविस्तार, जमातींची राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, सामाजिक विभागणी, धार्मिक विधी आणि तत्वज्ञान, विविध देवता, वेदकालीन धर्माची वैशिष्ट्ये
- महाजनपदांचा उदय आणि मौर्य काळ : सोळा महाजनपदे, सोळा महाजनपदातील महत्त्वाची राज्ये, बिंबीसार, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, धम्मविषयक धोरण, मौर्यकाळाची माहिती देणारी साधने, चंद्रगुप्ताचे कुल, चंद्रगुप्ताचे जीवन, बिंदुसार, अशोकाचा धर्मप्रसार, अशोकाचे आलेख
- मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ : अ) ग्रीक, शक व कुशाण आक्रमणे – (1) ग्रीक सत्ता – अॅन्टीओकस-दी-ग्रेट, डिमेट्रीयस, मिनँडर, अॅन्टीअल्किदस (2) शकांचे आक्रमण – मॉस, अज, क्षत्रप, भूमक, नहपान, रुद्रदामन (3) पार्थियन आक्रमणे – सायरस, दरायस, झरसिस
- दक्षिण भारताचा प्रारंभिक इतिहास : संगम युग, संगम साहित्याचा कालखंड, संगम साहित्य, संगमची माहिती, महाकाव्ये : शिल्पादिकारम, मणिमेखलई, जीवकचिंतामणी, प्रारंभीची तीन राज्ये-पांडव, चोल, चेर, समाज आणि संस्कृती, कृषी, धार्मिक जीवन, प्रारंभिक राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था
- उत्तर भारत : गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन : (अ) गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त, घटोत्कच, पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, समुद्रगुप्ताची योग्यता, दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य), फाहियान, पहिला कुमारगुप्त, स्कंदगुप्त, स्कंदगुप्तानंतरचे राजे, गुप्त साम्राज्य पतनाची कारणे (ब) हर्षवर्धन – वर्धन घराण्याचा पूर्वेतिहास
- प्रादेशिक राज्ये : संक्षिप्त इतिहास : बदामीचा चालुक्य वंश, राष्ट्रकूट घराणे, पल्लव वंश, पांड्य वंश, चालुक्य पल्लव पांड्य – द्वीपकल्पीय भारतावरील प्रभुत्वाचा संघर्ष, राष्ट्रकुट, पाल, परमार-त्रिपक्षीय संघर्ष, साहित्य, धर्म, कला, स्थापत्य