फर्मान आणि इतर कविता
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
निर्दोष समाज चिंतन, मानवी जीवनाचे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षण, सौंदर्यवेधी कल्पनाविलासाची पेरणी करणारी अस्सल आणि अव्वल प्रतिभा, कृषी संस्कृती आणि ग्रामीणत्व यांच्या संस्कारातून संस्कारित झालेले प्रांजवळ मोकळे चाकळे मन, प्रतिकुलतेच्या भोगलेपणातून आकारास आलेले संयमित समृद्ध व्यक्तिमत्व, अभिजात कळा जाणीव, अर्थपूर्ण वेचक नावीन्यपूर्ण शब्दांची काव्यात्मक पखरण, अनेक परिमाणे लाभलेली चिंतनात्मक काव्य प्रवृत्ती या गुणवैशिष्ट्यांमुळे प्रा. वा. ना. आंधळे यांची ‘फर्मान आणि इतर कविता’ मधील कविता खानदेशचा भूगोल ओलांडून आणि शतकांचे बंध बाद करुन मराठीतील सर्व प्रवाहातील अस्सल चिंतनाच्या आणि जाणिवांच्या कलात्मक कवितेशी नाते सांगते. म्हणनच सौंदर्यवेधी सत्याचा वारसा सांगणार्या नव्या काव्य प्रवाहाची ती सांस्कृतिक नांदी ठरते. वानांच्या लेखणीला असाच बहर येवो, ही मनःपूर्वक सदिच्दा.
– प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस
Karman Ani Itar Kavita