बातचीत नारायण सुर्व्यांशी
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
नारायण सुर्वे हे महाराष्ट्राचे मॅक्झिम गॉर्की !
समाजाच्या तळागाळातून संघर्ष करीत वर आलेल्या या गॉर्कीला लेखक म्हणून आंतरराष्ट्रीय किर्ती मिळाली. तशीच किर्ती दोनदा सोव्हिएत रशियाकडून नेहरू पारितोषिक प्राप्त कवी सुर्व्यांना मिळाली.
दिडशे वर्षाच्या आधुनिक मराठी काव्यखंडातील तीन निर्णायक वळणे म्हणजे केशवसुत, मर्ढेकर, सुर्वे. त्यातही सुर्व्यांची कविता म्हणजे अफाट शोषित, वंचितांचा जाहीरनामा.
सुर्व्यांवर मराठीत प्रचंड लिखाण झाले. स्वत: डॉ. अनंता सूर यांचा ‘दोन अर्वाचीन कवी’ हा प्रबंध म्हणजेच त्यापैकी एक निर्भय, वस्तुनिष्ठ साहित्यकृती. या चोखंदळ लेखक संपादकाने परिश्रमपूर्वक लिहू केलेला ‘बातचीत नारायण सुर्व्यांशी’ हा ग्रंथ मराठी चाहत्यांना-अभ्यासकांना उपलब्ध झालेला अस्सल पुरावा. जुन्या-नव्या पिढीतील समीक्षक, संशोधक, अभ्यासकांपर्यंत सुर्वे अनेकांशी भरभरून बोलले. खरेतर संपूर्ण महाराष्ट्राशी सुर्व्यांचा अखंड संवाद होता. त्यामुळे ती बातचीत आजच्या महाराष्ट्राला उपलब्ध करून देणे हे सुर्व्यांचे एक चिरंतन स्मारक.
हे स्मारक पुस्तकरूपाने साकारणारे संपादक डॉ. अनंता सूर आणि प्रशांत पब्लिकेशन्सचे श्री. रंगराव पाटील यांच्याशी समस्त मराठी वाचक कृतज्ञ राहील.
– डॉ. वि. स. जोग
(‘मार्क्सवाद आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाला
1983 चा सोव्हिएत रशियाचा नेहरू पुरस्कार प्राप्त.)
Batachit Narayan Survyanshi
निर्मितीमागील प्रक्रियेची पार्श्वभूमी
- ‘मराठी वाङ्मयाला बंडखोरीची परंपराच नाही’ : मुलाखत : डॉ.एस.एस.भोसले
- ‘जगातील कोणत्याही जाणिवा सर्वप्रथम कवितेच्या रूपानेच व्यक्त होतात’ : मुलाखत : डॉ.सदा कर्हाडे
- ‘मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद हा परस्परांना पुरकच आहे’ : मुलाखत : प्रा.गो.म.कुलकर्णी
- ‘जीवनानं मला आधी शिकवलं म्हणून मी लिहितो’ : मुलाखत : उत्तम कांबळे
- ‘बदलणं हाच माझ्या कवितेचा आत्मा आहे’ : मुलाखत : उत्तम कांबळे
- ‘कलाकृती जशी मौलिक असते, तशीच समीक्षाही मौलिक असते’ : मुलाखत : प्रा.वि.शं.चौघुले
- ‘वास्तवाची भीषण जाणीव ही क्रांतीची पूर्वतयारी असते’ : मुलाखत : राजा राजवाडे
- ‘लोकाधार हा सर्व संस्कृतींचा मुलभूत पायाच आहे’ : मुलाखत : सतीश काळसेकर
- ‘कष्टकर्यांनीच आपला सांस्कृतिक व वर्गीय वारसा शोधायला पाहिजे’ : मुलाखत : डॉ.छाया दातार/अशोक राजवाडे
- ‘डॉ.आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आणि मार्क्सवाद घेऊनच पुढं जावं लागेल’ : मुलाखत : डॉ.अक्षयकुमार काळे
- ‘माणसाला जगतानाही विचारांचा एक कणा लागतो’ : मुलाखत : डॉ.अनंता सूर
- ‘माणूस’ हाच माझ्या दृष्टीतील सर्वेसर्वा! – नारायण सुर्वे : मुलाखत : डॉ.अशोक पळवेकर
- ‘आपणच आपला दिवा घेऊन नीट चालले पाहिजे’ : मुलाखत : सुधा कुलकर्णी
- ‘स्वान्तसुखाय म्हणजे लेखन नव्हे, जनसुखाय म्हणजे लेखन’ : मुलाखत : निखील वागळे
- ‘माझी कविता हेच माझे आत्मचरित्र आहे’ : मुलाखत : प्रा.नेहा सावंत
- ‘माझ्या संबंध कवितेच्या मागे प्रारब्ध नावाची गोष्ट कुठे आहे?’ : मुलाखत : डॉ.विलास तायडे
- ‘अजून जीवनाचे कितीतरी स्वर मोकळे व्हायचे आहेत.’ : मुलाखत : प्रा.राजेंद्र मुंढे
- ‘जीवनाने मला दु:ख दिले आणि सन्मानही दिले.’ : मुलाखत : डॉ.बळवंत भोयर
- ‘पुन्हा कामगारच होणे पसंत करीन’ : मुलाखत : नरेंद्र लांजेवार
- परिशिष्ट : 1, कविवर्य नारायण सुर्वेंचा अल्पपरिचय.
- परिशिष्ट : 2, मुलाखतकारांचा अल्पपरिचय