Prashant Publications

My Account

बौद्धिक संपदा हक्क स्वरुप आणि समस्या

Intellectual Property Rights : Nature and Problems

Authors: 

ISBN:

SKU: 9789388769396a
Marathi Title: Bauddhik Sanpda Hakka Swarup Aani Samasya
Book Language: Marathi
Published Years: 2019
Edition: First

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मनुष्य हा बुध्दीजीवी प्राणी आहे. परमेश्वराने मानवाला बुध्दीची देणगी देऊन सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ ठरविले आहे. मनुष्य हा बुध्दीचा वापर करुन नवनवीन संशोधनाद्वारे आपले जीवनमान दिवसेंदिवस अत्याधिक सुकर बनवित आहे. मानवी समूहात काही लोक सर्जनशील वृत्तीचे असतात. त्याच्या ठायी सर्जनशीलता असते. या सर्जनशीलतेतूनच नवनवीन शोध लावून ते या शोधांचा संपूर्ण मानव जातीला उपभोग घेण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. परंतु असे शोध लावण्यात त्यांनी आपली बुध्दी, वेळ, श्रम आणि पैसा खर्ची घातला असतो. त्यामुळे अशा शोधकर्त्यांना त्यांच्या कार्याच्या श्रेयाबरोबरच योग्य तो आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या शोधाचा दुरुपयोग होता कामा नये या विचारातून बौध्दिक संपदा हक्क ही संकल्पना उदयास आली.

बौध्दिक संपदा हक्क हा औद्योगिक आणि साहित्य, कला विषयक मानवी मनाच्या निर्मितीवरील विविध हक्कांचा समुच्चय आहे. त्यात पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक संकल्पचित्र, भौगोलिक विशेषतादर्शक चिन्ह, सुक्ष्म जीव-जंतूंसाठी पेटंट, रोपांच्या नवीन जाती/नमुन्यांना संरक्षण आणि परंपरागत ज्ञानभांडारास संरक्षण इत्यादी अनेक वेगवेगळ्या हक्कांचा समावेश आहे. नवे संशोधन, नवी उत्पादने आणि नव्या प्रणाली यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळत असते. त्या द़ृष्टिने बौध्दिक संपदेचे देशाच्या आर्थिक विकासातील महत्व लक्षात येत असले तरी बौध्दिक संपदा हक्कांविषयीच्या काही समस्या निर्माण होतात. प्रस्तुत ग्रंथात बौध्दिक संपदा म्हणजे काय? बौध्दिक संपदा हक्काचा इतिहास, बौध्दिक संपदा हक्काची गरज किंवा आवश्यकता, बौध्दिक संपदा हक्काचे स्वरूप आणि बौध्दिक संपदा हक्कांच्या समस्या यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

Bauddhik Sanpda Hakka Swarup Aani Samasya

  1. Patents, Trade Marks and Intellectual Property Rights – Dr. Meena Prakash Kute
  2. Intellectual Property Right and the World Trade Organization – Dr. Suresh N. Maind
  3. Ethics to Publish Research Article and Intellectual Property Rights – Prof. L. A. Patil
  4. Intellectual Property Rights in India : A Glimpse – Dr. Bhushan Chaudhari
  5. Nature Of Intellectual Property Rights – Dr. Jayashri Madhusudan Nemade
  6. Case study based Learning : A thoughtful Approach for IPR asset – Prof. Harshali Patil, Prof. Sarala Mary
  7. कॉपी राईट आणि मराठी साहित्यिकाची उदासिनता : एक आकलन – डॉ. प्रकाश घनशाम कांबळे
  8. Need in India for Intellectual Property Rights – Prof. Capt. Sarbjit K. Cheema
  9. Importance of Intellectual Property Rights – Mrs. Paurnima Milind Warade
  10. बौद्धिक संपदा अधिकार एवं महत्त्व – प्रा. राजेश मेरसिंग खर्डे
  11. Disseminating Intellectual Property Rights & Proposing Measures for Enhancing IPR Activity in India – Adv. Lalita Madhukar Sapkale
  12. Protection of Geographical Indication in Maharashtra : An overview of the Indian Legislation and the TRIPS Scenario – Prof. Kotkar Sagar Raghunath
  13. बौद्धिक संपदा – स्वरूप, आव्हाने आणि संधी – प्रा. विलास अंकुशराव सोळुंके
  14. बौध्दिक संपदा हक्क : स्वरुप आणि समस्या – प्रा. डॉ. प्रशांत ब्रिजलाल सोनवणे
  15. बौध्दिक संपदा अधिकार- स्वरूप आणि अडचणी यात माध्यमांची भूमिका – रविंद्र रामदास स्वामी
  16. बौद्धिक संपदा अधिकारांचे स्वरूप – डॉ. जयश्री बी. पाटील
  17. बौद्धिक संपत्ती अधिकाराचे स्वरूप – डॉ. दिनेश साहेबराव खंडारे
  18. बौद्धिक संपत्ती अधिकार : स्वरुप आणि समस्या – प्रा. डॉ. सुरेश हिलाल पाटील
  19. बौद्धिक संपदा अधिकाराचे फायदे व तोटे – प्रा. डॉ. संजय व्ही. भामरे
  20. बौध्दिक संपदा अधिकार आणि त्याचे प्रकार यांचा संकल्पनात्मक अभ्यास – डॉ. विजयानंद अभिमन वारडे
  21. भारत आणि बौद्धिक मालमत्ता अधिकार – डॉ. मुरलीधर पंडित गायकवाड
  22. भारतातील बौध्दिक संपदा हक्काची सद्यस्थिती एक अध्ययन – प्रा.डॉ. संजय पांडुरंग पाटील, प्रविण भास्कर महाजन
  23. बौध्दिक संपदा हक्क आणि जैविक तंत्रज्ञान – डॉ. हिरालाल वामन चव्हाण
  24. बौद्धिक संपदा आणि भौगोलिक विशेषतादर्शक चिन्ह – प्रा. डॉ. किशोर एच. नेहेते
  25. व्यापारी चिन्ह : एक बौध्दिक संपदा – डॉ. श्रीकांत सुभाषचंद्र चौधरी
  26. बौध्दिक संपदा निर्देशांक स्थिती – प्रा. डॉ. सतीश जाधव
  27. बौध्दिक संपदा : कॉपीराईट (लेखाधिकार) – प्रा. वृषाली व्ही. कोल्हे
  28. बौध्दिक संपदा – श्रीमत ज्योती कैलास चौधरी
  29. Intellectual Property Rights : A Tool of Marketing (Key Note Address) – Dr. V. M. Govilkar
RELATED PRODUCTS
You're viewing: बौद्धिक संपदा हक्क स्वरुप आणि समस्या 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close