भटक्यांची भ्रमणगाथा मांडणारा कादंबरीकार अशोक पवार
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
॥ तीन दगडांच्या चुलीचा भाईबंद! ॥
अशोक पवार हा तीन दगडांच्या चुलीचा एक भाईबंद. भटक्या-विमुक्तांच्या जगण्यातले दु:ख आपल्या स्वकथनातून आणि कादंबरीलेखनातून मांडणारा आपल्या पिढीतील महत्त्वाचा लेखक.
संपूर्ण देशात सत्ताधारी वर्गाकडून कार्पोरेट माहोलाच्या प्रभावातून जनतेला महासत्तेची स्वप्ने दाखवली जात असताना आजही या देशातील भटके-विमुक्त जातिसमूह त्यांच्या मूलभूत गरजांपासून मात्र कोसो दूर आहेत! त्यांच्या जगण्यातील प्राणी पातळीवरचा संघर्ष आणि मानवी पातळीवरील त्यांच्या जगण्यातले दु:ख हे अशोक पवारच्या एकूणच कादंबरीलेखनाचे मध्यवर्ती सूत्र आहे. हे सूत्र आपल्याला भारतीय समाजव्यवस्थेचे समाजशास्त्र आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मानवी संवेदन ह्या अंगाने अंतर्मुख होऊन गंभीरपणे विचार करायला भाग पाडणारे आहे.
या पार्श्वभूमीवर, सामाजिक बांधिलकीच्या अंगाने अशोक पवारच्या कादंबरीलेखनाचे अंत:सूत्र समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या ‘इळनमाळ’, ‘दर कोस दर मुक्काम’, ‘पडझड’, ‘तसव्या’ आणि ‘भूईभेद’ यांसारख्या कादंबऱ्यांवरील अभ्यासकांचे काही मर्मग्राही लेख एकत्रित करून डॉ. अनंता सूर यांनी संपादित केलेल्या प्रस्तुत ग्रंथातील चिंतन अत्यंत मौलिक स्वरुपाचे ठरावे, असेच आहे. हे चिंतन मराठी साहित्याच्या वाचकमनातील मानवी संवेदनांच्या व समाजशास्त्रीय अन्वयाच्या सहसंबंधाने निश्चितच आकलनाच्या पातळीवरील नव्या दिशा स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरेल, याबद्दल आश्वस्त करणारे आहे.
– डॉ. अशोक नामदेव पळवेकर
Bhatkyanchi Bhramangatha Mandnara Kadambrikar : Ashok Pawar
इळनमाळ :
- बैलदाराच्या हृदयद्रावक जीवनाची कथा – डॉ.शरणकुमार लिंबाळे
- आजची कादंबरी – नोंदी आणि निरीक्षणे – प्रा.रंगनाथ पठारे
- भटक्या विमुक्त जमातीच्या व्यथावेदना – डॉ.अेकनाथ पगार
- जगण्याची संघर्षगाथा – डॉ.श्याम मोहरकर
दर कोस दर मुक्काम :
- पारध्यांची जीवघेणी कहाणी – डॉ.विनायक त्रिपत्तीवार
- पारध्यांच्या व्यथावेदनांची भळभळती जखम – डॉ.राजेंद्र मुंढे
- पारध्यांच्या एकाकी जीवनसंघर्षाचा जाहीरनामा -डॉ.रूपेश कऱ्हाडे
- पोटासाठी अपराधी ठरलेल्या पारध्यांची व्यथा – रवींद्र गुरव
पडझड :
- वडारांच्या विद्यमान स्थितीगतीवर भाष्य करणारी कादंबरी – डॉ.इसादास भडके
- भटक्यांची कैफियत मांडणारी जननिष्ठ कादंबरी – डॉ.नीळकंठ मेंढे
- मानवी अवमूल्यनाचा लेखाजोगा – डॉ.विनोद इंगळे
- वडारांच्या भेदक जगण्यावर मंथन करणारी गतिशील कादंबरी – डॉ.सोपानदेव पिसे
तसव्या :
- एका ध्येयवेड्या स्त्रीची संघर्षमय कहाणी – डॉ.वैजनाथ अनमुलवाड
- नायिकेचा जीवनसंघर्ष चितारणारी कादंबरी – प्रा.मनेश लिंबोरे
- ‘तसव्या’ कादंबरीचे अंतरंग तपासतांना – डॉ.गजानन लोहवे
- ध्येयाने झपाटलेल्या तरुणीच्या संघर्षाची कहाणी – डॉ.बाबाराव ठावरी
भुईभेद :
- पवारी स्टाईलची नवी कादंबरी – बाबाराव मुसळे
- समकालीन प्रश्नांच्या वाताहतीची कैफियत मांडणारी कादंबरी – डॉ.अनंता सूर
- हरवत चाललेल्या खेड्याच्या पडझडीचे चित्रण – रमेश चिल्ले
- वास्तव दर्शन घडवणारी कादंबरी – भास्कर गायकवाड
परिशिष्ट-1 लेखकांचा अल्पपरिचय
परिशिष्ट-2 अशोक पवारांचे साहित्य आणि पुरस्कार
परिशिष्ट-3 अशोक पवारांची मुलाखत