भारताचा इतिहास (इ.स. 701 ते 1525)
History of India (A.D. 701 to 1525)
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळापासून भारतावर शक, हूण, कुशाण, ग्रीक, अरबांनी आक्रमणे केली. अरबांचे आक्रमण इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठीच असल्यामुळे तुर्की व मोगल आक्रमकांकरिता मार्गदर्शक ठरले. मुस्लिम आक्रमकांना तत्कालिन भारतीय सत्ताधिशांनी वीरतेने तोंड दिले, पण गझनी, घोरी, ऐबक, खिलजी, तुघलक यासारख्यां आक्रमकांच्या कपटनीतीला ते बळी पडले. तत्कालिन भारतीयांमध्ये एकतेचा, दूरदर्शीपणाचा प्रचंड अभाव होता. हिंदूंचा वारंवार पराभव का होतो आहे याचे योग्य विश्लेषण ते करू शकले नाही. आपापसातील भाऊबंदकी, सत्तासंघर्ष, हेवेदावे यातच भारतीयांची प्रचंड शक्ती खर्च झाली. मुस्लिम आक्रमणामुळे सामान्य जनता कंगाल झाली. भयभीत झाली. त्यांच्या धर्मप्रसार, राजकीय हेवेदावे, सततचा रक्तरंजीत संघर्षामुळे सामान्यांना कोणीही वाली राहिला नाही. स्त्रियांची अवस्था आणखीनच भयावह झाली. आक्रमकांसोबतच आलेल्या स्थापत्य, कला, उद्योगधंदे, आर्थिकता व तांत्रिकता, समाजमान्य पद्ध्ातींचा भारतीय संस्कृतीबरोबर सरमिसळ झाली.
1. सुलतानशाहीपूर्वी भारताचा राजकीय इतिहास :
सुलतानशाहीपूर्वी भारताचा राजकीय इतिहास – महंमद बिन कासीमचे आक्रमण- सिंधची राजकीय स्थिती, अरबांच्या आक्रमणाची पार्र्श्वभूमी, सिंधवरील आक्रमणाचा उद्देश, महंमद इब्न कासीमचा मृत्यू, सिंधमधील हिंदूंचे शेवटचे राज्य, भारतात अरबी लोकांचे साम्राज्य वाढविण्याचा अयशस्वी प्रयत्न, अरबांच्या विजयाची कारणे, अरब आक्रमणाचे परिणाम. महंमद गझनीचे आक्रमण– सबुक्तिगीन, महमंद गझनीची भारतावरील आक्रमणे, सोमनाथवरील स्वारी, महमूदच्या विजयाची कारणे, आक्रमणाचा भारतावरील परिणाम, महंमदची योग्यता. महंमद घोरीचे आक्रमण– महंमद घोरीच्या स्वाऱ्यांचे उद्देश, महंमद घोरीची भारतावरील आक्रमणे, महंमद घोरीचा खून. तुर्कांच्या स्वाऱ्यांचे भारतावर झालेले परिणाम, कुतुबुद्दीन ऐबकापूर्वी भारतातील परिस्थिती, महंमद घोरीचा प्रतिनिधी म्हणून कुतुबुद्दीनची कामगिरी, महंमद घोरीची योग्यता, महंमद घोरीच्या विजयाची व भारतीय सत्तांच्या पराभवाची कारणे, तुर्की विजयाचा भारतावरील परिणाम.
कुतुबुद्दीन ऐबक – कुतुबुद्दीन ऐबक-गुलाम घराण्याचा संस्थापक, कुतुबुद्दीनचे राज्यारोहण, कुतुबुद्दीन ऐबकच्या मोहीमा, कुतुबुद्दीन ऐबकची योग्यता, कुतुबुद्दीन ऐबकाचे प्रशासन. शम्सुद्दीन अल्तमश, अल्तमश – दिल्ली सुलतानशाहीचा खरा संस्थापक, अल्तमशचे प्रशासन, अल्तमशनंतर सत्तेसाठी संघर्ष आणि वारसाहक्काचा घोळ, चाळीसांचा कारभार, रूकनुद्दीन फिरोज.
रझिया सुलतान – रुकनुद्दिन फिरोज विरुद्ध बंडे, विरोधकांची संभ्रमावस्था, विरोधकांचा बंदोबस्त, रझियाचे राजकीय धोरण, रझियाची अप्रियता, रझिया विरुद्ध कारस्थान, रझियाची योग्यता, रझियाच्या अपयशाची कारणे. बेहराम शाह, अल्लाउद्दीन मसूदशहा, नासरूद्दीन महंमद.
बल्बन नासरूद्दीनचा वझीर – पंतप्रधान या नात्याने बल्बनची कामगिरी, घियासुद्दीन बल्बन – बल्बनचे पूर्वजीवन, बल्बनची राज्यव्यवस्था, बल्बनची योग्यता, बल्बनचे वारस.
2. खिलजी व तुघलक घराणेे :
अल्लाउद्दीन खिलजी (1290-1296) – अल्लाउद्दीन खिलजीच्या मोहिमा, देवगिरीवर स्वारी, जलालुद्दीनची हत्या. अल्लाउद्दीन खिलजी (1296-1316) -अल्लाउद्दीनच्या प्रारंभिक अडचणी, अल्लाउद्दीन खिलजीचा राजसत्तेचा सिद्धांत, अल्लाउद्दीनचा उत्तर-दक्षिण भारतातील साम्राज्यविस्तार, अल्लाउद्दीनची योग्यता, अल्लाउद्दीन खिलजीच्या प्रशासकीय उपाययोजना, अल्लाउद्दीन खिलजीची न्यायपद्धती, अल्लाउद्दीन खिलजीच्या लष्करी सुधारणा
अल्लाउद्दीन खिलजीचे आर्थिक धोरण – अल्लाउद्दीनचे बाजार नियंत्रण, अल्लाउद्दीनचे महसूल विषयक धोरण. मलिक काफूर, मंगोल आक्रमण व दिल्लीची सुलतानशाही, मंगोल आक्रमणांचे भारतावरील परिणाम.
महंमद बिन तुघलक (1325-51) – महंमद तुघलकाचे निरनिराळे प्रयोग, महंमद तुघलकाचे प्रयोग अयशस्वी होण्याची कारणे, महंमदाची योग्यता
फिरोझ तुघलक (इ.स.1351-1388) – विविध सुधारणा/कार्ये, फिरोझशहाची योग्यता.
3. बहामनी आणि विजयनगरचे साम्राज्य :
दिल्ली सुलतानशाहीच्या पतनाची कारणे
बहामनी साम्राज्य, महंमद गवाणची कामगिरी, बहामनी साम्राज्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती.
विजयनगरचे साम्राज्य, तालिकोटची लढाई, विजयनगर साम्राज्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती.
4. सुलतानशाही काळातील समाज आणि प्रशासन व्यवस्था :
सुलतानशाही कालखंडातील राज्य व समाज – कुलीन किंवा सत्तारूढ वर्ग (अहल-ए-दौलत), बुद्धीवादी वर्ग (अहल-ए-कलम किंवा अहल-ए-सादत), व्यापारी वर्ग, कारागीर, शेतकरी, मजूर व गुलाम वर्ग, हिंदू समाज, मुस्लिम समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ संकल्पना.
सुलतानशाहीकालीन केंद्रीय प्रशासन – सुलतान,दिवाण-ए-वझारत (पंतप्रधान), दिवाण-ए-अरिझ (सैन्य मंत्रालय), दिवाण-ए-इन्शा (पत्रव्यवहार मंत्रालय), दिवाण्-ए-रसालत (परराष्ट्र मंत्रालय), दिवाण-ए-काझा (न्याय मंत्रालय), सद्र-उस-सदूर (धर्मदाय खाते), इतर विभाग. सुलतानशाहीकालीन प्रांतीय प्रशासन
सुलतानशाहीकालीन लष्करी प्रशासन – लष्कर विभाग, दशमान पद्धत, सैनिकांचे वेतन, लष्करातील शस्त्रास्त्रे, व्यूहरचना व गुप्तहेर, अल्लाउद्दीन खिलजीचे लष्करी प्रशासन.
5. सुलतानशाही काळातील सामाजिक स्थिती :
सुलतानशाहीच्या काळातील स्त्रियांची स्थिती – विवाह, घटस्फोट, पडदा पद्धत, जोहार पद्धत, सती पद्धत, स्त्री-शिक्षण, स्त्रियांचा राजकारणात सहभाग, स्त्रियांची आर्थिक परिस्थिती, मालमत्ता व स्त्री हक्क, देवदासी.
सुलतानशाहीकालीन आर्थिक व तांत्रिक विकास – सुलतानशाहीकालीन शेती-व्यवसाय, सुलतानशाही काळातील व्यापार, व्यापारी जमाती, वस्तूंच्या किंमती, सुलतानशाहीच्या काळातील उद्योगधंदे.
धार्मिक चळवळी – भक्ती चळवळ, भक्ती मार्ग चळवळीतील प्रमुख संत, वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, लिंगायत संप्रदाय, सुफी संप्रदाय.
6. स्थापत्य व कला :
गुलाम घराण्यातील स्थापत्य-कला (1206-1290), खिलजी घराण्यातील स्थापत्य-कला (1290-1320), तुघलक घराण्यातील स्थापत्य-कला (1320-1411), सय्यद व लोदी घराण्यातील स्थापत्य-कला (1411-1526), बहामनी साम्राज्यातील स्थापत्य-कला, विजयनगर साम्राज्यातील स्थापत्य-कला.
प्रादेशिक, ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास -रिध्दपूर, अंजनगाव-सुर्जी, अचलपूर (एलिचपूर), कोंडेश्वर मंदिर, जि. अमरावती, गाविलगड, चिखलदरा, कारंजा (लाड), आसदगड, दुर्ग नरनाळा, देवगिरी किल्ला, दुर्ग माहूर.