भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते इ.स. 700 पर्यंत)
History of India (From Early to A.D. 700)
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळी भारत सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांबरोबर चालत असे. त्याच्या संस्कृतीची किर्ती संपूर्ण जगात पसरली होती. कलाकौशल्य, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि व्यापार यांच्या बाबतीत हा देश जगाला मार्गदर्शक होता. इ.स.पू. सहावे शतक हे भारताच्या इतिहासात धार्मिक क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मौर्य काळात भारतात एकछत्री साम्राज्य निर्माण झाले. शक, हूण, कुषाण यांची आक्रमणे झालीत. पण ते भारतीय संस्कृतीतच विलीन झाले. इस्लामची आक्रमणे मात्र केवळ राजकीयच नव्हती तर ती भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारी होती. दक्षिणेत राष्ट्रकूट, चालुक्य, चोल व पांड्य यांची राज्ये निर्माण होवून शिल्पकलेला नवा आयाम मिळाला. शेकडो सुंदर देवालयांची निर्मिती झाली. सदरील पुस्तकात प्राचीन भारतीय इतिहास साधने, सिंधू संस्कृती, पूर्व वैदिक काळ व उत्तर वैदिक काळ, परकियांची आक्रमणे, मौर्यकाल व मौर्येात्तर कालखंड, गुप्त साम्राज्य, वर्धन साम्राज्य, दक्षिणेकडील महत्त्वाची घराणी तसेच प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती, स्त्रीयांचे जीवन, न्यायपद्धती, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीचा समावेश आहे. सदरील ग्रंथ इतिहास वाचकांसाठी तसेच पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहे.
Bharatacha Itihas (Praranbhapasun Te C.E. 700 Paryant)
1. प्राचीन भारतातील साधने :
प्रारंभिक इतिहासाचे महत्त्व, प्राचीन भारतीय इतिहासाची साधने, भौतिक साधने, वाङ्मयीन साधने, वैदिक धर्मग्रंथ, अवैदिक धर्मग्रंथ, इतर वाङ्मय, परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते, फाहियान. हडप्पा संस्कृती : कांस्ययुगीन सभ्यता- भौगोलिक विस्तार, संस्कृतीचा शोध, संस्कृतीचा काळ, कांस्ययुगीन संस्कृती, नागर संस्कृती, व्यापार, धार्मिक रीतीरिवाज, कला, हस्तकला आणि तांत्रिक ज्ञान, शिल्पकला व मूर्तिकला, मातीच्या शोभेच्या मूर्ती, धातुकाम, लिपी, सिंधु संस्कृतीच्या विनाशाची कारणे, वैदिक उत्तर-वैदिक काळातील संस्कृती, आर्यांचा राज्यविस्तार- जमातींची राज्यव्यवस्था, सामाजिक विभागणी, धार्मिक विधी आणि तत्वज्ञान, वेदकालीन धर्माची वैशिष्ट्ये, उत्तर वैदिक काळ – राजकीय व्यवस्था, धार्मिक विधी, सामाजिक संघटन, वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्था, विवाह प्रकार, समाजातील स्त्रीचे स्थान, वैदिक वाङ्मय.
2. धार्मिक चळवळी :
जैन धर्म व बौद्ध धर्म, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, धम्मविषयक धोरण.
3. शुंग-कुशाण आणि सातवाहन :
अ) ग्रीक, शक व कुशाण आक्रमणे –
(ब) शुंग-सातवाहन काळ – शुंग घराणे, पुष्यमित्र, अग्निमित्र; दक्षिणेतील पहिले साम्राज्य (सातवाहन), सिमुक, कृष्ण, पहिला सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुमायी, यज्ञश्री, राजकीय व्यवस्था आणि प्रशासन, समाज, अर्थव्यवस्था, कृषी व्यवस्था, कला व संस्कृती
4. सुवर्ण युग, वाकाटक व वर्धन घराणे :
1) सुवर्णयुग 2) वाकाटक घराणे (इ.स.250 ते 550) – वाकाटकांचे मूलस्थान, वाकाटक घराण्यातील राजे, वाकाटकांची वत्सगुल्म शाखा, प्रशासन व्यवस्था, कला व स्थापत्य, उद्योगधंदे 3) वर्धन घराण्ो – वर्धन घराण्याचा पूर्वेतिहास, प्रभाकर वर्धन, राज्यवर्धन; सम्राट हर्षवर्धन – हर्षवर्धनपुढील संकट, दक्षिणेतून माघार, पश्चिम भारतावर स्वारी; हर्षाचे प्रशासन – सम्राट, मंत्रिमंडळ, प्रांतीक शासन, न्यायव्यवस्था, सैन्य, अर्थ विभाग, धर्म, धर्मपरिषद, शिक्षण, नालंदा विद्यापीठ, हर्षाची योग्यता
5. प्राचीन भारत – शिक्षण, स्त्री जीवन व न्यायपद्धती :
अ) प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती व विद्यापीठे : शिक्षणाचा हेतू, गुरुकुल, जैन शिक्षण पद्धती, बौद्ध शिक्षण पद्धती, प्राचीन भारतातील काही विद्यापीठे ब) प्राचीन भारतातील स्त्रीजीवन क) प्राचीन भारतातील कायदे व न्यायव्यवस्था
6. प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य :
हरप्पन/सिंधू संस्कृती, मौर्यकालीन कला व स्थापत्य, कनिष्क कला व स्थापत्य कलेचा आश्रयदाता, टेराकोटा (तपकिरी लाल रंगाची माती), वाकाटक कालीन कला व स्थापत्य, प्रादेशिक पुरातत्वीय स्थळे – भोन, लोणार, तारापूर, शारंगधर बालाजी, कंचनीचा महाल, वाशिम, सालबर्डी, मुक्तागिरी, वेरूळ लेणी, रामटेक, प्रतिष्ठान (पैठण), अजिंठा, कंधार