भारताचा इतिहास (1857 ते 1950)
History of India (1857 to 1950)
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक घटकांचे योगदान होते. स्वातंत्र्य चळवळ निर्माण करण्याची पार्श्वभूमी अनेकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली. अनेक व्यक्ती आणि संस्था यांचे योगदान ही पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कारणीभूत झाले. या दृष्टीने एकोणिसावे शतक हे महत्त्वाचे मानतात. या शतकात भारतात सामाजिक आणि धार्मिक चळवळी झाल्या. या दृष्टीने भारताच्या इतिहासातील एकोणिसावे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि बौद्धिक जागृती घडून आली.
सदरील पुस्तकात सामाजिक व धार्मिक चळवळी, भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह, कामगार संघटना, प्रांतीय स्वायत्तता, जमातवादाचा उदय आणि विकास, स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी या सर्व घटकांची विस्तृत व सविस्तर माहिती देण्याच्या प्रयत्न केला आहे.
Bharatacha Itihas (1857 to 1950)
- सामाजिक व धार्मिक चळवळी : सामाजिक व धार्मिक प्रबोधनाची कारणे, राजा राममोहन रॉय व ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, रामकृष्ण मिशन आणि विवेकानंद, वहाबी आंदोलन, शिख सुधारणा चळवळ, जात संस्कृतीकरण आणि ब्राम्हणविरोधी प्रवाह
- भारतीय राष्ट्रवाद : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेले घटक, मवाळ काँग्रेस, भारत सेवक समाजाची स्थापना, जहाल गट, सुरत काँग्रेस, जहाल गटाच्या उदयाची कारणे, क्रांतीकारी चळवळी, स्वदेशी चळवळ, भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा, अमेरिकेतील क्रांतीकारकांच्या चळवळी, गदर आंदोलन, गदर चळवळीच्या अपयशाची कारणे.
- राष्ट्रवाद आणि सामाजिक गट अंर्तप्रवाह : स्त्रीयांच्या उत्थापनाचे प्रयत्न, शेतकर्यांच्या चळवळी, संथाळाचा उठाव, बंगालमधील नीळ उत्पादकांचे बंड, पंजाब भूमी हस्तांतर कायदा, आदिवासी उठाव, कामगार वर्ग निर्माण होण्याची कारणे, कामगारांच्या निर्माण झालेल्या समस्या, दलित चळवळ, महात्मा गांधीजी, जातिभेद निर्मूलन प्रक्रिया गतिमान होण्याची कारणे, दलित चळवळीची वाटचाल
- महात्मा गांधीजी आणि राष्ट्रीय चळवळ : म.गांधीजींचे हिंदुस्थानात आगमन, साबरमती आश्रमाची स्थापना, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, म.गांधीजींचे तत्त्वज्ञान, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जाव आंदोलन सुरु करण्याची कारणे, सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना, रासबिहारी बोस आणि आझाद हिंद सेना, आझाद हिंद सरकारची स्थापना,
- प्रांतीय स्वायत्तता : भारत सरकारचा 1935 चा कायदा, 1935 चा कायदा मंजूर करण्याची कारणे, 1935 च्या कायद्याची ठळक वैेशष्ट्ये : इंग्लंडमधील भारतविषयक शासन व्यवस्था, भारतातील शासन व्यवस्था, 1942 ते 1946 या काळातील सत्तांतर विषयक विविध योजना
- जमातवादाचा उदय आणि विकास : अलिगढ चळवळ – मुस्लिम लिग : 1857 चे बंड आणि मुसलमान, लखनौ करार होण्याची कारणे, इंग्लंडला शिष्टमंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : संघ स्थापण्यामागील उद्देश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान, हिंदू महासभा : हिंदू महासभा स्थापन होण्याची कारणे, हिंदू महासभा स्थापनेची उद्दिष्टये, वि.दा.सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू महासभा
- स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी : क्रिप्स योजना : क्रिप्स मिशन हिंदुस्थानात पाठविण्याची कारणे, वेव्हेल योजना जाहीर करण्याची कारणे ः वेव्हेल योजनेतील प्रमुख तरतुदी, कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजना, घटना समितीच्या निवडणुका, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा कायदा, राज्यघटनेची निर्मिती, विभाजनानंतर झालेल्या दंगली, हैद्राबाद संस्थानाचे विलीनीकरण, संस्थानांच्या एकीकरणाचे परिणाम.