भारताचा भूगोल
Geography of India
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
भारत हा एक प्राचीन संस्कृती व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा लाभलेला महान देश आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. भारत हा विशाल खंडप्राय देश असून विविधतेने नटलेला आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय, दक्षिणेस विस्तृत हिंदी महासागर, पूर्वेस बंगालचा उपसागर व पश्चिमेस अरबी समुद्र शिवाय अंतर्गत भागातील भूरचनेतील विविधता यामुळे भारताचे हवामान वैविध्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात जगातील बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानाचे आविष्कार पाहायला मिळतात. पश्चिम आशिया व पूर्व आशियाच्या मध्यभागात भारत स्थित असून हिमालय पर्वताच्या दक्षिणेस हिंदी महासागरपर्यंत पसरलेला भारत हा आशिया खंडाचा एक उपखंड समजला जातो. भारताचा लोकसंख्या बाबतीत जगात चीन नंतर दूसरा क्रमांक लागतो. भारतातील खनिज व शक्ती साधनसंपत्तीचे वितरण विषम झालेले आहे. भारताचे शेजारील देशांदरम्यान भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आहेत.
Bharatacha Bhugol
- भारत – स्थान आणि विस्तार : अ) भारत दृष्टीक्षेपात : भारताचे स्थान, विस्तार, आकार व क्षेत्रफळ, भारताचे शेजारील देश, भारताचे प्रशासकीय विभाग. ब) भारत – प्राकृतिक रचना : हिमालय पर्वतीय विभाग – हिमालयाचे प्राकृतिक विभाग- हिमालयाचे प्रादेशिक विभाग. उत्तरेकडील मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, किनारीय मैदानी प्रदेश, भारतीय बेटे क) भारतातील नदी प्रणाली : अ. हिमालयीयन नदीप्रणाली : महत्त्वाच्या नद्या – सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. ब. द्वीपकल्पीय नदीप्रणाली : महत्त्वाच्या नद्या-नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. हिमालयातील व पठारावरील नद्यांची तुलना.
- हवामान, मृदा आणि नैसर्गिक वनस्पती : अ) हवामान दृष्टीक्षेपात : भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक, भारतीय हवामान प्रदेश, त्रिवार्थाने केलेले हवामान प्रदेश, आर.एल. सिंह यांनी केलेले हवामान प्रदेश, मान्सून – वार्याची वैशिष्ट्ये, भारतीय मान्सूनचे विभाग : अ.उत्तर-पूर्व मान्सून वारे (ईशान्य मान्सून), ब. दक्षिण-पश्चिम मान्सून वारे (नैऋत्य मान्सून). भारतातील वार्षिक पर्जन्याचे वितरण. ब) मृदा : व्याख्या, मृदेची मूलद्रव्ये – अ. सेंद्रिय, ब. असेंद्रिय, मृदेची निर्मिती – जनन खडक, स्थलाकृती, काळ, हवामान, जीवशास्त्रीय क्रिया, मृदेची वैशिष्ट्ये-पोत, संरचना, थराची जाडी/खोली, रंग, आम्लविम्लता/सामू, मृदेचा छेद, मृदेचे प्रकार – अवशिष्ट जमीन, स्थलांतरीत जमीन, भारतातील मृदा प्रकार – गाळाची, काळी, तांबडी, जांभी, वाळवंटी, पर्वतीय, क्षारीय, दलदलयुक्त. मृदा धूप व संवर्धन, मृदा धूप होण्याची कारणे, मृदा संवर्धन क) नैसर्गिक वनस्पती : वनाचे प्रशासकीय वर्गीकरण, भारतीय अरण्याचे आर्थिक महत्त्व – वनाचे प्रत्यक्ष फायदे, अप्रत्यक्ष फायदे, भारतातील वन प्रकार.
- लोकसंख्या आणि शेती : अ) लोकसंख्या : 1901 पासून भारतातील लोकसंख्येची वाढ, भारतातील लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता-प्रकार, महत्त्व, भारतातील लोकसंख्येचे घनतेनुसार प्रादेशिक व राज्यनिहाय वितरण, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक – अ. प्राकृतिक घटक ब. आर्थिक व सांस्कृतिक घटक, राज्यनिहाय राजधानीची केंद्रे व महानगरे ब) शेती : ळ) भारतातील प्रमुख पिकांच्या वाढीसाठी अनुकूल, भौगोलिक परिस्थिती, उत्पादन व वितरण – अ) तांदूळ ब) कापूस ळळ) भारतातील कृषी हवामान विभाग
- साधनसंपत्ती आणि उद्योगधंदे : अ) साधनसंपत्ती : लोहखनिज, बॉक्साईट, कोळसा, जलविद्युत शक्ती, उत्पादन व वितरण. ब) उद्योगधंदे : सुती कापड उद्योग, साखर उद्योग, उत्पादन व वितरण, भारतातील प्रमुख औद्योगिक विभाग, भारताचे औद्योगिक धोरण.