भारताचा शोध
Discovery of Bharat
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतवर्ष भारतीय संस्कृतीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. भारतवर्षाची संकल्पना, वेद उपनिषदे, हिंदू, जैन, बौद्ध साहित्य, भारताची ज्ञानपरंपरा कला आणि संस्कृतीत हडप्पा, सिंधु संस्कृतीमधील स्थापत्यकला, शिल्पकला, मुर्तीकला, चित्रकला तसेच निरनिराळ्या कालावधीमधील कलासंस्कृती विकासाचा समावेश केला आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत प्राचीन विद्यापीठे, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठाचा परिचय देऊन भारतीय शिक्षणपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकासातील सर्वधर्मीय विचार, विस्तार, जनपद, ग्रामस्वराज्याबद्दल माहितीचे संकलन केलेले आहे. प्राचीन भारतातील विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्राची माहिती देताना पर्यावरण जाणीव जागृती, आयुर्वेद, योग विपश्यना आणि निसर्गोपचारांची ओळख करून दिलेली आहे. भारतीय आर्थिक परंपरा आणि ज्योतिषशास्त्र विकासात भारतीय व्यवसाय, उद्योग समुद्री व्यापार तसेच अर्थतज्ज्ञांच्या आर्थिक विचारांचा समावेश केलेला आहे.
Bhartach Shoda
1. भारतवर्षाची संकल्पना :
भारतवर्ष, अनंतकालीन भारताचा अर्थ, वेद-ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद. भारतीय साहित्यप्रभा, वेद व उपनिषदे, जैन साहित्य-आगम, बौद्ध साहित्य – त्रिपटक, विनयपिटक, सुप्तपिटक, अभिधम्मपिटक, कथावत्थू, अट्ठकथा, मिलिंदप्रश्नो.
2. भारतीय ज्ञानपरंपरा, कला व संस्कृती :
हडाप्पा संस्कृती, स्थापत्यकला वैशिष्ट्ये, मूर्तिकला व शिल्पकला, चित्रकला, वैदिककला व स्थापत्य, मौर्यकालीन कला व स्थापत्य वैशिष्ट्ये, गुप्तकालीन भारतीय कला व संस्कृती, सातवाहनकालीन कला व संस्कृती, वाकाटक कला व संस्कृतीविकास, भारतीय शिक्षणपद्धती, तक्षशिला विद्यापीठ, मदुरा विद्यापीठ, वल्लभी विद्यापीठ नालंदा विद्यापीठ.
3. धर्म, तत्त्वज्ञान आणि ग्रामीण संस्कृती विकास :
भारतीय धर्म व दर्शन आकलन (वैदिक व जैनिझम) बौद्धधर्म व विस्तार, जनपद व ग्रामस्वराज्य संकल्पना.
4. विज्ञान, पर्यावरण आणि औषधीशास्त्र :
प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान; पर्यावरण संरक्षण (भारतीय दृष्टिकोन), स्वास्थ जाणीव-जागृति, आयुर्वेद, योग, विपश्यना, निसर्गोपचार.
5. भारतीय आर्थिक परंपरा व ज्योतिषशास्त्र :
भारतीय अंकपद्धती आणि गणित, कालमापन, भास्कराचार्य, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र संकल्पना, भारतीय आर्थिक विचार उद्योग, अंतर्गत व्यापार, समुद्री व्यापार, कौटिल्य, दादाभाई नौरोजी, म.गो.रानडे, श्री.रमेशचंद्र दत्त, मानवेंद्ररॉय महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले, डॉ.बी.आर. आंबेडकर, धनंजय रा.गाडगीळ, यशवंतराव चव्हाण.