भारताची राष्ट्रीय सुरक्षा
Indian National Security
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची चाचणी, आक्रमक व शत्रुला विस्मयाचा धक्का देणार्या सर्जिकल स्ट्राईक्स, बालाकोट एअरस्ट्राईक आणि डोकलाम विवादात घेतलेल्या ठाम व कणखर भूमिकेमुळे चीनी सैन्याला घ्यावी लागलेली माघार या प्रासंगिकतेतून भारताने आज आक्रमक व वास्तववादी सुरक्षा धोरणाचा अंगिकार केल्याचे स्पष्ट होते. परिणामी ‘सॉफ्ट स्टेट’ ही भारताची आजवरची प्रतिमा पुसून टाकण्यात आपण बर्यापैकी यशस्वी झालो आहोत.
राष्ट्रीय सुरक्षा ही देशासाठी प्राधान्यक्रमाची बाब असून कोणतीही आर्थिक, औद्योगिक प्रगती किंवा विकास हा पुरेशा सुरक्षेशिवाय निरर्थक आहे. प्रादेशिक समस्यांमध्ये भाषा, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, धार्मिक व आर्थिक समस्या तसेच सांप्रदायिकता, स्थलांतर, निरक्षरता, लिंगभेद, नव्याने प्रस्थापित झालेली समाज माध्यमे व त्यापासून होणारे दुष्परिणाम, आरोग्य, पर्यावरण, माओवादी चळवळी, शेजारील राष्ट्रांचा अमानुष दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि भारताच्या सीमा समस्या व सुरक्षा या सर्व समस्या आणि नव्याने उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा यथायोग्य परामर्श ‘भारताची राष्ट्रीय सुरक्षा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रशक्तीवर विविध समस्यांचा परिणाम होऊन देश दुबळा कसा बनतो व त्याचबरोबर करावयाच्या उपाययोजनाही सूचविण्यात आलेल्या आहेत.
Bharatachi Rashtriya Surksha
- भारताची राष्ट्रीय सुरक्षा : प्रस्तावना, अर्थ, संकल्पना, हित व सुरक्षेचे वास्तववादी रितीने संवर्धन आवश्यक, व्याप्ती, राष्ट्रीय सुरक्षेची प्रासंगिकता, सुरक्षा धोरणाचा आढावा, विद्यमान परिस्थिती; भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेची मूल्ये – 1. संसदीय लोकशाही 2. संघराज्य पद्धती 3. प्रजासत्ताक राज्य 4. समाजवाद
- भारतातील प्रादेशिकता : प्रस्तावना, अर्थ, संकल्पना, प्रादेशिकतेची कारणे; भौगोलिक घटक – 1. ऐतिहासिक व सांस्कृतिक घटक 2. जात आणि धर्म 3. आर्थिक घटक; प्रादेशिकतेचे प्रभाव; प्रादेशिकतेचे प्रकार – 1. भाषा 2. राजकीय 3. धार्मिक 4. आर्थिक; समारोप
- भारतातील सामाजिक समस्या आणि त्यांचे परिणाम : प्रस्तावना; निरक्षरता – भारतातील निरक्षरतेची कारणे, निरक्षरतेचे तोटे, उपाययोजना; सांप्रदायिकता – सांप्रदायिकतेची कारणे, परिणाम, उपाययोजना; स्थलांतर – स्थलांतराची कारणे, स्थलांतराचे परिणाम; लिंगभेदाची समस्या; समारोप
- समाजमाध्यमे आणि सुरक्षा : प्रस्तावना, समाज माध्यमांचा इतिहास, समाज माध्यमांचे प्रकार; समाज माध्यमांचे उपयोग – (अ) सकारात्मक उपयोग, फायदे (ब) नकारात्मक उपयोग; व्हायरल होणे – 1. सामाजिक उपयोग 2. शैक्षणिक उपयोग 3. सुरक्षा 4. आरोग्य 5. पर्यावरण; परिणाम, उपाययोजना
- भारतातील माओवादाची समस्या : प्रस्तावना, अर्थ, डाव्या विचारसरणीचा हिंसक आंदोलनाचा इतिहास, चीनचे प्रोत्साहन, व्याप्ती, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील दुष्परिणाम, कारणे, माओवादाचा मध्य व दक्षिण भारतात प्रसार, आदिवासींच्या जनाधाराची मीमांसा, माओवादी चळवळीचे स्वरुप
- भारतातील दहशतवाद : प्रस्तावना, अर्थ, दहशतवादाच्या व्याख्या, व्याप्ती, भारतातील दहशतवादाचा आढावा, दहशतवाद्यांची कार्यपद्धती, दहशतवाद निर्मितीची कारणे; दहशतवादाचे प्रकार – 1. बंडखोरी किंवा फुटीरता 2. क्रांतीकारक 3. सुधारणावादी 4. पुनर्स्थापनावादी 5. प्रायोजित दहशतवाद
- सायबर गुन्हे आणि सुरक्षा : प्रस्तावना, अर्थ, संकल्पना, सायबर गुन्हेगारीचे स्वरुप, सायबर युद्ध; सायबर युद्धाचे प्रकार – 1. हॅकिंग; चिनी हॅकर्सची भारतावर नजर 2. कॉपी राईट उल्लंघन 3. लैंगिंक शोषण 4. बाल शोषण; सायबर गुन्ह्यांची मूलभूत उपकरणे, उपाययोजना
- सीमा समस्या आणि सुरक्षा : प्रस्तावना, भारताच्या भूसीमा, भारताच्या सागरी सीमा; भारत-चीन सीमा – लड्डाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व उत्तर प्रदेश, नेपाळ, सिक्किम, भूतान, अरुणाचल प्रदेश; मॅकमहोन रेषा, भारत-चीन सीमा विवाद, भारत-चीन युद्ध, कोलंबो प्रस्ताव, भारत-चीन संघर्ष (1967)