भारतातील प्रवास आणि पर्यटन
Travel and Tourism in India
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राचीन काळापासून ‘प्रवास’ ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आढळून येते. हळू-हळू मानव उत्क्रांत होत गेला, प्रगत होत गेला, तसतसे त्याचे भ्रमंतीचे उद्देश्य तसेच वाहतूकीची साधनेही बदलत गेलीत. मोटारी, रेल्वे, विमान, जहाज इ. प्रगत व आधुनिक वाहतूकीची साधने उपलब्ध होत गेल्याने जगभर प्रवास करणे सुकर होत गेले. परिणामतः पर्यटन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वपूर्ण आर्थिक उद्योगक्षेत्र म्हणून विकसित झाले. सुक्ष्म नियोजन केल्यास पर्यटन क्षेत्राच्या साहाय्याने देशाचा आर्थिक व एकूणच सर्वांगीण विकास साध्य करणे कठीण नाही. भारतासारख्या भौगोलिक विविधता, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वप्राप्त देशात पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहेत.
प्रस्तुत पुस्तकात पर्यटनाचा अर्थ, स्वरूप, उद्दिष्ट्ये, प्रकार, भूमिका, नियोजन, वाहतूक साधने, निवास व्यवस्था, मार्गदर्शक या संबंधीचे सचित्र विवेचन सविस्तररित्या केलेले असून भारतातील महत्त्वपूर्ण व निवडक अशा धार्मिक स्थळे, लेण्या, किल्ले, स्मारके इत्यादींची उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे.
Bharatatil Pravas And Paryatan
- पर्यटन : संकल्पना व प्रकार : 1.1 पर्यटन : अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.1.1 पर्यटन म्हणजे काय?, 1.1.2 पर्यटनाच्या व्याख्या, 1.1.3 पर्यटनाचे स्वरूप, 1.1.4 पर्यटनाची व्याप्ती, 1.2 पर्यटनाचे उद्दिष्ट्ये व प्रकार, 1.3 पर्यटनात इतिहासाची भूमिका
- पर्यटन : नियोजन : 2.1 नियोजन : कारणे आणि घटक, 2.1.1 पर्यटन नियोजनाची कारणे, 2.1.2 पर्यटन नियोजनाचे घटक, 2.1.3 पर्यटन नियोजनाचे प्रतिमान, 2.1.4 पर्यटन नियोजनाचे प्रकार, 2.2 वाहतूक : साधने आणि पर्यटन विकास, 2.2.1 वाहतूक साधने, 2.2.2 पर्यटन विकास, 2.3 निवासव्यवस्थेचे स्वरूप व प्रकार, 2.4 पर्यटन मार्गदर्शकाची गुणवैशिष्टये
- भारतातील ऐतिहासिक पर्यटनस्थळे : 3.1 लेण्या, 3.1.1 अजिंठा लेणी, 3.1.2 वेरूळ लेणी, 3.1.3 पितळखोरी लेणी, 3.1.4 एलिफंटा लेणी, 3.2 किल्ले, 3.2.1 लाल किल्ला (नवी दिल्ली), 3.2.2 जंजिरा, 3.2.3 रायगड, 3.2.4 देवगिरी/दौलताबादचा किल्ला, 3.3 स्मारके, 3.3.1 ताजमहाल (आग्रा), 3.3.2 गोलघुमट (विजापूर), 3.3.3 बीबी का मकबरा (औरंगाबाद), 3.4 धार्मिक स्थळे, 3.4.1 सुवर्णमंदिर, 3.4.2 वाराणसी, 3.4.3 मांगी-तुंगी, 3.4.4 जामा मशिद, 3.4.5 बासिलिका ऑफ बॉम जीझस (गोवा), 3.4.6 बोधगया, 3.4.7 पंढरपूर