Prashant Publications

My Account

भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय

Introduction to Museums in India

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493689
Marathi Title: Bharatatil Vastusangrahalyancha Parichay
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 288
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bharatatil-Vastusangrahalyancha-Parichay-by-Dr-Ramesh-Dattatray-Gangathade-Dr-Anil-Murlidhar-Kathare
Categories: ,

350.00

  • DESCRIPTION
  • INDEX

वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. युरोपात कालांतराने अनेक खाजगी वस्तुसंग्रहालये स्थापन झाली. फे्ंरच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये खाजगी संग्रहालयाचे रूपांतर सार्वजनिक संग्रहालयात करण्यात आले आणि ही प्रथा कालांतराने भारतात सुरू झाली. भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालने इ.स. 1814 मध्ये पहिले वस्तुसंग्रहालय कलकत्ता येथे स्थापन केले आणि या संग्रहालयात सर्व प्राचीन वस्तूंचा संग्रह करून ठेवण्यात आला. यानंतरच्या काळात वस्तुसंग्रहाच्या कक्षा रुंदावल्या आणि पारंपरिक संग्रहालयाची जागा आधुनिक संग्रहालयाने घेऊन पारंपरिकरीत्या वस्तूंचा संग्रह करण्याची पद्धती मागे पडून राष्ट्रीय, प्रांतीय, स्थानिक, संस्थात्मक पातळीवर वस्तूंचा संग्रह करून वस्तुसंग्रहालये हे ज्ञान देणार्‍या संस्था बनलेल्या आहेत. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयात पाच हजार वर्षांच्या कलाविषयक, सांस्कृतिक व समृद्ध इतिहासाचा ठेवा जपून ठेवलेला आहे. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने व विषयवार आकर्षक पद्धतीने वस्तूंची मांडणी करण्यात आली आहे. संग्रहालयामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडण्यास मदत होते. मानवी स्वभाव, संस्कृती, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, अलंकार, करमणुकीची साधने, आहार-विहार इत्यादींसारख्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडते. प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक व पुरातत्वविषयक वस्तुसंग्रहालयाचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Bharatatil Vastusangrahalyancha Parichay

  1. वस्तुसंग्रहालये : वस्तुसंग्रहालयाच्या व्याख्या, भारतात वस्तुसंग्रहालयांचा उदय आणि विकास : ऐतिहासिक आढावा, प्राचीन भारतातील वस्तुसंग्रहालये, कंपनी सरकारच्या काळातील वस्तुसंग्रहालये (इ.स. 1784 ते 1857), संस्थानांमधील वस्तुसंग्रहालये (इ.स. 1857 ते 1898), ब्रिटीश कालखंडातील वस्तुसंग्रहालये (इ.स. 1898 ते 1928), जनतेच्या सहभागातून निर्माण झालेले वस्तुसंग्रहालये (1928 ते 1947), स्वातंत्र्यानंतर वस्तुसंग्रहालयाचे बदलते स्वरूप (इ.स. 1947 नंतर), भारतातील संग्रहालयाची यादी, वस्तुसंग्रहालयाचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रीय दर्जाची वस्तुसंग्रहालये, स्थानिक पातळीवरील वस्तुसंग्रहालये – (अ) शैक्षणिक संस्थांशी संलग्नित वस्तुसंग्रहालये (ब) स्थानिक संस्थांच्या आधिपत्याखालील वस्तुसंग्रहालये
  2. वस्तुसंग्रहालयांचे व्यवस्थापन : वस्तुसंग्रहालय व्यवस्थापनाची भुमिका, वस्तुसंग्रहालयांतील सेवकवर्ग, प्रशिक्षण, व्यवस्थापकाच्या जबाबदार्‍या, वस्तुसंग्रहालयातील वस्तुंचा संग्रह; वस्तुसंग्रहाच्या पद्धती – खरेदी, वस्तूंची अदलाबदल, कर्जाऊ स्वरूपात वस्तू मिळविणे, भेट स्वरूपात मिळालेल्या वस्तू, जमिनीत मिळालेल्या वस्तू; वस्तुसंग्रहालयातील वस्तू जतन करण्याच्या पद्धती – पर्यावरणीय संवर्धन, सेंद्रिय वस्तुंचे जतन, असेंद्रिय वस्तूंचे जतन; वस्तूंचे प्रदर्शन, वस्तूसंग्रहालयाचे अंतर्गत व बाह्य उपक्रम; वस्तुसंग्रहालयाचे प्रकार – कलासंग्रहालय, इतिहासविषयक संग्रहालय, पुरातत्व विभागाची वस्तुसंग्रहालये, विज्ञान व तंत्रज्ञानविषयक संग्रहालये, मानववंशशास्त्रीय संग्रहालये, प्राकृतिक संग्रहालये, प्रादेशिक संग्रहालये, स्थानिक वस्तुुसंग्रहालये, राष्ट्रीय संग्रहालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची संग्रहालये, राज्य संग्रहालये, विद्यापीठ-महाविद्यालय व शैक्षणिक वस्तुसंग्रहालये, विशेष संग्रहालये, संस्था संग्रहालये, खाजगी संग्रहालये, महाराजांची संग्रहालये, औद्योगिक वस्तुसंग्रहालये, वैयक्तिक स्मारक वस्तुसंग्रहालये, सैनिक व संरक्षण वस्तुसंग्रहालये, वन आणि कृषी वस्तुसंग्रहालये, मंदिर वस्तुसंग्रहालये, स्थापत्य वस्तुसंग्रहालये, सृष्टीविज्ञान वस्तुसंग्रहालये, बाल वस्तुसंग्रहालये, वैद्यकिय वस्तुसंग्रहालय; वस्तुसंग्रहालयाचे स्वरूप
  3. काही प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये : भारतातील वस्तुसंग्रहालयांचे प्रमुख प्रकार – राष्ट्रीय दर्जाची संग्रहालये, प्रांतीय पातळीवरील संग्रहालये, स्थानिक पातळीवरील संग्रहालये, संस्थात्मक संग्रहालये; भारतीय राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली (1949) – वस्तुसंग्रहालयातील वस्तू – सिंधू नदीचे संस्कृती दालन, इतर दालनातील वस्तू, भारतीय कलेचा इतिहास आणि उत्क्रांती, ब्राँझ कलादालन, पहिल्या मजल्यावरील दालने, मध्य आशियातील कला वस्तू, कोलंबसपूर्वीची कला स्वतंत्र दालन; बाह्य उपक्रम किंवा बहिस्थ कार्य; दिल्लीतील इतर वस्तुसंग्रहालये – राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, राष्ट्रीय हस्तकला व हातमाग संग्रहालय, पुरातत्व संग्रहालय (लाल किल्ला), भारतीय युद्ध स्मारक संग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र संग्रहालय, शंकरचे आंतरराष्ट्रीय बाहुल्याचे संग्रहालय भारतीय वस्तुसंग्रहालय, कलकत्ता – पुरातत्व विभाग, कला विभाग (व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल), मानववंशशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र विभाग; कलकत्ता शहरातील इतर संग्रहालये – व्हिक्टोरिया स्मारक संग्रहालय, राजा राममोहनरॉय स्मारक संग्रहालय, बोट म्युझियम (संग्रहालय), कलकत्ता पोस्टल संग्रहालय, नेताजी भवन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई (1922) – वस्तुसंग्रहालयाची इमारत; वस्तुसंग्रहालयातील विभाग – मध्यवर्ती दालन, प्रागैतेहासिक दालन, चित्राचे दालन, शोभीवंंत कलावस्तू दालन, नॅचरल हिस्ट्री विभाग, शिल्पकला, पुराणवस्तू विभाग, मूर्तीकला विभाग, लघुचित्र दालन, नाणेदालन, इतर वस्तू आणि दागिने विभाग; मुंबई शहरातील इतर संग्रहालये – नॅशनल गॅलरी ऑफ मार्डन आर्ट, मनी भवन संग्रहालय, नौदल संग्रहालय, सीएसटी रेल्वे हेरीटेज संग्रहालय, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय, आरबीआय मुद्रा संग्रहालय सालारजंग वस्तुसंग्रहालय, हैद्राबाद – संग्रहालयाचा इतिहास, संग्रहालयाची वास्तू (इमारत), संग्रहालयातील वस्तूचा संग्रह; सालारजंग वस्तुसंग्रहालयातील गॅलरी – भारतीय गॅलरी किंवा कलादालने, मध्य-पूर्वेकडील देशाची कलादालने, युरोपीयन कलादालने; ग्रंथालय – हस्तलिखिते, छापील आवृत्त्या; संशोधन आणि प्रकाशने, संग्रहालयाचे उपक्रम, संग्रहालयाची वेळ आणि फिस, संग्रहालयात पोहचण्याचे मार्ग, वस्तुसंग्रहातील सुविधा, संग्रहालयात प्रवेश करतांना घ्यावयाची काळजी; हैद्राबाद शहरातील इतर संग्रहालये – बिर्ला विज्ञान संग्रहालय, हेरीटेज म्युझियम गन फाउंड्री, कुतुबशाही टॉम्बस म्युझियम, बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, राज्य संग्रहालय, रेल्वे संग्रहालय राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय, पुणे – लाकडी कोरीव काम व शिल्पे, प्रसाधने व गुजरात दालन, भारतीय चित्रकला, विविध भांड्याचे दालन, खेळणी, कपडे, दिवे तांबूल साहित्य, मुर्ती, धातू मुर्ती दौती कलमदाने, शस्त्रे व अस्त्रे (शस्त्रात्रे), वाद्यदालन, मस्तानी महाल, हस्तिदंत दालन, दरवाजे विभाग, संदर्भ ग्रंथालय, संरक्षण प्रयोगशाळा, प्रकाशने; पुणे शहरातील इतर वस्तुसंग्रहालये – मराठा इतिहास वस्तुसंग्रहालय, शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, जोशी यांचे लघुचित्र रेल्वे संंग्रहालय, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, महात्मा जोतिबा फुले वस्तुसंग्रहालय/लॉर्ड रे इंडस्ट्रियल म्युझियम, महर्षी कर्वे वस्तूसंग्रहालय, लोकमान्य टिळक संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तूसंग्रहालय, आदिवासी वस्तूसंग्रहालय, भारत इतिहास संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेजचे पुराण वस्तूसंग्रहालय, गणेश मूर्ती संग्रहालय, सुभेदार धर्माजी खांबे राष्ट्रीय लष्करी संग्रहालय मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय, नागपूर – संग्रहालयाची स्थापना व इतिहास; वस्तुसंग्रहालयामधील दालने – पक्षी दालन, प्राकृतिक इतिहास दालन, प्राणी-पक्षी व सरिसृप दालन, शस्त्र दालन, शिल्पकला दालन, पुरातत्व दालन (विभाग), हस्तकला दालन, चित्रकला दालन, नागपूर वारसा दालन, आदिवासी दालन, शिलालेख दालन; नागपूर शहरातील इतर संग्रहालये – नॅरो गेज रेल म्युझियम, रमन विज्ञान केंद्र वि. का. राजवाडे वस्तूसंग्रहालय (संशोधन मंडळ), धुळे – ग्रंथालयाची ऐतिहासिक पुरातन वास्तू; संग्रहालयातील वस्तूनिहाय दालने – पाषाण शिल्प दालन, शिल्पपरंपरा दालन, काष्ठशिल्प दालन, उत्खननातील अवशेषाचे दालन, शास्त्रागार दालन, धुळे जिल्ह्यातील शिलालेख दालन, ताम्रपट दालन, कागदपत्राचे दालन, फारशी दप्तर दालन, हस्तलिखिते दालन, अभिलेखागार दालन, वंशावळी दालन, दुर्मिळ ग्रंथ दालन; ग्रंथालयातील सुविधा, दुर्मिळ संदर्भ ग्रंथालय, प्रकाशने, संग्रहालयाची वेळ व प्रवेश फी; धुळे शहरातील इतर महत्वाची ठिकाणे
  4. ऐतिहासिक वस्तुसंग्रहालये : कंधार वस्तुसंग्रहालय, नांदेड – वस्तुसंग्रहालयातील पुराणवस्तू – श्री क्षेत्रपाल भैरव, वर्धमान महावीर, गरूड, बाहुबली, जैन तीर्थकर, गणेश, जातं, भैरव, तोफा बहाद्दरपूरा वस्तुसंग्रहालय – वस्तुसंग्रहालय व वस्तुसंग्रहालयासमोरील वस्तू, राष्ट्रकुट भवन प्रवेशद्वार, विश्रामगृह; वस्तुसंग्रहालयासमोरील वस्तु व मुर्तिशिल्प – सहस्त्र कोटी जैन स्तंभ, नाग व नागदेवता, महिषासुरमर्दिनी, विष्ण्ाू, सर्वतोभद्र जैन मूर्ती, नंदी; दालन क्र. 1 – वराह, शिवलिंग, जैन तीर्थंकर, सूर्य, वीरगळ, सिद्धार्थ गौतम बुद्ध, पद्मावती, त्रिशूल, स्त्री मस्तक, भैरवी, पद्मासन विष्णू; दालन क्र. 2 – शिलालेख, कानडी शिलालेख, स्त्री व पुरुष मस्तक, नागदेवता, सिद्धार्थ गौतम बुद्ध, वृषभवाहन शिव, सिंह, टेराकोटा खेळणी; दालन क्र. 3 – स्कंद-कार्तिकेय, लज्जागौरी, सुरसुंदरी, नागशिल्प, कुबेर, स्त्री प्रतिमा, मिथुन शिल्प; दालन क्र. 4 माहुर वस्तुसंग्रहालय – वस्तुसंग्रहालयातील वस्तू – दैनंदिन वापरातील वस्तू, प्रकाश दिवे, लाकडी व धातूच्या वस्तू, मातीच्या वस्तू, शस्त्रास्त्रे, नाणी, ताम्रपट, शिलालेख, पाषाण शिल्प, पुतळे, बंदुका व पिस्तुल, पितळी भांडी, वेषभूषा (वस्त्रे), फरशी कुर्‍हाड, हत्तीच्या डोक्याची कवटी, मुळाक्षरे, पानपुडे व आडकित्ते, सांडस (चिमटा किंवा पक्कड), उखळ व जाते, फुलदाणी, पेटी व पक्षी, समई, बालाजी मूर्ती, चित्रकला, जमदग्नी ऋषीची मूर्ती, अलंकार, मोटारगाडी कै.बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय, पैठण – वस्तुसंग्रहालयातील निवडक वस्तू – दगडी जाते, पाटे व वरवंटे, काच व दगडाचे दिवे, लोखंडी पत्र्याचे दिवे, कात्री व चिमटा, आडकित्ता पानपुडा व चुनाळ्या, कुलूप, पितळेच्या भांडी व मूर्ती, शस्त्रास्त्रे, वजन व मापे, लाकडी व मातीच्या वस्तू, साचे, केओलीयनच्या वस्तू, टेराकोटा प्रतिमा, अलंकार, रेशीम वस्त्र (वस्त्र उद्योग), काचेवरील चित्रकला, मूर्तीशिल्प, मृदभांडी व खापरे, सौंदर्य प्रसाधने, पिचकारी व पंखे, तोंडाची भांडी, कुपी व तडगदान, काष्ठशिल्प, आहत नाणी, सातवाहन नाणी, क्षत्रप नाणी, इतर नाणी, तबक कमलदान, हुक्के, गुडगुडी व पिकदानी, छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र कै. रामलिंगअप्पा लामतुरे वस्तुसंग्रहालय, तेर – वस्तुसंग्रहालयाची स्थापना; वस्तुसंग्रहालयातील पुराणवस्तू – केओलीनच्या वस्तू, मातीच्या मूर्ती प्रतिमा व इतर वस्तू, दगडापासून बनविलेल्या वस्तू, हस्तीदंताच्या वस्तू; तेर वस्तुसंग्रहालयातील इतर वस्तू – हाडाच्या वस्तू, शंखाच्या वस्तू, मण्याचे प्रकार, आरसा व नाणी, लोखंड व तांब्याच्या वस्तू, बौद्ध स्तुपाचे अवशेष, काचेच्या वस्तू प्रादेशिक वस्तुसंग्रहालय, औरंगाबाद – वस्तुसंग्रहालयातील दालने – चित्रकला दालन, भांडी दालन, सातवाहन काळातील वस्तूचे दालन, पाषाणशिल्प दालन, काष्ठशिल्प दालन, शस्त्रास्त्रे दालन, धातूशिल्प दालन श्रीमंत थोरले छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय, औरंगाबाद – वस्तुसंग्रहालयातील पुराणवस्तू – दालन क्र. 1, दालन क्र. 2, दालन क्र. 3 (नाणी दालन), दालन क्र. 4, दालन क्र. 5
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतातील वस्तुसंग्रहालयांचा परिचय 350.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close