Prashant Publications

My Account

भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021497
Marathi Title: Bharatatil Samajik V Dharmik Sudharna Chalwalincha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Category:

375.00

  • DESCRIPTION
  • INDEX

इसवी सनाच्या अठराव्या शतकात ब्रिटिश समाजात प्रबोधन झाले होते. समाजाचे आधुनिकीकरण ही झाले होते. परंतु भारतातील समाज मात्र सामाजिक आणि धार्मिक अंधश्रद्धेत गुरफटला गेला होता. धर्म व समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा व चालीरितीचे प्राबल्य निर्माण झाले होते. अस्पृश्यतेच्या नावाखाली अस्पृश्यांना वाईट व अपमानास्पद वागणूक दिली जात होती, तर स्त्रियांवर अनेक प्रकारचे निर्बंध लावले जात होते. समाजात बालविवाह, सती प्रथा, जातीभेद, अस्पृश्यता इत्यादी प्रथा प्रचलित होत्या. या सर्व प्रथा समाजाला घातक होत्या. धर्मातही अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा रुढ झालेल्या होत्या. त्यामुळे धर्माचे मूळ तत्त्वज्ञान बाजुला पडले होते. म्हणूनच मूळ धर्म काय आहे, हेही समाजाला समजावून सांगणे आवश्यक होते. अशावेळी ब्रिटिश धर्म व संस्कृतीने प्रभावित झालेल्या भारतीय विद्धानांनी भारतात धर्म आणि समाज सुधारणा चळवळ सुरु केली. या चळवळीचे जनक राजा राममोहन रॉय ठरतात. पारशी, शीख व मुस्लिम समाजांतही समाज सुधारणा चळवळी झाल्या. दलितांचा उद्धार, अस्मृपश्ता निर्मूलन व स्त्रियांच्या उन्नतीसाठीही चळवळी झाल्या. या सर्व चळवळींचा इतिहास प्रस्तुत ग्रंथात दिला आहे.

Bharatatil Samajik V Dharmik Sudharna Chalwalincha Itihas

  1. सुधारणा चळवळ : सुधारणा चळवळीची कारण, सुधारणा चळवळीचे परिणाम, सुधारणांचे समाजावरील परिणाम
  2. ब्राम्हो समाज : राजा राममोहन रॉय, आत्मीय सभा, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, ब्राम्हो समाजाची स्थापना, ब्राम्हो समाजाची तत्त्वे, धार्मिक कार्य, कार्याचे मूल्यांकन, महत्त्वाच्या नोंदी
  3. आर्य समाज : स्वामी दयानंद सरस्वती, वेदांचा अभ्यास, आर्य समाजाची स्थापना, आर्य समाजाची तत्त्वे, वेदांकडे चला, आर्य समाजाचे कार्य, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य
  4. थिऑसॉफिकल सोसायटी : थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना, थिऑसॉफिकल सोसायटीचे तत्वज्ञान, हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानावर भर, डॉ. अ‍ॅनी बेझंट यांची कामगिरी, हिंदू संस्कृतीचे पुनरूत्थान
  5. रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद-ईश्वरचंद्र विद्यासागर : रामकृष्ण परमहंसांची शिकवण, रामकृष्णांचे विचार, स्वामी विवेकानंद – रामकृष्ण मिशन, शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत सहभाग
  6. दादोबा पांडुरंग तर्खंडकर : सरकारी सेवेत नोकरी, सामाजिक व धार्मिक सुधारणा, मानवधर्म सभा, ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, दादोबांच्या उपाधी, सार्वजनिक कार्य, वाङ्मयीन कार्य
  7. प्रार्थना समाज : सुबोध पत्रिका, प्रार्थना समाजाची तत्त्वे, प्रार्थना समाज व ब्राह्मो समाजातील साम्य व भेद, उपासना पद्धती, विस्तार व प्रसार, प्रार्थना समाजाचे कार्य
  8. भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद : भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना, अधिवेशन व उद्दिष्टे, सामाजिक परिषदेचे सदस्यत्व, राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे कार्य, राष्ट्रीय सामाजिक परिषदेला विरोध
  9. मुस्लिम समाज सुधारणा चळवळ : वहाबी चळवळ, ब्रिटिश सत्तेचा उदय व मुस्लिम सत्तेचा अस्त, प्रारंभीच्या काळात ब्रिटिशांचे मुसलमानविषयक धोरण, मुस्लिम समाजात जागृती व नवीन नेतृत्वाचा उदय
  10. पारशी व शीख समाज सुधारणा चळवळ : रहनूमाई मुज्देयान, रास्त गोफ्तार, सेवासदन, झरोतुष्ट्रीय सभा, पारशी लॉ असोसिएशन, शीख समाज सुधारणा चळवळ, शीख धर्माच्या उदयाची पार्श्वभूमी
  11. ब्राम्हणेत्तर चळवळ : जस्टिस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कझगम, श्री नारायण धर्म परिपालन योगम
  12. स्त्रियांच्या उन्नतीसाठी चळवळ : महात्मा ज्योतिराव फुले, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे
  13. अस्पृश्यता निर्मुलन : मोहनदास करमचंद गांधी, विठ्ठल रामजी शिंदे, राजर्षी शाहू महाराज
  14. हरिजन सेवक संघ : हरिजन सेवक संघाची स्थापना, हरिजनांच्या उध्दाराचे कार्य, अस्पृश्यता निर्मुलन
  15. शैक्षणिक चळवळ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास 375.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close