भारतीय युद्धकला
Indian Art of War
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
जगातील कोणत्याही राष्ट्राचा लष्करी इतिहास पाहिला तर असे दिसून येते की संघर्ष जिंकण्यासाठी प्रत्येक राष्ट्र विशाल युद्धनीती, युद्धापूर्वीची युद्धनीती व युद्धातील युद्धनीती किंवा डावपेच या संकल्पनांचा वापर करताना दिसतात. भारतीय लष्करी इतिहासही याला अपवाद नाही. लढाई व युद्धाचा संबंध हा फक्त रणक्षेत्रापुरताच मर्यादित नसून त्याचा मानवाच्या सर्वांगिण घडामोडींशी संबंध आहे. कारण मानवनिर्मित सर्वच क्षेत्रांवर लढाईचे व युद्धाचे परिणाम होतात.
भारताच्या लष्करी इतिहासात प्राचीन कालावधीपासून ते आजपर्यंत अनेक लाहन-मोठ्या स्वरुपाच्या लढाया झाल्या. यात झेलमची लढाई,ख पानिपतची पहिली व तिसरी लढाई, इंग्रज-मराठा यांच्यात झालेली असईची लढाई, स्वतंत्र काश्मीरचे युद्ध, भारत-चीनमधील 1962 मध्ये झालेले युद्ध, 1965 व 1971 मध्ये भारत-पाकिस्तानात झालेली युद्धे इ. या सर्व लढायात किंवा युद्धात उभय बाजूकडील तुलनात्मक सैन्यशक्ती, त्यांच्या युद्धयोजना, लढाईचे परिणाम, प्रत्यक्ष युद्धकार्यवाही व लढाईपासून मिळालेले लष्करी धडे या सर्व मुद्यांचा सविस्तर ऊहापोह करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारतावर प्राचीन काळापासून जेवढी परकीय आक्रमणे झाली त्यांचा भारतीय संस्कृतीशी संबंध आला. त्या आक्रमणांमुळे भारतीय समाज व इतिहास बदलला. एवढेच नाही तर या लढायांनी किंवा युद्धांनी भारतीय लष्करी इतिहासाला नवे बळण मिळवून दिले. म्हणूनच ङ्गभारतीय युद्धकलाफ या ग्रंथामध्ये सर्वांचा सखोलपणे विचार केलेला आहे.
Bharatiya Yuddhakla
- युद्धनिती किंवा सामरिकता किंवा डावपेच : अ) ग्रँड स्ट्रॅटेजी, व्याख्या; महान युद्धनीती – अर्थ आणि संकल्पना, महान युद्धनीतीचे उद्देश, ब) युद्धनीती – व्याख्या, युद्धनीती – अर्थ आणि संकल्पना, युद्धनीतीचे उद्देश, युद्धनीतीचे प्रकार, क) युद्धकला किंवा डावपेच – अर्थ आणि संकल्पना
- भारत-ग्रीक युद्धकला : (झेलमची लढाई – इ.स.पूर्व 326) : अ) प्रस्तावना – ग्रीक संस्कृती व लष्करी वारसा ब) अलेक्झांडर किंवा सिकंदर क) पौरस/पोरस उर्फ पोरू – झेलमची लढाई, कारणे ड) तुलनात्मक सैन्यशक्ती इ) युद्धयोजना ई) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही, परिणाम
- भारत-तुर्क युद्धकला : (तराईनची पहिली व दुसरी लढाई – इ.स.1191 व 1192) : अ) प्रस्तावना ब) तुर्कांची सैन्यपद्धती; तराईनची पहिली लढाई (इ.स.1191), तराईनची दुसरी लढाई (इ.स.1192) क) सैन्यशक्ती व शस्त्रास्त्रे, सैन्यरचना ड) लढाईची रचना किंवा योजना ई) आक्रमण/युद्धकार्यवाही
- भारत-मोगल युद्धकला : (पानिपतची पहिली लढाई – इ.स.1526) : अ) प्रस्तावना; पानिपतची पहिली लढाई ब) तुलनात्मक लष्करी क्षमता किंवा सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या, शस्त्रास्त्रे क) युद्धयोजना व युद्धरचना ड) युद्धकार्यवाही किंवा आक्रमण ई) बाबरच्या विजयाची व खानाच्या पराभवाची कारणे
- हळदीघाटची लढाई : (इ.स.1576) : अ) प्रस्तावना, ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा पूर्वेतिहास किंवा कारणे ब) सैन्यशक्ती क) युद्धयोजना ड) आक्रमण इ) परिणाम, महत्त्व किंवा शिकवण फ) लढाईत वापरण्यात आलेल्या युद्धतंत्राचा वापर – उद्दिष्टांची निवड व त्यांचे सातत्य, आक्रमक कार्यवाही
- प्लासीची लढाई : (इ.स.1757) : अ) प्रस्तावना – ऐतिहासिक पार्श्वभूमी ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) युद्धयोजना किंवा लढाईची योजना किंवा सैन्यरचना ड) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही – इंग्रजांच्या विजयाची कारणे ई) लढाईचे परिणाम व महत्त्व; लढाईपासून मिळालेले लष्करी धडे
- मराठ्यांची युद्धकला : (पानिपतची तिसरी लढाई – इ.स.1761) : अ) प्रस्तावना; पानिपतची तिसरी लढाई (1761) ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) युद्धयोजना – सैन्यरचना इ) प्रत्यक्ष युद्ध कार्यवाही किंवा आक्रमण फ) मराठ्यांच्या पराभवाची कारणे ह) पानिपतच्या तिसर्या लढाईचे परिणाम
- भारत-ब्रिटिश युद्धकला : (असईची लढाई – इ.स.1803) : अ) प्रस्तावना – लढाईची कारणे, लढाईपूर्वीच्या हालचाली ब) तुलनात्मक सैन्यशक्ती किंवा सैन्यसंख्या क) लढाईची युद्धयोजना/सैन्यरचना ड) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही किंवा लढाई किंवा युद्धकार्यवाही इ) लढाईचे परिणाम
- भारत-पाक युद्धकला : (काश्मीर संघर्ष – सन 1947-48) : अ) प्रस्तावना ब) ऑपरेशन चिनार क) लडाख विभागातील लढाई – जोझिलाची लढाई ड) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा युद्धबंदी रेषा ई) 1947-48 च्या युद्धातून निघालेले निष्कर्ष किंवा भारताला मिळालेली शिकवण
- भारत-चीन युद्धकला : (सन 1962 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ब) तुलनात्मक सैन्यसंख्या क) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही; अघोषित युद्धाची स्थगिती व कोलंबो प्रस्ताव ड) नेफामधील मोहिम किंवा नामकाचूची लढाई ई) लडाख मोहिम; चीनची विभागानुसार युद्धकार्यवाही
- भारत-पाक युद्धकला : (सन 1965 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – 1965 च्या युद्धाची कारणे ब) तुलनात्मक सैन्यशक्ती; प्रत्यक्ष युद्धकार्यवाही किंवा 1965 चे युद्ध क) असल उत्तरची लढाई किंवा खेमकरणची किंवा रणगाड्याची लढाई ड) छांबमधील मोहिम किंवा छांबची आघाडी ई) ताश्कंद करार
- भारत-पाक युद्धकला : (सन 1971 चे युद्ध) : अ) प्रस्तावना – ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा कारणे ब) तुलनात्मक सैन्यशक्ती – भारतीय युद्धडावपेच, पाकिस्तानी युद्धडावपेच क) प्रत्यक्ष युद्धकार्यवाही – पूर्व आघाडी; पश्चिम आघाडी; ड) सिमला करार इ) लढाईपासून मिळालेले लष्करी धडे किंवा मिळालेली शिकवण; प्रमुख लढाया