Prashant Publications

My Account

भारतीय राजकीय विचारवंत

Indian Political Thinkers

Authors: 

ISBN:

SKU: 9789389493245
Marathi Title: Bhartiya Rajkiya Vicharvant
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 192
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bhartiya-Rajkiya-Vicharvant-First-Addition-by-Dr-Dilip-Singh-Nikumbh

235.00

  • DESCRIPTION
  • INDEX

राजकीय तत्वज्ञानाची पायाभरणी ही राजकीय विचारांच्या माध्यमातून होत असते. जगातील; विशेषत प्राचीन भारतातील सर्व प्राचीन धर्मग्रंथ अथवा अन्य ग्रंथसंपदा अभ्यासल्यास हे त्वरीत लक्षात येईल. आधुनिक भारताचा प्रारंभच मुळी भारतात ब्रिटीशांच्या आगमनानंतरचा आहे. ब्रिटीशांचे विचार अथवा सुधारणा ह्या भारतीयांसाठी अकल्पनीय अशा होत्या. परिणामी भारतीयांमध्ये विचारमंथनास सुरुवात झाली. राजा राममोहन रॉय यांनी त्यास वैचारिक आधार देऊन प्रबोधन काळाचा प्रारंभ केला. म. ज्योतीराव फुले, स्वामी दयानंद सरस्वती, ना. गोखले, आगरकर, न्या. रानडे, दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर, पं. नेहरू, अरविंद घोष, एम.एन. राय, मौलाना आझाद इत्यादी विचारवंतांनी भारतातील बदलत्या परिस्थितीला अनुरूप व भविष्यकालीन उपाय योजना म्हणून तत्कालीन आवश्यकतेतून व जतनेचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी – सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रवादी, आंतरराष्ट्रवादी, शांतता, सहअस्तित्व, भारताचे स्वातंत्र्य इ. विविध विषयांवर चिंतन करून वैचारिक मांडणी केली. प्रस्तुत पुस्तकात या विविधांगी निवडक घडामोडींचा समावेश केलेला आहे.

Bhartiya Rajkiya Vicharvant

  1. दादाभाई नवरोजी : प्रास्ताविक, जीवन परिचय; अ) दादाभाईंचे राजकीय विचार – उदारमतवाद, दादाभाईंच्या विचारातील उदारमतवादाची प्रमुख तत्वे; ब-1) ब्रिटीश शासनावर टीका ब-2) ब्रिटीश शासनावर निष्ठा ब-3) सनदशीर चळवळ क-1) दादाभाईंचे आर्थिक विचार क-2) आर्थिक उत्सारणाचा सिद्धांत क-3) नैतिक शोषण सिद्धांत – दारिद्र दूर करण्याच्या उपाययोजना, दादाभाईंचे समाजवादाविषयीचे विचार ड) स्वराज्यासंबंधीचे विचार/दृष्टीकोन ड-1) भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार/जनक; मूल्यमापन.
  2. लोकमान्य टिळक : प्रास्ताविक, जीवन परिचय; अ) टिळकांचे राजकीय विचार – ब्रिटीश राजसत्तेसंबंधीचे विचार, ब्रिटीश सत्तेची हुकूमशाही, सांस्कृतिक राष्ट्रवाद, साम्राज्यशाहीची मीमांसा, टिळकांचा जहाल मतवाद ब) टिळकांची चतु:सूत्री – स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य क) टिळकांचा सामाजिक सुधारणाविषयक दृष्टिकोन वा विचार ड) लोकमान्य टिळकांचे विचार – ड-1) काँग्रेस पक्षाबाबत विचार ड-2) होमरूल लीग बाबत टिळकांचे विचार ड-3) प्रतियोगी सहकारिता बाबत टिळकांची मते ड-4) लो. टिळक आणि त्यांचे क्रांतीकारी विचार – लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्य आंदोलनातील भूमिका; मूल्यमापन.
  3. महात्मा गांधी : प्रास्ताविक, जीवन परिचय, गांधीजींवरील प्रभाव व त्यांची ग्रंथरचना; अ) गांधीजींचे सत्य व अहिंसेसंबंधी विचार – अ-1) सत्य अ-2) अहिंसा – अहिंसेचे प्रकार ब-1) सत्याग्रह – सत्याग्रहाचा मार्ग अवलंबण्यासाठी पात्रता, सत्याग्रहाची तंत्रे किंवा मार्ग – असहकार, सविनय कायदेभंग, उपोषण, संप, निरोधन, परकीय आक्रमणाविरुद्ध सत्याग्रह, हिजरत (देशत्याग) ब-2) साध्य आणि साधन क) धर्म आणि राजकारण वा राजकारणाचे आध्यात्मीकरण ड) अस्पृश्यता तसेच जातीऐक्याबद्दल गांधीजींचे विचार ड-1) जातीव्यवस्थेला विरोध – अस्पृश्यता नष्ट करण्यासाठीचे उपाय ड-2) हिंदू-मुस्लिम एकता व जातीय ऐक्य इ) महात्मा गांधींचे राज्यासंबंधी विचार इ-1) आदर्श राज्य वा अहिंसक समाज – आदर्श राज्य, ग्रमराज्य, रामराज्य, स्वयंपूर्ण खेडे इ-2) विश्वस्त सिद्धांत; मूल्यमापन.
  4. स्वातंत्र्यवीर सावरकर : प्रास्ताविक, जीवन परिचय; अ) सावरकरांचे राजकीय विचार अ-1) हिंदू राष्ट्रवादाबाबत सावरकरांचे विचार – हिंदुत्वाची वैशिष्ट्ये अ-2) आंतरराष्ट्रवादाबाबत विचार ब) सावरकरांचे स्वातंत्र, क्रांती, अहिंसा व सैनिकीकरणाबाबतचे विचार ब-1) स्वातंत्र्याबाबतचे विचार – स्वातंत्र्योत्तर काळातील शासन व्यवस्थेबाबत सावरकरांचे विचार ब-2) क्रांतीबाबतचे विचार ब-3) अहिंसेबाबतचे विचार ब-4) सैनिकीकरणाबाबतचे विचार क) सावरकरांचे सामाजिक सुधारणांबाबतचे विचार – जातिव्यवस्थेसंबंधीचे विचार ड) सप्तशृंखला बाबतचे विचार इ) हिंदुच्या आधुनिकीकरणाबाबत विचार – विज्ञान, यंत्रे आणि यंत्रयुगाबाबत सावरकरांचे विचार; मूल्यमापन.
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रास्ताविक, जीवन परिचय, ग्रंथरचना; अ) भारतीय राज्यघटना व घटनावाद बाबतचे विचार ब) सामाजिक व राजकीय लोकशाही बाबतचे आंबेडकरांचे विचार – भारतातील परिस्थिती आणि लोकशाही, सामाजिक लोकशाही बाबत विचार क) जाती संस्थेचे विश्लेषण, जातीसंस्थेबद्दल आंबेडकरांची मते, जातीसंस्था नष्ट करण्याचे उपाय ड) मार्क्सवादाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन – राज्य समाजवादाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोण; मूल्यमापन.
  6. पंडीत जवाहरलाल नेहरू : प्रास्ताविक, जीवन परिचय, नेहरूंची ग्रंथरचना व त्यांच्यावरील प्रभाव; अ) पंडीत नेहरूंचे लोकशाहीसंबंधीचे विचार ब) पंडीत नेहरूंचे लोकशाही समाजवादासंबंधी विचार – नेहरूप्रणीत लोकशाही समाजवादाची वैशिष्ट्ये क) पंडीत नेहरूंचे नियोजन व विकासाबाबत विचार – नियोजनाची उद्दिष्टे, लोकशाही समाजवाद व नियोजन, मिश्र अर्थव्यवस्थेबाबत नेहरूंचे विचार, स्वातंत्र्योत्तरकालीन पं. नेहरूंची नियोजनाची संकल्पना, नियोजन आयोगाच्या स्थापनेमागील उद्देश, भारताच्या आर्थिक नियोजनाचे स्थूल उद्देश, पंचवार्षिक योजना ड) पंडीत नेहरूंचे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत विचार ड-1) अलिप्ततावाद – साम्राज्यवादाला व वसाहतवादाला विरोध, अलिप्ततावाद, अलिप्ततावादाचा उदय, अलिप्ततावादाची तत्त्वे, अलिप्ततावादी धोरण व भारताची भूमिका ड-2) पंचशील तत्त्वे ड-3) जागतिक शांततावाद इ) आधुनिक भारताचे शिल्पकार; मूल्यमापन.
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय राजकीय विचारवंत 235.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close