भारतीय राज्यघटना आणि राजकारणाची ओळख
Introduction of Indian Constitution and Polity
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतीय राज्यघटनेची निर्मिती 1946 ते 1950 या कालखंडात घटना समितीकडून झालेली असली तरी राज्यघटना निर्मिती पूर्वी ब्रिटिश राजवटीने केलेल्या कायद्याच्या माध्यमातून लोकशाहीपूरक वातावरण भारतात निर्माण होण्यास प्रारंभ झालेला होता. राज्यघटना निर्मितीवेळी प्रत्येक व्यक्तीच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक विकास साध्य करणे आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेचे ध्येय मानले गेले. नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करताना मार्गदर्शक तत्त्वांचेही आरेखन केले गेले. भारतीय घटनेद्वारा नागरिकाचे अधिकार आणि कर्तव्ये परिभाषित करताना भविष्यकालीन जीवनाची पूर्ती करण्यासाठी आवश्यक मूल्यांचा समावेश करतेवेळी घटनेत वेळोवेळी दुरुस्तीदेखील केली गेली. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याने देशाची सत्ता कार्यकारी मंडळाकडे आली. भारताचे कार्यकारी मंडळ सामुहिकरीत्या संसदेला जबाबदार असते. लोकशाहीची संस्थात्मक चौकट यशस्वी व गतिमान बनविण्यासाठी न्यायव्यवस्था व निवडणूक आयोग ही महत्त्वपूर्ण साधने मानली जातात. हे निकोप लोकशाहीचे प्रमुख अंग मानले गेले.
Bhartiya Rajyaghatana Aani Rajkaranachi Olakh
- भारतीय संविधान आणि संघराज्य व्यवस्था : अ) भारतीय संविधान – अर्थ, व्याख्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधानाची निर्मितीची प्रक्रिया सरनामा आणि भारतीय संविधान वैशिष्ट्ये. ब) भारतीय संघराज्य – अर्थ, व्याख्या, स्वरूप, प्रकार, वैशिष्ट्ये आणि नागरिकत्वासंदर्भातील घटनात्मक तरतूदी, संघराज्याचे एकात्म स्वरूप.
- भारतीय राज्यघटनेचे पैलू : अ) मूलभूत हक्क आणि कर्तव्ये – अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि स्वरूप, हक्क आणि कर्तव्ये यातील फरक राष्टीय मानव अधिकार आयोग. ब) मार्गदर्शक तत्त्वे – अर्थ, व्याख्या, स्वरूप, प्रकार आणि महत्त्व मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातील फरक.
- संविधान जागरूकता दिवस आणि घटना दुरूस्ती : अ) संविधान जागरूकता – अर्थ, आणि उद्दिष्टे, स्वतंव्य आणि प्रजासत्ताक दिवस, राष्ट्रीय युवक दिवस, राष्ट्रीय मतदार दिवस, सामजिक न्याय दिवस, राष्ट्रीय मानव अधिकार दिवस, ब) घटना दुरूस्ती – अर्थ आणि तरतूदी, आवश्यकता व महत्त्व, घटना दुरूस्ती प्रक्रिया, घटना दुरूस्ती प्रक्रिया वैशिष्टये आणि मूल्यमापन (महत्वपूर्ण घटनादुरूस्ती- 103, 104, 105).
- शासनाची अंगे – केंद्र आणि राज्य : अ) संघ कार्यकारी मंडळ – 1. राष्ट्रपती 2. उपराष्ट्रपती 3. पंतप्रधान 4. मंत्रिमंडळ, ब) राज्य कार्यकारी मंडळ – 1. राज्यपाल 2. मुख्यमंत्री 3. उपमुख्यमंत्री 4. राज्य मंत्रिमंडळ (रचना, अधिकार, कार्य आणि महत्त्व कायदा निर्मिती प्रक्रिया).
- कायदे मंडळ – केंद्र आणि राज्य : अ) केंद्रीय कायदेमंडळ – लोकसभा, राज्यसभा. ब) राज्य कायदेमंडळ – विधानसभा, विधानपरिषद (रचना, अधिकार, कार्य आणि कायदा निर्मिती प्रक्रिया).
- न्याय मंडळ आणि निवडणूक प्रक्रिया : अ) न्यायमंडळ – सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय (रचना, अधिकार आणि कार्य) न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका, न्यायालयीन सुधारणा, ब) निवडणूक प्रक्रिया – अर्थ आणि व्याख्या, निवडणूक साक्षरता- भविष्यातील मतदार आणि नेतृत्व; भारतीय निवडणूक आयोग (रचना, अधिकार आणि कार्य).