भारतीय लष्करी इतिहास
Indian Military History
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक संरक्षणशास्त्राचा विकास होण्यासाठी लष्करी इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास उपयुक्त ठरतो. युद्धकलेच्या अभ्यासाने, संशोधनाने ज्ञान समृद्ध होते. तसेच आत्मविश्वास वाढतो; त्याच कारणाने भारतीय युद्धकला अभ्यासक्रम अभ्यासासाठी निश्चित केलेला आहे. भारतीय युद्धकला अत्यंत समृद्ध असून ती अती प्राचीन आहे. प्राचीन भारतीय इतिहास हा भारतीय संस्कृतीच्या प्रगल्भतेच्या खुणा जपणारा आहे. मानवी उत्क्रांतीच्या बरोबर संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवनिर्मित सर्वच तंत्राची, विज्ञानाची व कलांची प्रगती झालेली दिसते. वेद, पुराणशास्त्रे आणि उपनिषदे इत्यादी साहित्यातून आणि लोकपरंपरातून आजच्या विकसीत मानवी जीवनाच्या खाणाखुणा अभ्यासताना वैश्विक विकासाची दिशा स्पष्ट होते. प्राचीन लढायातून युद्धकला स्पष्ट होते. प्राचीन भारतातील युद्धनीती, डावपेच, युद्धयोजना सैनिक, शस्त्रास्त्रे इत्यादी संदर्भातील माहिती सर्वच प्रकारच्या लष्करासाठी उपयुक्त आहे. संबंधित अभ्यासक्रमातील निरनिराळे घटक विचारात घेवून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशीच आशा आहे.
Bharatiy Lashkari Itihas
- लष्करी इतिहासाची मूळ संकल्पना : अ) लष्करी इतिहास, ब) भारतीय लष्करी परंपरेचा सर्वेक्षण सारांश
- प्राचीन भारतीय लष्करी इतिहास (उत्तरेकडील साम्राज्य) : 1. सिंधू संस्कृती, 2. वैदिककालीन व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे- वेदकालीन सैन्यपद्धती, आर्य-अनार्य संघर्ष, दाशराज्ञ युद्ध, युद्धसाहित्य आणि सशस्त्र सेना, सशस्त्रसेना व सैन्यपद्धति, युद्ध प्रकार, वैदिक युद्धाची कारणे. 3. महाकाव्यकालीन व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे – महाकाव्यकालीन सैन्यपद्धती, शस्त्रास्त्रे, सैन्यभरती, प्रशिक्षण, वेतन, युद्धकला, महाभारत, राजा-नेतृत्व आवश्यकता, सैनिक संघटना, युद्ध प्रकार, युद्धनियम, कूट युद्ध (गनिमी युद्ध), सैन्यभरती आणि प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आणि युद्धसाधने. 4. सिकंदराचे आक्रमण – लेक्झांडरचे उद्देश, सशस्त्रसेना व शस्त्रास्त्रे, झेलमची लढाई.
- प्राचीन भारतीय लष्करी इतिहास (दक्षिणेकडील साम्राज्य) : 1. सातवाहन साम्राज्य, 2. राष्ट्रकूट साम्राज्य, 3. चालुक्य साम्राज्य, 4. चोला आणि पंड्या साम्राज्य
- मध्यकालीन भारतीय लष्करी इतिहास – 1 : 1. सुलतान साम्राज्य – प्रस्तावना, सेनाविभाग, सैन्य संघटन, सैन्य भरती व वेतन, शस्त्रास्त्रे, सैन्य प्रशिक्षण, युद्धकला, बल्बनच्या सैन्य सुधारणा, अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्य सुधारणा, तैमूरलंग, सुलतानाशाहीतील सैन्य दोष, सुलतानशाहीच्या विनाशाची कारणे, 2. मोगल साम्राज्य – प्रस्तावना, मुघल राज्यस्थापना, संघटना, मनसबदार, मनसबदारीतील गुण व दोष, पायदळ, घोडदळ, हत्तीदळ, तोफखाना, नौसेना (आरमार), सैन्यभरती, वेतनभत्ते, सैन्यप्रशिक्षण, शस्त्रास्त्रे, युद्धकला, किल्ले, युद्धयोजना, आक्रमण, हळदीघाटाची लढाई.
- मध्यकालीन भारतीय लष्करी इतिहास – 2 : 1. विजयानगर साम्राज्य, 2. राजपूत साम्राज्य – पूर्वमध्यकाल, राजपूती शूरता, उत्पत्ती, राजपुतांची युद्धनीति, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, व्यूहरचना, किल्ले, राजपूतांचा र्हास, 3. मराठा साम्राज्य- शिवपूर्वकाल, भू-राजकीय स्थिती, छत्रपती शिवाजी, मराठ्यांची युद्धनीति, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, शिवाजी-एक राष्ट्रपुरुष, मराठी सत्तेचा उदय, मराठा सैन्य संगठन, संरक्षण, किल्ले (गड), लष्करी व्यवस्थेची वैशिष्ट्ये.पानीपतची लढाई – प्रास्ताविक, अहमदशहाअब्दाली, सदाशिवराव भाऊसाहेब, युद्धयोजना, आक्रमण.
- आधुनिक लष्करी पद्धती : 1. पोर्तुगीज साम्राज्य – पोर्तुगीज युद्धकला, युद्धनीति, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे, 2. फे्ंरच साम्राज्य-फ्रेंचांची युद्धकला, व्यूहरचना, डावपेच, संघटना व शस्त्रास्त्रे, 3. डच साम्राज्य – डचांची व्यूहरचना, डावपेच, संघटना आणि शस्त्रास्त्रे, 4. ब्रिटीश साम्राज्य – ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य -व्यूहरचना, डावपेच, संघटन आणि शस्त्रास्त्रे, साम्राज्य विस्तार.