भारतीय संविधान
Indian Constitution
Authors:
ISBN:
₹350.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
सदरील ग्रंथात भारतीय लोकशाही, भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भारतीय लोकशाही गणराज्याची व्यवस्था, त्यातील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, माहितीचा अधिकार, मानव अधिकार, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ तसेच न्यायमंडळाबरोबर भारतातील नागरी सेवा व नागरी सेवेचे महत्त्व, नोकर भरतीची प्रक्रिया व पद्धती तसेच केंद्रीय आणि राज्यसेवा आयोग, कर्मचारी नेमणुकीसाठीचे आयोग, त्याचे कार्य व अधिकार यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.
संसदीय लोकशाही या सर्वोत्तम शासन प्रकाराचाच आपण स्विकार केला असून तो ‘जीवनमार्ग’ ठरावा म्हणून त्यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत. ह्या दृष्टीने प्रत्येक भारतीय नागरिकास लोकशाहीची मूल्ये, संविधानातील उपाय योजना इत्यादींची माहिती होणे आणि असणे आवश्यक आहे. एकूणच लोकशाही व्यवस्थेस पूरक ठरणार्या घटकांची माहिती देण्याचा व त्याद्वारे जनजागृतीला चालना देण्याचा, त्यातून लोकप्रबोधन घडवून आणून आवश्यक समाज परिवर्तन होऊन खर्या अर्थाने ‘नागरी समाज’ स्थापन करण्याचा प्रयत्न या ग्रंथाद्वारे करण्यास मदत होईल. म्हणूनच या ग्रंथाचा हेतु चांगला नागरिक घडविणे हा देखील आहे.
Bharatiya Sanvidhan
- भारतीय संविधान (राज्यघटना) : भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, पार्श्वभूमी, उद्देशपत्रिका, उद्देशपत्रिकेची मूल्ये, त्याची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
- भारतीय संघराज्य : स्वरुप आणि कार्यपद्धती : भारतीय संघराज्याचे उद्दिष्ट्ये, स्वरुप, प्रास्ताविक, संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र सरकार व घटकराज्य सरकार यांचे संंबंध, वित्त आयोग – सत्ता, अधिकार – कार्ये
- अधिकार व कर्तव्य : अ) मुलभूत अधिकार, ब) मुलभूत कर्तव्य, क) मार्गदर्शक तत्त्वे, प्रास्ताविक- मुलभूत अधिकार- वैशिष्ट्ये, मुलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे वा नितिदर्शक तत्वेबाबत राज्यांचे धोरण, नितिनिर्देशक तत्त्वे, आणि मुलभूत अधिकारांचा संबंध
- अधिकार, हक्क व त्यातील आधुनिक बदल : अ) माहितीचा अधिकार- इतिहास, वैशिष्ट्ये, माहिती अधिकार अधिनियम 2005, व्याप्ती, माहिती आयुक्ते, केंद्र व राज्य माहिती आयोग-अधिकार व कार्य, ब) भारतातील मानवी अधिकार- मानवी अधिकार अर्थ, स्वरुप, व्याप्ती, मानवी हक्कांची वैश्विकता-जाहिरनामा-भारतीय समाज व राज्यव्यवस्थेतील मानवाधिकार-भारतीय संविधान आणि मानवाधिकार-महिलांचे मानवी अधिकार-बालकांचे मानवी हक्क-भारतातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीची व्यवस्था-मानवाधिकार आयोग (राष्ट्रीय व राज्य पातळीवर), मानवी हक्क न्यायालय, मानवी हक्क कायदे.
- कार्यकारी मंडळ : केंद्रीय आणि घटकराज्यांचे कार्यकारी, मंडळ, सत्ता, अधिकार आणि कार्य.
- कायदेमंडळ : केंद्रीय आणि घटकराज्यांचे कायदेमंडळ, सत्ता, अधिकार अणि कार्य, भारतातील कायदे निर्मितीची प्रक्रिया
- न्यायमंडळ : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सत्ता, अधिकार आणि कार्य, न्यायालयीन सक्रियता, लोकहित, लोकपाल.
- भारतातील नागरी सेवा : नागरी सेवेचे महत्त्व, नागरी सेवेतील भरती पद्धती, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, सत्ता आणि अधिकार