भारतीय संविधान व शासन
Indian Constitution and Government
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
‘भारतीय संविधान व शासन’ हा अभ्यास विषय स्वांतत्र्योत्तर कालखंडापासून विशेष महत्वाचा मानला जातो. हे अध्ययन क्षेत्र केवळ भारतातंर्गत महत्वाचे आहे, असे नाही तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात एखाद्या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धोरणात्मक भूमिका नेमकी कशी आहे? या संबंधाचे आकलन होण्याच्या दृष्टिने त्या त्या देशाचे शासन आणि राजकारण अभ्यासाच्या दृष्टिने महत्वाचे ठरते. शासनाने केलेले अलिकडील बदल वा परिवर्तने सुद्धा अभ्यासाच्या दृष्टिने उपयुक्त असतात आणि या संदर्भाची वस्तुनिष्ठ माहिती व तिचे मूल्यमापन शासनातंर्गत काही महत्वाच्या विभागाद्वारे केले जातात. वास्तविक पाहता भारताने प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीचा अधिकृत स्विकार केल्यामुळे या संविधानिक चौकटीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास अन्य राज्यशास्त्राच्या मूलभूत संकल्पना नीटपणे अभ्यासता येत नाही म्हणून “भारतीय संविधान व शासन’ अभ्यासणे वा समजून घेणे आजच्या परिप्रेक्ष्यात महत्वाचे आहे.
या ग्रंथात विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना समकालीन सामान्य ज्ञान संबंधीचे प्रश्ने, राज्यशास्त्रातील दैनंदिन घडामोडीकरिता हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी ठरेल यात शंका नाही. हा प्रस्तुत ग्रंथ जरी पदवी स्तरावर तयार करण्यात आला असला तरी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठात पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना लाभदायक ठरू शकेल, अशी मांडणी यामध्ये करण्यात आली आहे.
Bharatiy Sanvidhan v Shasan
- भारतीय संविधान आणि भारतीय संघराज्य व्यवस्था : अ) भारतीय संविधानः ऐतिहासिक पार्श्वभूमी, निर्मितीची प्रकिया, सरणामा, वैशिष्ट्ये, 1.1 भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1.2 भारतीय संविधान निर्मितीची प्रकिया, 1.3 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे, इ) भारतीय संघराज्य व्यवस्था: रचना, स्वरुप, संघराज्य व्यवस्थेची वैशिष्टे, 1.4 भारतीय संघराज्य निर्मितीची पार्श्वभूमी, 1.5 संघराज्याची रचना व स्वरूप.
- मूलभूत हक्क, कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे : अ) मूलभूत हक्क आणि कर्तव्य: अर्थ, व्याप्ती, स्वरुप, महत्व, फरक- कर्तव्य व हक्क: 2.1 मूलभूत कर्तव्ये, इ) मार्गदर्शक तत्त्वेः अर्थ, व्याप्ती, स्वरुप, महत्व, प्रकार, फरक- हक्क व मार्गदर्शक तत्वे: 2.2 मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण 2.3 मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यातील फरक/भेद.
- संविधानिक समित्या आणि दुरुस्ती प्रक्रीया : अ) संविधानिक समित्याः 1) राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, 2) राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, 3) निती आयोग, इ) घटना दुरुस्ती प्रक्रीया: अर्थ, महत्व, संविधानिक तरतूद, प्रमुख दुरुस्त्या, 3.1 महत्त्वपूर्ण दुरूस्त्या, 3.2 भारतीय संविधानातील सातत्यपूर्ण धोकादायक दुरूस्त्या, 3.3 संविधान दुरुस्त्यांची अंमलबजावणी.
- शासन (केंद्र- राज्य) : अ) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ 4.1 राष्ट्रपती/राष्ट्राध्यक्ष, 4.2 उपराष्ट्रपती, 4.3 केंद्रीय मंत्रिमंडळ, 4.4 पंतप्रधान (केंद्रीय कार्यकारी मंडळ), 4.5 राज्यपाल (वास्तविक भूमिका, नवे विचारप्रवाह), 4.6 घटक राज्याचे मंत्रिमंडळ, 4.7 मुख्यमंत्री.
- न्यायमंडळ आणि संविधानिक आयोग : 5.1 सर्वोच्च न्यायालय, 5.2 उच्च न्यायालय, 5.3 न्यायालयीन पुनर्विलोकन, 5.4 न्यायालयीन सक्रियता , 5.5 जनहित याचिका किंवा सार्वजनिक हिताचे दावे.
- केंद्र राज्य संबंध आणि नागरी सेवा : 2.3 केंद्र-राज्य संबंध – 1) केंद्रशासन व घटकराज्य शासन यांच्यातील कायदेविषयक संबंध 2) केंद्र आणि घटक राज्यांधील प्रशासकीय संबंध किंवा प्रशासकीय अधिकाराचे विभाजन 3) केंद्र व घटकराज्य राज्यांधील आर्थिक संबंध 2.4 भारतातील वित्त आयोग 2.5 निती आयोग