Prashant Publications

My Account

भारतीय सामाजिक समस्या

Social Problems in India

Authors: 

ISBN:

SKU: 9789388113571
Marathi Title: Bhartiy Samajik Samasya
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 288
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bhartiy-Samajik-Samasya-by-Dr-B-H-Kirdak-Dr-Sudha-Mukhsdke

375.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मानव समाजाच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंतचा समाजाचा कोणताही कालखंड घेतला तर असा कोणताच कालखंड नाही की ज्यात सामाजिक समस्या नव्हत्या. प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत, आदीम समाजापासून तर 21 व्या शतकातल्या प्रगत समाजापर्यंत सामाजिक समस्या नेहमीच आढळून येतात.

मात्र सामाजिक समस्या सार्वत्रिक व सार्वकालीन असल्या तरी स्थळ व काळानुसार त्याचे स्वरुप बदलत जाते. आदिवासी समस्या प्रगत समाजाच्या समस्यापेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण समाजाच्या समस्या नागरी समाजाच्या समस्येपेक्षा भिन्न असतात भारतीय सामाजिक समस्यांची ओळख व्हावी.

सदरील पुस्तकात सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, भारतातील लोकसंख्येची समस्या, ग्रामीण भारतातील समस्या, मद्यपानाच्या समस्या, भ्रष्टाचार, दहशतवादाची समस्या, भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या, नागरीकरणाशी संबधित समस्या, असहिष्णुता दंगली आणि गुन्हे इ. घटकांची विद्यार्थ्यांना समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून ओळख व्हावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश करण्यात आला आहे.

Bhartiy Samajik Samasya

  1. सामाजिक समस्या : सामाजिक समस्येच्या अर्थ, व्याख्या, सामाजिक समस्येचे स्वरुप, सामाजिक समस्याप्रती अभिवृत्ती, सामाजिक समस्याविषयीच्या भ्रामक धारणा
  2. कौटुंबिक समस्या : अ) हुंड्याची समस्या- हुंड्याची व्याख्या, हुंड्याची कारणे, हुंड्याचे दुष्परीणाम, हुंडा निर्मुलनार्थ उपाय, (ब) स्त्रियांविरुध्दचे कुटूंबांतर्गत हिंसाचार- हिंसाचाराचा अर्थ, कौटूंबिक हिंसाचाराची व्याख्या (अर्थ व स्वरुप), कौटूंबिक हिंसाचाराची समस्या
  3. भारतातील लोकसंख्येची समस्या : लोकसंख्येने अध्ययन, लोकसंख्येचा माल्थसचा सिद्धांत, वॉरन थॉम्पसनचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, भारताची लोकसंख्या, भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये, लोकसंख्या स्फोटाचा अर्थ, भारतात लोकसंख्येचा स्फोट
  4. ग्रामीण भारतातील समस्या : अ) भारतीय ग्रामीण समुदाय- ग्रामिण समुदायाचा अर्थ, व्याख्या, ग्रामीण समाजाची वैशिष्ट्ये, ग्रामीण समाजातील परिवर्तन, ग्रामिण समाजातील परिवर्तनाची कारणे. ब) स्थलांतर- स्थलातराचा अर्थ, व्याख्या, स्थलातराचे प्रकार
  5. मद्यपानाच्या समस्या : अ) मद्यपानाच्या समस्या- मद्यपानाचा अर्थ मद्यपानाच्या व्याख्या, मद्यपानाची कारणे, मद्यपानाचे दुष्परिणाम. ब) व्यसनाधिनता व्यसनाधिनतेचा अर्थ
  6. भ्रष्टाचार : भ्रष्टाचाराचा अर्थ, व्याख्या, भ्रष्टाचाराचे प्रकार, भ्रष्टाचाराची कारणे, भ्रष्टाचार नियत्रंणाचे उपाय, स्वाध्याय.
  7. दहशतवादाची समस्या : अ) दहशतवाद- दहशतवादाचा अर्थ,व्याख्या, दहशतवादाचा इतिहास आणि विकास, दहशतवादाची वैशिष्ट्ये, दहशतवादाची कारणे
  8. भारतातील दुर्बल घटकांच्या समस्या : अ) अनुसूचित जाती- अनुसूचित जातीचा अर्थ, अस्पृश्यतेच्या उत्पत्तीचे सिद्धांत, अनुसूचित जातीच्या प्रमुख समस्या
  9. नागरीकरणाशी संबधित समस्या : अ) नागरीकरण- नागरीकरणाचा अर्थ, व्याख्या, नागरीकरणाच्या वाढीस जबाबदार घटक, ब) झोपडपट्टीची समस्या- झोपडपट्टीच्या व्याख्या, झोपडपट्टी निर्मितीची कारणे
  10. असहिष्णुता दंगली आणि गुन्हे : अ) सांप्रदायिक हिंसा- जातीयवादाची संकल्पना, जातीयवादाची परिमीती किंवा परिमाने, सांप्रदायिक हिंसाचार
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय सामाजिक समस्या 375.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close