Prashant Publications

My Account

भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास

Indian Independence Movement and History of Social Change

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228477
Marathi Title: Bharatiy Swatantrya Andolan ani Samajik Privartanacha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2017
Pages: 312
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Bharatiy-Swatantrya-Andolan-ani-Samajik-Privartanacha-Ithihas-by-Dr-G-B-Saha-Dr-B-N-Patil

425.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्राचीन काळी आशिया व युरोप यांच्यातील व्यापार प्रामुख्याने भूार्गे चालत असे. हिंदुस्थानवर सर्वात प्रथम आक्रमण पर्शियन साम्राज्याचे झाले. बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, पंजाबचा काही भाग हे पर्शियन साम्राज्यात समाविष्ट झाले होते. त्यानंतर अलेक्झांडरने आक्रमण करून हिंदुस्थानचा काही भाग आपल्या साम्राज्याला जोडला. पुढे शक, हुण, कुशाण, तुर्क आणि मोगल अशा अनेकांची आक्रमणे येथे झाली. 15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. प्रबोधनामुळे धर्मसत्तेचे जोखड झुगारून देण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुक्त समाजव्यवस्था निर्माण झाली. सर्वप्रथम वास्को-द-गामा हा पोर्तुगीज खलाशी इ.स. 1498 मध्ये भारतात आला. त्यापाठोपाठ पाश्चात्य प्रवासी व व्यापार्‍याकरीता व्यापारी कंपन्यांचा ओघ सुरू झाला. या प्रयत्नात पोर्तुगाल,स्पेन, स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड इ. राष्ट्रे आघाडीवर होती. भारतातील गोंधळाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात अखेर इंग्रजांना यश आले. इंग्रजांची राजवट अन्यायी, अत्याचारी, जुलूमी होती. इंग्रजांनी राज्य करण्यासाठी त्यांच्या हितासाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्यात. इंग्रजी शिक्षणाचे द्वार भारतीयांना खुले केले. परिणामी भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळून भारत पारतंत्र्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भारतीयांनी आपापल्या परिने स्वातंत्र्यलढा सुरू केला. सामाजिक व राजकीय लढे देखील सुरू झाले. सरतेशेवटी ब्रिटीशांच्या जुलूमी सत्तेचा शेवट होऊन भारत स्वतंत्र झाला.

Bharatiy Swatantrya Andolan ani Samajik Privartanacha Itihas

  1. भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि दृढीकरण : प्लासीच्या युद्धाची कारणे, प्लासीच्या युद्धाचे परिणाम, बक्सारच्या युद्धाची कारणे, बक्सारच्या लढाईचे परिणाम, हिंदुस्थानातील आर्थिक जीवनावरील प्रभाव
  2. भारतीय प्रबोधन : सामाजिक व धार्मिक प्रबोधनाची कारणे, 1) राजा राममोहन रॉय (इ.स.1774-1831), 2) ईश्वरचंद्र विद्यासागर, 3) लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, 4) म. ज्योतिबा फुले
  3. सशस्त्र लढे : इ.स. 1857 च्या उठावाची कारणे- अ) राजकीय कारणे, ब) प्रशासकीय कारणे, क) सामाजिक कारणे, ड) आर्थिक कारणे, इ) लष्करी कारणे, ई) तात्कालिक कारण
  4. राजकीय जागृतीचा उदय (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेले घटक, अ) बंगालच्या फाळणीची कारणे, ब) बंगालच्या फाळणीला विरोध
  5. मवाळवाद आणि जहालवाद : मवाळांच्या प्रवाहाची रुपरेषा, 1) दादाभाई नवरोजी (इ.स. 1825-1917), 2) फिरोजशहा मेहता (इ.स. 1845-1915), 3) महादेव गोविंद रानडे (इ.स. 1842-1901)
  6. सामाजिक व धार्मिक सुधारणा : 1) छत्रपती राजर्षी शाहू महाराज (इ.स. 1874-1922), 2) अरविंद घोष (इ.स. 1872-1950), 3) कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, 4) स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर (इ.स. 1883 ते 1966), 5) डॉ. भिमराव रामजी आंबेडकर (इ.स. 1891-1956), 6) गुला महाराज, गुला महाराजांच्या चळवळीचा परिणाम, सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीचे परिणाम
  7. राष्ट्रीय चळवळ : महात्मा गांधीजी (1869-1948) : म. गांधीजींचे तत्त्वज्ञान, असहकार चळवळीची वाटचाल, असहकार आंदोलन अयशस्वी होण्याची कारणे, असहकार आंदोलनाची फलश्रुती (परिणाम), स्वराज्य पक्ष, स्वराज्य पक्षाच्या उदयाची कारणे, स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे
  8. फैजपूर काँग्रेस : फैजपूर अधिवेशनाची तयारी, फैजपूर काँग्रेसची अपूर्वता (ध्वजज्योती), पंडित जवाहरलाल नेहरू यांची मिरवणूक, किसनसिंग ओंकारसिंग राजपूतचा पराक्रम, अधिवेशनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा
  9. स्वातंत्र्याचे अखेरचे पर्व : वैयक्तिक सत्याग्रह करण्याची कारणे, वैयक्तिक सत्याग्रह थांबविण्याची कारणे, क्रिप्स मिशन हिंदुस्थानात पाठविण्याची कारणे, क्रिप्स मिशनच्या शिफारशी, क्रिप्स योजनेचे परिक्षण – अ) काँगे्रसने क्रिप्स योजना फेटाळून लावण्याची कारणे, ब) मुस्लिम लीगने योजना फेटाळून लावण्याची कारणे, क) इतर पक्षांनी नाकारण्याची कारणे; चले जाव आंदोलन सुरू करण्याची कारणे
RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक परिवर्तनाचा इतिहास 425.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close