भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)
History of Indian Independence Movement (1857 to 1950)
Authors:
ISBN:
₹395.00
Out of stock
- DESCRIPTION
- INDEX
15 व्या शतकात युरोपमध्ये प्रबोधनास प्रारंभ झाला. वास्को-द-गामा याने नव्या जलमार्गाचा शोध लावल्याने अनेक पाश्चात्त्य राष्ट्रांनी भारताशी व्यापारी संबंध निर्माण केले. तद्नंतर ते सत्तास्पर्धेत उतरले; यात इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डचांचा समावेश होता. ब्रिटीशांनी कट कारस्थान करुन प्लासीची लढाई जिंकून ब्रिटीश सत्तेची पायाभरणी केली. 1857 मध्ये भारतीयांनी बंडाचे निशाण फडकावून अन्यायी, अत्याचारी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. इंग्रजांनी फोडा आणि झोडा या अनितीचा अवलंब केला. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांनी अनेक सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक सुधारणा केल्या. 1905 ते 1920 या कालखंडात काँग्रेसमधील जहाल गटाचे नेतृत्व लाल, बाल व पाल या त्रिमूर्तींनी केले. टिळकयुगानंतर महात्मा गांधींकडे काँग्रेसचे नेतृत्व आले. भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या देशभक्तांना फाशी दिल्याने तरुणवर्ग असंतुष्ट झाला. अनेक क्रांतिकारकांनी प्राणाहुती दिली. दुसर्या जागतिक महायुद्धास सुरुवात झाली. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौज स्वातंत्र्यासाठी त्वेषाने लढू लागली. म. गांधींनी चले जाव चळवळीस प्रारंभ केला. जागतिक महासत्ता म्हणून अमरिकेचा उदय, प्रतिकूल जागतिक जनमत, इंग्लंडची खालावलेली परिस्थिती, आझाद हिंद फौज, चले जाव चळवळ व भारतीयांचे राष्ट्रप्रेम यामुळे ब्रिटीशांना भारत सोडणे भाग पडले. खंडित भारताची निर्मिती करतांना अखंड भारतास ग्रहण लावले. सरदार पटेलांनी संस्थानिकांचा प्रश्न सोडवून तर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहून स्वतंत्र व प्रगतीशील भारताचा प्रवास सुकर केला.
Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857 to 1950)
- भारतातील ब्रिटिश सत्ता : ब्रिटीश सत्तेच्या उदयाची कारणे, युरोपियनांचा भारताशी व्यापारी संबंध, बंगालमध्ये ब्रिटीशांचा साम्राज्य विस्तार, प्लासीच्या युद्धाची कारणे व परिणाम, बक्सारच्या युद्धाची कारणे व परिणाम, ब्रिटीश धोरणांचा भारतातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावरील परिणाम, भारतातील प्रबोधन कारणे, राजा राममोहन रॉय – ब्रह्मो समाज – मानवधर्म सभा – परमहंस सभा – प्रार्थना समाज – थिऑसॉफिकल सोसायटी.
- 1857 चा उठाव : 857 च्या उठावाचे स्वरूप, 1857 च्या उठावाची कारणे, उठावाची वाटचाल, 1857 चा उठाव व खानदेश, नाशिक भागातील उठाव, 1857 चा उठाव व दक्षिण हिंदुस्थान, 1857 च्या उठावाचे परिणाम, भारतीयांच्या अपयशाची कारणे.
- सामाजिक व धार्मिक सुधारणा : म.ज्योतिबा फुले आणि सत्यशोधन समाज, स्वामी दयानंद सरस्वती व आर्य समाज, पंडिता रमाबाई, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, महर्षि वि. दा. शिंदे, राजषी छत्रपती शाहू, डॉ. बी. आर. आंबेडकर.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेले घटक, मवाळ काँग्रेस, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, बंगालची फाळणी.
- लोकमान्य टिळकांचा कालखंड : लोकमान्य टिळक, सुरत काँग्रेस, होमरूल चळवळ, मोर्ले/मिंटो सुधारणा कायदा -1909, इंडिया कौन्सिल अॅक्ट-1919 (माँटेग्यु-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा)
- क्रांतीकारी चळवळी : अभिनव भारत, अनुशीलन समिती, गदर पार्टी, हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन.
- महात्मा गांधी आणि राष्ट्रीय चळवळ : असहकार चळवळ, स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, सविनय कायदेभंग चळवळ, गोलमेज परिषदा, भारत सरकार कायदा – 1935
- भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अखेरचे पर्व : क्रिप्स मिशन, चले जाव आंदोलन, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन, माऊंटबॅटन योजना आणि भारताची फाळणी, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा-1947, संस्थानिकांचे विलिनीकरण.