भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास (इ.स.1857 ते इ.स.1950)
History of Indian Freedom Movement (1857-1950)
Authors:
ISBN:
₹365.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अशाप्रसंगी भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले याचा वेध घेणे आवश्यक ठरते. इ.स.1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीचे युद्ध करून बंगालमध्ये प्रथमच कंपनीची सत्ता स्थापन केली. बक्सारच्या युद्धाने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना होवून तिने ब्रिटीशाविरूद्ध सनदशीर मार्गाने चळवळ सुरू केली. 1905 पर्यंत हे ठीक होते. पण त्यानंतर जहाल मतवाद भारतात निर्माण झाला. चतुःसूत्रीचा स्वीकार करावा असा गजर जहालवाद्यांनी सुरू केला. त्यातून सुरत येथे काँग्रेस फुटली. 1916 मध्ये लखनौच्या अधिवेशनात मवाळ आणि जहाल एकत्र आले. 1920 मध्ये म.गांधीजी युगाला प्रारंभ झाला. अहिंसा, सत्याग्रहाचे पर्व सुरू झाले. असहकार, कायदेभंगाचे युग अवतरले. अनेकांना फासावर लटकावले. कारण त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. म.गांधीजींना तो मार्ग पसंत नव्हता. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध चालु असतांना म.गांधीजी यांनी चलेजाव आंदोलनाची घोषणा केली तर तिकडे जपानचे सहाय्य घेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना करून जय हिंदची घोषणा केली. अशा अनेक घटना हिंदुस्थानात घडल्या. त्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्य लढ्याची कहानी म्हणजे हा ग्रंथ होय.
Bharatiya Swatantrya Chalwalicha Itihas (1857-1950)
- भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास : (अ) भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास : संक्षिप्त आढावा, प्रबोधनामुळे नव्या जल मार्गाचा शोध, युरोपियनांचा भारताशी व्यापारी संबंध, इंग्रज-फ्रेंच संघर्ष, बंगालमध्ये ब्रिटीशांचा साम्राज्य विस्तार, अलीवर्दीखानचा मृत्यु, सिराजउद्दौला व ब्रिटीशांच्या संबंधात तणाव, प्लासीच्या युद्धाची कारणे, अंधार कोठडीची घटना, प्लासीचे युद्ध (23 जून 1757), प्लासीच्या युद्धाचे परिणाम, मीर जाफरचा पदत्याग (इ.स.1760), बंगालच्या नवाबपदी मीर कासीम, बक्सारच्या युद्धाची कारणे, बक्सारचे युद्ध, बक्सारच्या लढाईचे महत्त्व, परिणाम, (ब) इ.स. 1857 चा उठाव : कारणे आणि परिणाम : (1) इ.स.1857 च्या उठावाची कारणे – राजकीय कारणे, प्रशासकीय कारणे, सामाजिक कारणे, आर्थिक कारणे, लष्करी कारणे, तात्कालिक कारण : चरबीयुक्त काडतुसे, उठावाची वाटचाल – मीरत, दिल्ली, कानपूर, झाशी; वृद्ध कुवर सिंगाचा पराक्रम, इतरत्र झालेले उठाव; 1857 चा उठाव व खानदेश – काजीसिंग नाईक (ख्वाजा नाईक), अंबापाणीची लढाई, नाशिक भागातील आदिवासींचे उठाव, त्र्यंबकेश्वर येथील ठाकूरांचा उठाव, 1857 चा उठाव व दक्षिण हिंदुस्थान
(2) इ.स.1857 च्या उठावाचे परिणाम – अंदमान निकोबार बेटावर गुन्हेगारांच्या नवीन वसाहतीची निर्मिती, अपयशाची कारणे. - सामाजिक आणि धार्मिक सुधारक : (1) राजा राममोहन रॉय (इ.स.1774-1831) – इंग्लंडकडे प्रयाण (1831), सामाजिक सुधारणा, शैक्षणिक योगदान, कृषिविषयी विचार, धार्मिक सुधारणा – ब्राह्मो समाजाची स्थापना, ब्राह्मोसमाज आणि देवेंद्रनाथ टागोर, ब्राह्मो समाजात फुट, ब्राह्मो समाजाच्या कार्याचे मूल्यमापन, (2) स्वामी दयानंद सरस्वती (इ.स.1824-1883) – बालपण, घरातून पलायन, आर्य समाजाची स्थापना, आर्य समाजाची तत्त्वे, मृत्यू, आर्य समाजाने केलेले कार्य, आर्य समाजावरील टीका, (3) स्वामी विवेकानंद (इ.स.1863-1902) – बालपण, शिक्षण, श्रीरामकृष्ण परमहंस बरोबर भेट, वडिलांचा मृत्यू, रामकृष्णांचा मृत्यू व रामकृष्ण मठाची स्थापना, भारतभ्रमण, शिकागो धर्मपरिषद, अमेरिकेचा दुसरा दौरा, रामकृष्ण संघाची स्थापना, मृत्यू, (4) महात्मा ज्योतिबा फुले (1827-1890) आणि सावित्रीबाई फुले (1831-1897) – स्त्रीयांच्या शिक्षणाचा प्रारंभ, अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य, कामगार चळवळ, दुष्काळग्रस्तांना मदत, हंटर कमिशनपुढे साक्ष, महाराष्ट्राचे छ. शिवाजी महाराजांकडे लक्ष वेधले, बालहत्या प्रतिबंधक गृह, जनतेने ज्योतिरावांना अर्पिली महात्मा पदवी, सत्यशोधक समाज, (5) राजर्षी छत्रपती शाहू महाराज (इ.स.1874-1922) – शिक्षण, युरोपच्या प्रगतीने भारावले, वेदोक्त प्रकरण, कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या शाखेस प्रारंभ, शैक्षणिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, आर्थिक सुधारणा, विविध कलांना उत्तेजन, (6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इ.स.1891-1956) – महाडचे चवदार तळे सत्याग्रह, मंदिर प्रवेश सत्याग्रह, गोलमेज परिषद, पुणे करार, राजकीय कार्य, शैक्षणिक कार्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, बैौद्ध धर्माचा स्वीकार, मृत्यु.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : (1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना : उदयाची कारणे, ध्येय व उद्दीष्टे – राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरलेले घटक, राष्ट्रीय सभेचे ध्येय व उद्दीष्ट्ये, राष्ट्रीय सभेबद्दल सरकारचा बदलता दृष्टीकोन, (2) भारतीय राष्ट्रीय काँग्र्रेसची कामगिरी (1885-1905), (3) बंगालची फाळणी (इ.स.1905) – बंगालच्या फाळणीची कारणे, बंगालच्या फाळणीला विरोध, शोकदिन म्हणून जनतेने फाळणीचा दिवस साजरा केला, बंगालच्या फाळणीचे झालेले परिणाम, बंगालच्या फाळणीची चळवळ थंडावण्याची कारणे, (4) मवाळ गट (काँग्रेस) – मवाळांची कार्यपद्धती, मवाळांच्या प्रवाहाची रुपरेषा, मवाळवादी नेते; (ळ) दादाभाई नवरोजी (इ.स.1825-1917) – बडोद्याचे दिवाणपद, राष्ट्रवादाला अर्थकारणाचा भक्कम आधार; (ळळ) फिरोजशहा मेहता (इ.स.1845-1915); (ळळळ) महादेव गोविंद रानडे (इ.स. 1842-1901) – सार्वजनिक सभा आणि रानडे, दुष्काळाबद्दल सरकारचे चुकीचे धोरण, ब्रिटिश सरकारचा रानड्यांवर रोष, काँग्रेसच्या स्थापनेत सहभाग, औद्योगिक परिषदेची स्थापना, डेक्कन सभेची स्थापना, प्रार्थना समाज, वाङ्मयीन कार्य; (र्ळीं) गोपाळ कृष्ण गोखले (इ.स.1866-1915) – वेल्बी कमिशनपुढे साक्ष, भारत सेवक समाजाची स्थापना, मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा, प्राथमिक शिक्षणासाठी प्रयत्न, अर्थशास्त्री गोखले, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा, दक्षिण आफ्रिकेचा दौरा र्(ीं) सुरेंद्रनाथ बॅनर्जी (इ.स.1848-1925).
- जहालवादाचा उदय आणि क्रांतीकारी चळवळी : (अ) जहालवादाचा कालखंड : जहाल गटाच्या उदयाची कारणे; (1) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (इ.स.1856-1920) – 1908 मध्ये पुन्हा शिक्षा, चतु:सूत्रीची देणगी, केसरी आणि मराठा वृत्तपत्रे; (2) सुरत काँग्रेस (1907); (3) होमरुल चळवळ (1916) – बेळगावच्या अधिवेशनात होमरुल लीगची स्थापना, होमरुल प्रचार, उद्दिष्ट्ये, विस्तार, परिणाम, (ब) क्रांतीकारी चळवळी : (1) अभिनव भारत; (2) गदर पार्टी (आंदोलन) – कृति योजनेतील प्रमुख तत्वे, गदर साप्ताहिकाने फुलविले क्रांतीचे अंगारे, लाला हरदयाळ यांना अटक, पहिले महायुध्द आणि गदर चळवळ, अफगणिस्तानमध्ये हंगामी सरकारची स्थापना, कोमागातामारु प्रकरण, लष्करात उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न (1915), गदर चळवळीच्या अपयशाची कारणे, गदर चळवळीने काय साध्य झाले?, युगांतर ; (3) अनुशीलन समिती – सदस्य, समितीची उद्दिष्टे; (4) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन – साँडर्स हत्या प्रकरण, केंद्रीय सेब्ली बॉम्ब खटला, सशस्त्र आंदोलन अयशस्वी होण्याची कारणे.
- महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ : आफ्रिकेला प्रयाण, म. गांधीजींचे हिंदुस्थानात आगमन, साबरमती सत्याग्रहाश्रमाची स्थापना, काशी येथे हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, गांधीजींचे तत्त्वज्ञान, (1) असहकार चळवळ : कारणे व परिणाम – नागपुरचे अधिवेशन, असहकार चळवळीचा मार्ग, रचनात्मक कार्यक्रम, असहकार चळवळीची वाटचाल, असहकार चळवळ थांबवण्याचा म. गांधीजींचा निर्णय, असहकार आंदोलन अयशस्वी होण्याची कारणे, असहकार आंदोलनाची फलश्रुती (परिणाम), (2) सविनय कायदेभंग चळवळ (1930-31) – सविनय कायदेभंग चळवळीची कारणे, गांधीजींचे दांडीकडे प्रयाण, कायदेभंगाची व्याप्ती, आंदोलनाची समाप्ती, सविनय कायदेभंग चळवळीचे परिणाम, (3) ‘चले जाव’ चळवळ (1942) – चले जाव आंदोलन सुरू करण्याची कारणे, चले जाव आंदोलनाची पार्श्वभूमी, 8 ऑगस्ट 1942 चा ‘चले जाव’ ठराव, गांधीजींचे भाषण, काँग्रेस नेत्यांची धरपकड, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, गांधीजींचा उपवास, आंदोलनाच्या अपयशाची कारणे, चले जाव आंदोलनाचे महत्व, (4) नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद फौज – पूर्व जीवन, सायमन कमिशनच्या विरोधात, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना, जर्मनीकडे प्रयाण, जपानकडे प्रयाण, रासबिहारी बोस, आझाद हिंद सरकारची स्थापना, आझाद हिंद फौजेची कूच, आझाद हिंद सेनेचे महत्त्व.
- भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य : (1) क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना, कॅबीनेट मिशन, माउंटबॅटन योजना, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (1947), (1) क्रिप्स मिशन (1942) – क्रिप्स मिशन हिंदुस्थानात पाठविण्याची कारणे, क्रिप्स मिशनचे हिंदुस्थानात आगमन, क्रिप्स मिशनच्या शिफारशी, क्रिप्स योजनेचे परिक्षण (2) वेव्हेल योजना – वेव्हेल योजना जाहीर करण्याची कारणे, वेव्हेलचे इंग्लंडला प्रयाण, वेव्हेल योजनेतील प्रमुख तरतुदी, सिमला परिषद, सिमला परिषद अयशस्वी होण्याची कारणे, सप्टेंबर घोषणा (19 सप्टेंबर 1945), सार्वत्रिक निवडणूका (3) कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) – त्रिमंत्री योजनेतील प्रमुख तरतुदी, त्रिमंत्री योजनेतील गुण, त्रिमंत्री योजनेतील दोष, त्रिमंत्री योजनेस मान्यता, घटना समितीच्या निवडणुका (4) माऊंटबॅटन योजना (3 जून 1947) – माऊंटबॅटन योजनेतील तरतूदी (5) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (1947) – ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य का द्यावे लागले?, राष्ट्रवादाचा उदय, अहिंसक चळवळीस ब्रिटिशांचा पाठिंबा, आझाद हिंद सेनेचे कार्य, गांधीजींच्या चळवळी, नव्या नेतृत्वाचा धोका, ब्रिटिशांनी हिंदुस्थानात गुंतविलेले भांडवल, रशिया, अमेरिकेचा इंग्लंडवर दबाव, नौदलातील बंड, (2) मुस्लिम लीग आणि भारताची फाळणी – 1857 चे बंड आणि मुसलमान, सर सय्यद अहमद खान यांचे कार्य, पेट्रोटिक असोसिएशन आणि डिफेन्स असोसिएशन, बंगालची फाळणी, सिमला शिष्टमंडळाच्या मागण्या, मुसलमानांच्या सिमला निवेदनातील मागण्या, मुस्लिम लीगची स्थापना, मोर्ले-मिंटो कायद्यात मुसलमानांना विशेष सवलती, लखनौ करार, खिलाफत चळवळ, इंग्लंडला शिष्टमंडळ, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, ब्रिटिशांची फोडा व झोडाची नीती, डॉ. इक्बाल यांची स्वतंत्र राज्याची मागणी, चौधरी रहमत अली यांची स्वतंत्र पाकिस्तानची मागणी, लाहोर अधिवेशनात पाकिस्तान निर्मितीचा ठराव, ‘चले जाव’ आंदोलनाला मुस्लिम लीगचा विरोध, प्रत्यक्ष कृती दिन, गांधीजी आणि बॅ. जिना यांची चर्चा, (3) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये – सर्वात मोठी लिखित घटना, सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, धर्मातील राज्य, संसदीय शासनपद्धती, मुलभूत हक्क, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे, स्वतंत्र न्यायालय, प्रौढ मताधिकार, संघराज्यात्मक स्वरूप.