- DESCRIPTION
- INDEX
श्री. पं. ना. दादांच्या एकूणच पद्य लेखनाकडे पाहता त्यांच्यातला शिक्षक आणि लोकशिक्षक शेवटपर्यन्त मनी हृदयी ठाण मांडून बसतो. सेवानिवृत्तीनंतर ‘आता उरलो उपकारा पुरता’ या उक्तीचे सारतत्व त्यांच्या लेखनकृतीतून गडद होतांना दिसते. बर्याचदा नवकवींमध्ये अनुकरणप्रियता स्वलेखनातून प्रकर्षाने जाणवते. पं. ना. दादांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य म्हणून जी नोंद आवर्जून करता येईल ती म्हणजे त्यांच्या कोणत्याही रचनेत दुसर्या इतरेजनांचे अनुकरण नाहीय. त्यांच्या सगळ्या पद्यावर त्यांचीच मुद्रा उमटलेली दिसते.
आत्मपरीक्षण व आत्ममग्नता या दोन घटकांना त्यांनी लेखनमूळाशी स्थित केलेले बर्याच कवितांमध्ये दिसून येते. वर्तमानाची मानसिकता तिचे ग्रासलेपण त्यातून होणारी नितीमूल्यांची पडझड यामुळे कवी वारंवार विषण्ण होतो. प्रसंगी उपहास व उपरोध या भाषिक शस्त्रांचा आधार घेत त्यांचे कवीमन त्या त्या विकृतीला व विकोपाला चांगलेच धारेवर धरते. त्यांच्या भावनांचं हे विरेचन त्यांच्यातल्या सकारात्मकतेचं दर्शन तर घडवितातच शिवाय संस्कृतीरक्षणार्थ त्यांची होणारी मनस्वी तगमगही वाचक मनातून भरून वाहते. हे पं. ना. दादांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
– वा. ना. आंधळे
Bhavatrang
1) हत्ती आणि कुत्रा, 2) घोडा आणि गाढव, 3) कोल्हा आणि बकरा, 4) ससा आणि कासव (वरदान), 5) आक्रमण आणि संरक्षण, 6) शूर पूर्वीचा आणि शूर आजचा, 7) यश आणि अपयश, 8) चांगले आणि वाईट, 9) मी आणि माझे कल्याण, 10) आनंद घ्यावा – स्वागताचा आणि निरोपाचा, 11) आमचा देश आणि आमची संस्कृति, 12) परिचय आणि संस्कार, 13) शिकवणे – शहाण्याला आणि मूर्खाला, 14) सेवानिवृत्ती आणि वेळ, 15) जोडणे आणि सोडणे, 16) नम्रता आणि घमेंडीपणा, 17) संसार रथाची दोन चाके – पती आणि पत्नी, 18) घमेंडी आक्रमण आणि चतुराईने संरक्षण, 19) मूर्खाचा सहवास आणि सुटका, 20) ईश्वर आणि त्याची किमया, 21) सूर्य आणि ईश्वरदर्शन, 22) संधी आणि मूर्खपणा, 23) मृत्यू आणि आत्महत्त्या, 24) प्रकृर्ति आणि चेतन परमात्मा, 25) माणूस आणि जनावर, 26) आपले मन-आपला मित्र-आपला शत्रू, 27) धोपट मार्ग आणि आड मार्ग, 28) स्त्री शक्ती – अवदसा आणि लक्ष्मी, 29) ऐहिक संपत्ति आणि विचार संपत्ती, 30) श्रीमंती आणि गरीबी, 31) शेती आणि शेतकरी, 32) चूक आणि दुरुस्ती, 33) ज्ञान आणि इतर सर्व, 34) आमचा जग आणि तुमचा जग, 35) कशासाठी काय पाहिजे, 36) नारायण सुर्वे, 37) नटसम्राट, 38) आपले दु:ख आणि दुसर्याचे दु:ख, 39) रुसलेला पाऊस, 40) पावसाचा राग, 41) डोळे आणि कान, 42) मी आणि माझे म्हातारपण, 43) आमचा देश आणि थोर महात्मे, 44) आपला आणि परका, 45) रस्त्याने चाललेला एका म्हातारा, 46) खरे शहाणपण, 47) निवृत्ती – रिटायरमेंट, 48) सत्य आणि असत्य, 49) केर-कचरा