भूरुपशास्त्र
Geomorphology
Authors:
ISBN:
₹550.00
- DESCRIPTION
- INDEX
भूरूपशास्राचा अभ्यास भू-शास्राच्या अध्ययन व अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्वांवर आधारित असतात. भूरूपशास्रातील संकल्पना समजल्यावर भूशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून या संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात विषयाची मांडणी केली आहे. भूरूपशास्र हा विषय महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये विविध पातळींवर शिकविला जातो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय सेवा आयोग स्पर्धा परीक्षा, नेट व सेट या सारख्या परीक्षांच्या अभ्यासकांना हे पुस्तक अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नमुना अभ्यासक्रमाचा बहुतेक सर्व भाग प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. भूरूपशास्रातील मराठीतील या पुस्तकामुळे अभ्यासकांना इंग्रजीतील ॠशेोीहिेश्रेसू हा समजायला क्लिष्ट असा विषय सहज समजायला सोपा होईल असा मला विश्वास आहे.
Bhurupshastra
- पृथ्वीसंबंधीच्या मुलभूत संकल्पना : पृथ्वीची कक्षा, पृथ्वीचा आकार, पृथ्वी गोल असण्याची प्रमाणे
- अक्षवृत्ते-रेखावृत्ते : स्थान निश्चितीसाठी भौगोलिक वृत्तजाळी, अक्षवृत्ते व अक्षांश, स्वाभाविक अक्षवृत्ते
- वेळेचे मापन : रेखावृत्ते; रेखांश व वेळ – स्थानिक वेळ, प्रमाणवेळ, ग्रीनिच मध्यम वेळ
- भूरुपशास्त्राची ओळख : प्राकृतिक भूगोलाची ओळख, प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या
- भूरूपशास्रातील मुलभूत संकल्पना : संकल्पना पहिली, समरुपकतावादाचे तत्व, संकल्पना दुसरी
- पृथ्वीच्या उत्क्रांतीचा इतिहास व भूगर्भशास्रीय काल प्रमाण : सापेक्ष भूकालक्रम: गाळाच्या थरांचे एकावर
- पृथ्वीचे अंतरंग : पृथ्वीच्या अंतरंगाविषयीचे अप्रत्यक्ष पुरावे – 1) पृथ्वीच्या अंतरंगाचे तापमान
- भूखंडवहन सिद्धांत : भूखंडवहन सिद्धांताचे जनक, भूखंडवहन सिद्धांताची निर्मिती, भूखंडवहन सिद्धांत
- समस्थायित्वाचा सिद्धांत : समस्थायित्व सिद्धांत म्हणजे काय?, समस्थायित्व सिद्धांताची उत्पत्ती
- पृथ्वीचे पुराचंबकत्व : पृथ्वीचे चुंबकत्व, पृथ्वी चुंबकासारखे वर्तन का करते, पृथ्वीचे पुराचुंबकत्व
- सागरतळ अपसरण सिद्धांत : मध्य महासागरी पर्वतप्रणालीचा शोध – मध्य महासागरी पर्वतप्रणाली
- भूमंच विवर्तनिकी सिद्धांत : भूमंच विवर्तनिकी सिद्धांत- शिलावरण, अॅस्थेनोस्फिअर
- खडक : भूकवचातील पदार्थ : खडक – खडकाची व्याख्या, खडकांचे वर्गीकरण – 1) अग्निजन्य खडक
- पृथ्वीच्या अंतर्गत मंदगतीने कार्य करणार्या हालचाली : अंतर्गत शक्ती, मंदगतीने कार्य करणार्या शक्ती
- पृथ्वीच्या अंतर्गत शीघ्र गतीने कार्य करणार्या हालचाली : 1) अंतर्गत शक्ती – अ) मंद गतीने कार्य
- विदारण : बाह्य शक्तीच्या घटकांचे कार्य – विदारण, झीज क्रिया; विदारण क्रिया; विदारण क्रियेचे प्रकार
- वस्तुमानाचे वहन : वस्तुमान वहनाच्या व्याख्या; वस्तुमान वहनावर परिणाम करणारे घटक
- भूउतार : भूउताराच्या व्याख्या; भूउताराचे प्रकार- 1) अंतर्निर्मित भूउतार, 2) बहिर्निर्मित भूउतार
- वाहत्या पाण्याच्या (नदी) कार्यामुळे निर्माण होणारी भूस्वरूपे : नदीचे खनन कार्य, नदीच्या खनन कार्यामुळे
- डब्ल्यू. एम. डेव्हीसच्या क्षरणचक्राचा सिद्धांत : क्षरणचक्राची व्याख्या, आदर्श भौगोलिक चक्र
- क्षरण तळपातळीच्या हालचाली : व्याख्या, क्षरण तळपातळी हालचालीचे प्रकार 1) क्षरण तळपातळीची
- नदीप्रणाली व नदीप्रणाली आकृतिबंध : नदीप्रणाली, नदीप्रणालीची व्याख्या, नदीप्रणालीचा विकास
- वारा आणि वार्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूस्वरूपे : जगातील वाळवंटी प्रदेशांची निर्मिती
- हिमाच्छादित भूदृश्य आणि हिमनदीचे कार्य : हिमयुग, हिम व बर्फ, हिमक्षेत्र, हिमरेषा, हिमनदीची व्याख्या
- सागरी लाटा आणि सागरकिनारी निर्माण होणारी भूस्वरूपे : सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण
- भूमिगत पाणी : भूमिगत पाण्याचे स्रोत: 1) वातावरणीय स्रोत 2) स्तरित खडकांचा स्रोत 3) शिलारसीय स्रोत
- चुनखडक (कार्स्ट) प्रदेशातील भूस्वरुपे : जगातील कार्स्ट प्रदेश, कार्स्ट भूपृष्ठरचना विकासासाठी
- भूरुपशास्त्राचे उपयोजन : भूरूपशास्र व मानवी वस्ती, भूरूपशास्र व वाहतूक, भूरूपशास्र व भूमी उपयोजन