भौगोलिक माहिती प्रणाली
Geographical Information System
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक घटकांच्या अभ्यासात एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करते. पृथ्वीवरील विस्तृतपणे पसरलेल्या भौगोलिक घटकांचे सर्वेक्षण, वर्गीकरण, सांख्यिकी मांडणी व तिचे विश्लेषण यांचे एक सर्व समावेशक सादरीकरण भौगोलिक माहिती प्रणाली मुळेच सहज सरळ व सोपे बनते. भौगोलिक माहिती प्रणाली या पुस्तकाचे लेखन करतांना आमचा प्रयत्न हाच राहिला आहे की, भौगोलिक माहिती प्रणाली सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला सोपा, मनोरंजक, व्यवस्थित व क्रमबद्ध स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर पुस्तकात भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकी रचना, भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन यात विविध उपघटकांना उदाहरण व आकृतीसह एक नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Bhaugolik Mahiti Pranali
- भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय : 1.1 प्रस्तावना, 1.2 भौगोलिक माहिती प्रणालीच्या व्याख्या, 1.3 भौगोलिक माहिती प्रणालीचा इतिहास, 1.4 भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक, 1.5 जी.आय.एस.ची कार्यप्रणाली
- भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकी रचना : 2.1 जी.आय.एस. सांख्यिकी प्रकार, अवकाशिय सांख्यिकी, गुणात्मक सांख्यिकी, 2.2 जाळी सांख्यिकीची रचना, चौकोन, पिक्सल, जाळी, चौकोन, आकार, अवकाशीय रेझोल्यूशन, वर्णपट, एकच वर्णपट, अनेक वर्णपटरचना, 2.3 सदिश सांख्यिकीची रचना, 2.4 वेक्टर आणि रास्टर सांख्यिकीचा स्त्रोत, 2.5 रास्टर व वेक्टर सांख्यिकीमधील निवड
- भौगोलिक माहिती प्रणाली सामग्री विश्लेषण : 3.1 जी.आय.एस.सामग्री प्रविष्ठ, 3.2 भू-संदर्भ, 3.3 भौगोलिक सामग्री संपादन/संस्करण, 3.4 निकाष्टी व पृच्छा, 3.5 अध्यारोपण
- भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन : 4.1 भूमी उपयोग/भूमी आच्छादन नकाशात जी.आय.एस.उपयोजन, 4.2 शहरांच्या विस्तारात जी.आय.एस.चे आयोजन, 4.3 वनांच्या देखरेखीत जी.आय.एस.चे उपयोजन, 4.4 आपत्ती व्यवस्थापनात भौगोलिक सूचना प्रणालीचे उपयोजन, 4.5 संरक्षणात भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन, 4.6 नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनात जी.आय.एस.चे उपयोजन